'या' शेअरचा धुराळा..! गुंतवणूकदार 4 वर्षांत 10 हजारात झाले कोट्यधीश; मिळाला 120000 टक्के परतावा!
शेअर बाजारातील एका कंपनीच्या शेअरने एवढा छप्परफाड परतावा दिला आहे. तुम्ही एकूण अवाक व्हाल की, संबंधित कंपनीच्या या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना केवळ ४ वर्षातच तब्बल १,२०,००० टक्के इतका परतावा दिला आहे. अर्थात गेल्या ४ वर्षांपूर्वी ज्या गुंतवणूकदारांनी या शेअरमध्ये गुंतवणूक केली असेल, ते आता मालामाल झाले आहेत.
काय आहे ‘या’ कंपनीचे नाव?
गेल्या ३ महिन्यांचा विचार करता, केवळ तीन महिन्यांतच या शेअरने २९१.३४ टक्के इतका परतावा दिला आहे. जानेवारीपासून ते आतापर्यंत हा शेअर ३५० टक्क्यांनी वाधारला आहे. एक वर्षापूर्वी हा शेअर २२१ रुपयांवर होता. तो आता १९११ रुपयावर पोहोचला आहे. या कालावधीत या शेअरने ६६८.४८ टक्क्यांचा परतावा दिला आहे. या कंपनीचे नाव वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजीज लि. असे आहे.
मिळाला १,२०,००० टक्के परतावा
चालू आठवड्यात शेअर बाजाराच्या शेवटच्या दिवशी वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजीजचा शेअर शुक्रवारी (ता.१२) १.३७ टक्क्यांनी घसरला. या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ३,०३७.७५ रुपये तर नीचांक २१५.२० रुपये इतका आहे. चार वर्षांपूर्वी हा शेअर केवळ १.६४ रुपयांवर होता. अर्थात चार वर्षांपूर्वी १० जुलै २०२० रोजी हा शेअर केवळ १.६४ रुपयांवर व्यवहार करत होता. या पातळीवरू हा शेअर सध्या १९११ रुपयांवर पोहोचला आहे. या कालावधीत या शेअरने १,२०,००० टक्के एवढा छप्परफाड परतावा दिला आहे.
चार वर्षात झाले १० हजाराचे १ कोटी
त्यामुळे आता जर एखाद्या व्यक्तीने गेल्या ४ वर्षांपूर्वी या शेअरमध्ये केवळ १० हजार रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आता त्याला आज १ कोटी रुपयांहूनही अधिक पैसे मिळाले असते. वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजी लिमिटेड कंपनीचे सौर उत्पादन केंद्र महाराष्ट्रात आहे. ही कंपनी अक्षय ऊर्जा संसाधनांच्या माध्यमाने वीज निर्मिती करते. तसेच, सल्लागार सेवाही प्रदान करते.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)