
Share Market Today: Indian Bank सह हे शेअर्स आज गुंतवणूकदारांना करू शकतात श्रीमंत! बाजारातील तज्ज्ञांनी दिलाय मोलाचा सल्ला
अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर निर्णयापूर्वी जागतिक बाजारपेठेत तेजी पाहायला मिळली होती. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर देखील झाला. आज, बुधवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, पुन्हा एकदा सकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील आज भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सौम्य सकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २६,१४० च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ५० अंकांनी जास्त होता.
मंगळवारी, भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला, बेंचमार्क निफ्टी ५० २५,९०० च्या वर राहिला. सेन्सेक्स १५०.६८ अंकांनी म्हणजेच ०.१८% ने घसरून ८४,६२८.१६ वर बंद झाला, तर निफ्टी ५० २९.८५ अंकांनी म्हणजेच ०.११% ने घसरून २५,९३६.२० वर बंद झाला. मंगळवारी बँक निफ्टी निर्देशांक ९९.८५ अंकांनी किंवा ०.१७% ने वाढून ५८,२१४.१० वर बंद झाला. आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली होती. मात्र आठवड्याच्या दुसऱ्याच दिवशी शेअर बाजार घसरला. त्यामुळे आज शेअर बाजारातील वातावरण कसं असणार, याबाबत गुंतवणूकदारांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
प्रभुदास लिल्लाधर येथील तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी चार स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये GNFC, जुबिलंट इंग्रेव्हिया आणि गोकुळ अॅग्रो रिसोर्सेस यांचा समावेश आहे. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच ब्रेकआउट स्टॉक्सची शिफारस केली आहे. ज्यामध्ये रेमसन्स इंडस्ट्रीज, आनंद राठी शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स, साई लाईफ सायन्सेस, टीटीके प्रेस्टीज आणि किर्लोस्कर ऑइल इंजिन्स या शेअर्सचा समावेश आहे.
सावधान! केवळ 2 आठवड्यांत बंद होऊ शकतं तुमचं X अकाऊंट, आत्ताच करा हे महत्त्वाचं काम नाहीतर…
बाजारातील इतर तज्ञांनी देखील आज गुंतवणूकदारांसाठी काही शेअर्सची शिफारस केली आहे. हे शेअर्स खरेदी केल्यास गुंतवणूकदारांना फायदा होऊ शकतो, असा अंदाज देखील आज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया, आनंद राठी येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपलक्कल यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी आठ इंट्राडे स्टॉक्सची शिफारस केली आहे. ज्यामध्ये इंडियन बँक , जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड, एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेड (न्याका), फोर्टिस हेल्थकेअर लिमिटेड, मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड, जेटेक इंडिया लिमिटेड, वैभव ग्लोबल लिमिटेड आणि लॉरस लॅब्स लिमिटेड या शेअर्सचा समावेश आहे.