Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran – Israel युद्धाचा जागतिक इंधन पुरवठा विस्कळीत; ‘ATF’ ला सर्वाधिक फटका; पाहा धक्कादायक आकडे

इराणमधील संघर्ष संपुष्टात येण्याची कोणतीही चिन्हे सध्याच्या घडीला दिसत नाहीत. त्यामुळे जागतिक एनर्जी सप्लाईवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला दिसून येत आहे. उर्जा पुरवठ्यावर गंभीर व्यत्यय निर्माण झाला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 05, 2026 | 05:49 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • जागतिक एनर्जी सप्लाईवर मोठ्या प्रमाणावर परिणाम
  • तेलाच्या निर्यातीत ६३ टक्क्यांनी मोठी घट
  • जेट फ्यूलला मोठा फटका
Iran-Israel War Disrupts Global Fuel Supply : इराणमधील संघर्ष संपुष्टात येण्याची कोणतीही चिन्हे सध्याच्या घडीला दिसत नाहीत. त्यामुळे जागतिक एनर्जी सप्लाईवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला दिसून येत आहे. उर्जा पुरवठ्यावर गंभीर व्यत्यय निर्माण झाला आहे. या परिस्थितीचे वर्णन इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट असंही केलं जात आहे. याचे मुख्य कारण म्हणजे ‘हॉर्मुझ सामुद्रधुनी’तून होणारी सागरी वाहतूक. ही वाहतूक स्थगित झाल्यामुळे, पश्चिम आशियातून होणाऱ्या तेलाच्या निर्यातीत प्रचंड कपात झाली आहे. यामुळे जगभरात पेट्रोल, डिझेल, नॅफ्था, जेट इंधन, वायू (गॅस) आणि खतांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. याचा भारतासारख्या देशांच्या अर्थव्यवस्थांवर मोठा परिणाम होणार आहे; कारण भारत तेलाच्या गरजांचा बहुतांश भाग आयात करतो.

Iran Israel तणावामध्ये कोण खरेदी करतंय भारताकडून रॉकेट लाँचर्स आणि मिसाईल? डिफेंस एक्सपोर्टमध्ये लक्षणीय वाढ

तेलाच्या निर्यातीत ६३ टक्क्यांनी मोठी घट

मार्च महिन्यात, पश्चिम आशियातून होणाऱ्या तेलाच्या निर्यातीत ६३ टक्क्यांनी मोठी घट झाली होती. जी दररोज ४.८ दशलक्ष बॅरल्सच्या घटीइतकी होती. एकूण निर्यात केवळ २.८ दशलक्ष बॅरल्सपर्यंत उतरली आली. याचा अर्थ असा होतो की पश्चिम आशिया सध्या दररोज २.८ दशलक्ष बॅरल्स तेलाची निर्यात करत आहे. या एकूण प्रमाणापैकी ६९ टक्के तेलाची निर्यात ‘यानबू’ (Yanbu) बंदरातून केली जात आहे; हे बंदर सौदी अरेबियाच्या ‘तांबड्या समुद्रा’च्या किनाऱ्यावर वसलेलं आहे. सौदी अरेबिया हे तेल एका पाइपलाइनद्वारे या बंदरापर्यंत पोहोचवत आहे.

जेट फ्यूलला मोठा फटका

हॉर्मुझ सामुद्रधुनीतील सागरी वाहतुकीत आलेल्या व्यत्ययाचा सर्वात मोठा फटका जेट इंधनाला विशेषतः ‘एव्हिएशन टर्बाइन फ्युएल’ला म्हणजे ATF बसला आहे. या इंधनाच्या निर्यातीत ८५ टक्क्यांची मोठी घट झाली आहे. आशिया आणि युरोप व्यतिरिक्त, पश्चिम आशियाई देश विविध आफ्रिकन देशांनाही ATF ची निर्यात करतात. ATF च्या तुटवड्यामुळे अनेक विमान उड्डाणे रद्द करावी लागली आहेत, विशेषतः आशिया-पॅसिफिक भागातील उड्डाण रद्द करण्यात आली आहे. शिवाय, भारतसह अनेक देशांमध्ये ATF च्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

मार्चमध्ये पश्चिम आशियाई तेलाच्या निर्यातीत ६३% घट

निर्यात ७.६ दशलक्ष बॅरल्सवरून घसरून २.८ दशलक्ष बॅरल्सवर आली.
जेट इंधनाच्या निर्यातीत सर्वात मोठी घट दिसून आली, जी ८५ टक्क्यांनी कमी झाली.
LPG आणि नॅफ्थाच्या निर्यातीत १ दशलक्ष बॅरल्सची घट झाली.
डिझेल, पेट्रोल आणि इंधन तेलाच्या निर्यातीत ६०-७० टक्क्यांनी घट झाली.
LPG आणि नॅफ्थाच्या निर्यातीतही दररोज १ दशलक्ष बॅरल्सची घट नोंदवली गेली आहे. डिझेल, पेट्रोल आणि इंधन तेलाच्या निर्यातीतही ६० ते ७० टक्क्यांची घट दिसून आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ खुली करण्यासाठी ४८ तासांची मुदत दिली आहे आणि ही मुदत आता वेगाने जवळ येत आहे. दोन्ही पक्षांची भूमिका पाहता, पश्चिम आशियामध्ये शांतता प्रस्थापित होईल ही एक अशाच आहे. सध्या ही शक्यता धूसरच दिसत आहे.

Gratuity New Rule : आता 5 वर्षांची अट संपली; 1 वर्षाच्या नोकरीवरही मिळणार ग्रॅच्युटी, जाणून घ्या नवा नियम

Web Title: Iran israel war disrupts global fuel supply atf hit hardest see the shocking figures marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 05:49 PM

Topics:  

  • air india
  • Business News
  • Marathi News

संबंधित बातम्या

World News : तेल बाजारातील अस्थिरता अनेक वर्षे कायम राहण्याची शक्यता; अधिकाऱ्यांचा इशारा
1

World News : तेल बाजारातील अस्थिरता अनेक वर्षे कायम राहण्याची शक्यता; अधिकाऱ्यांचा इशारा

Yemen News : येमेनमध्ये हुथींविरोधात मोठी कारवाई; सरकारी दलांचा बाब-अल-मंदेबकडे जोरदार पलटवार
2

Yemen News : येमेनमध्ये हुथींविरोधात मोठी कारवाई; सरकारी दलांचा बाब-अल-मंदेबकडे जोरदार पलटवार

Satara News: :दुष्काळाच्या कचाट्यात शेतकरी; दूध व्यवसायानेही सोडली साथ!
3

Satara News: :दुष्काळाच्या कचाट्यात शेतकरी; दूध व्यवसायानेही सोडली साथ!

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी
4

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.