Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईच्या फोर्ट परिसरात जयपूर वॉच कंपनीचे तिसरे बुटीक सुरू; वारसा आणि लक्झरीचा अनोखा संगम

मुंबईच्या ऐतिहासिक फोर्ट परिसरात जयपूर वॉच कंपनीने तिसरे बुटीक सुरू करत रिटेल विस्ताराला नवे बळ दिले आहे. या बुटीकमध्ये भारतीय वारसा, उत्कृष्ट कारागिरी आणि आधुनिक लक्झरीचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 28, 2026 | 07:52 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

 

मुंबई : जयपूर वॉच कंपनीने आपल्या रिटेल विस्ताराला आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठत मुंबईच्या ऐतिहासिक फोर्ट परिसरात तिसरे बुटीक सुरू केले आहे. या नव्या बुटीकमुळे भारतातील प्रमुख लक्झरी आणि लाइफस्टाइल बाजारपेठांमध्ये कंपनीची उपस्थिती आणखी मजबूत झाली आहे. कंपनीचे संस्थापक गौरव मेहता यांच्या नेतृत्वाखाली हा विस्तार करण्यात आला असून, घड्याळप्रेमी आणि संग्राहकांसाठी हा बुटीक विशेष आकर्षण ठरणार आहे.

लेकीसाठी काहीही! मिशी काढून साडी नेसायलाही तयार; प्रसिद्ध अभिनेत्याचा भावूक अंदाज जिंकतोय चाहत्यांची मनं, Video व्हायरल

मुंबई समाचार मार्गावरील सर विठ्ठलदास चेंबर्स येथे सुरू करण्यात आलेल्या या बुटीकमध्ये वारसा, उत्कृष्ट कारागिरी आणि हॉरॉलॉजी (घड्याळनिर्मिती) कलेचा सुंदर संगम अनुभवायला मिळणार आहे. ऐतिहासिक नाणी, जुनी टपाल तिकिटे, लघुचित्रकला आणि भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशातून प्रेरणा घेत तयार करण्यात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण घड्याळांमुळे जयपूर वॉच कंपनीने लक्झरी घड्याळ उद्योगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

या बुटीकमध्ये कंपनीचे लोकप्रिय कॉइन वॉचेस, स्टॅम्प वॉचेस, पिचवाई-प्रेरित टाइमपीसेस, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिधान केलेल्या रॉयल बाघ कलेक्शनसह मर्यादित आवृत्तीतील आणि खास ग्राहकांसाठी तयार करण्यात आलेल्या घड्याळांचे प्रदर्शन करण्यात आले आहे. प्रत्येक कलेक्शनमागील इतिहास, सांस्कृतिक वारसा आणि उत्कृष्ट कारागिरी जवळून अनुभवण्याची संधी ग्राहकांना येथे मिळणार आहे.

यावेळी बोलताना कंपनीचे संस्थापक गौरव मेहता म्हणाले की, मुंबई हे वारसा, उत्कृष्ट डिझाइन आणि कारागिरीला कायमच महत्त्व देणारे शहर आहे. फोर्टसारख्या ऐतिहासिक परिसरात बुटीक सुरू करणे आमच्यासाठी अभिमानाची बाब असून, घड्याळनिर्मितीच्या माध्यमातून इतिहास जतन करण्याची आमची संकल्पना अधिक व्यापक स्तरावर पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. घड्याळांमागील कथा जाणून घेण्यासाठी संग्राहक आणि ग्राहकांनी या बुटीकला भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

Ravana Lanka Tour: रावणाची लंका आणि अशोकवाटिका आता कशी दिसते? प्रदीप काबरांनी दाखवली थक्क करणारी दृश्ये

ऐतिहासिक वास्तू, व्यापारी महत्त्व आणि समृद्ध सांस्कृतिक वारशासाठी ओळखल्या जाणाऱ्या फोर्ट परिसरात हे बुटीक सुरू करून कंपनीने पारंपरिक वारसा आणि आधुनिक लक्झरीचा सुंदर मिलाफ साधला आहे. देशभरातील वाढत्या स्टोअर नेटवर्कमध्ये मुंबईतील या नव्या बुटीकची भर पडली असून, सध्या जयपूर वॉच कंपनीची उपस्थिती मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, अहमदाबाद, सुरत आणि इंदूरमध्ये आहे. भारतीय लक्झरी ब्रँड्सची वाढती मागणी लक्षात घेता कंपनी भविष्यात प्रमुख महानगरांसह नव्या प्रीमियम बाजारपेठांमध्येही विस्तार करण्यास सज्ज आहे.

Web Title: Jaipur watch company opens its third boutique in mumbais fort area

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 07:52 PM

Topics:  

  • Jaipur

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.