Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kash Patel : काश पटेल यांची FBI च्या संचालकपदी नियुक्ती, ‘व्हाईट हाऊस’कडून अभिनंदन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी काश पटेल यांच्याकडे फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय)चे नेतृत्व सोपवण्याची घोषणा केली होती.

  • By संदीप गावडे
Updated On: Feb 21, 2025 | 11:50 PM
काश पटेल यांची FBI च्या संचालकपदी नियुक्ती, ‘व्हाईट हाऊस’कडून अभिनंदन

काश पटेल यांची FBI च्या संचालकपदी नियुक्ती, ‘व्हाईट हाऊस’कडून अभिनंदन

Follow Us
Close
Follow Us:

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी काश पटेल यांच्याकडे फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय)चे नेतृत्व सोपवण्याची घोषणा केली होती. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळादरम्यान काश पटेल अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे चीफ ऑफ स्टाफ राहिले होते. काश पटेल हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. काश पटेल हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनात संधी मिळालेले दुसरे भारतीय-अमेरिकन ठरले आहेत.

आज भारतीय वंशाचे काश पटेल यांच्या अमेरिकेतील फेडरल ब्युरो ऑफ इनव्हेस्टिगेशन म्हणजे एफबीआय (FBI) या गुप्तचर संस्थेच्या संचालक पदावरील नियुक्तीला अमेरिकन सिनेटने मंजूरी दिली आहे. दरम्यान, काश पटेल यांची एफबीआयच्या संचालक पदावर नियुक्ती झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्थात ‘व्हाईट हाऊस’ने काश पटेल यांचं हटके स्टाईलने अभिनंदन केलं आहे. काश पटेल यांची एफबीआयच्या संचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर ‘बॉलिवूड’च्या स्टाईलने त्यांच अभिनंदन करण्यात आलं आहे. व्हाईट हाऊसचे डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ डॅन स्कॅव्हिनोने रणवीर सिंगच्या गाण्याद्वारे काश पटेलला बॉलिवूड शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत.

व्हाईट हाऊसचे डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ डॅन स्कॅव्हिनो यांनी शुक्रवारी एक्स या सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये बाजीराव मस्तानी चित्रपटातील ‘मल्हारी’ गाण्यात रणवीर सिंगच्या चेहऱ्याच्या जागी काश पटेलचा चेहरा एडिट करण्यात आल्याचा एक व्हिडाओ शेअर केला आहे. तसेच कॅप्शनमध्ये लिहलं आहे की आत्ताच काश पटेल यांचं फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे नवे संचालक म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. तसेच अध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांच्या नियुक्तीच्या आदेशावर अधिकृतपणे स्वाक्षरी केली आहे. दरम्यान, सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून यावर संमिश्र प्रतिक्रिया आल्या असून हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

भारतीय वंशाचे काश पटेल यांच्या अमेरिकेतील फेडरल ब्युरो ऑफ इनव्हेस्टिगेशन म्हणजे एफबीआय (FBI) या गुप्तचर संस्थेच्या संचालक पदावरील नियुक्तीला अमेरिकन सिनेटने मंजूरी दिली. काश पटेल हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. सिनेटमध्ये झालेल्या मतदानादरम्यान काश पटेल यांना एफबीआयचे पुढील संचालक नियुक्त करण्याच्या बाजूने ५१ मते तर विरोधात ४९ मते पडली. रिपब्लिकन पक्षाच्या सुसान कॉलिन्स आणि लिसा मक्रोव्स्की यांनी देखील डेमोक्रॅटीक पक्षाच्याबरोबर पटेल यांच्या नियुक्तीच्या विरोधात मत दिले. डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्ष पदाची निवडणुकी जिंकल्यानंतर लगेत पटेल यांच्याकडे एफबीआयची जबाबदारी सोपवली जाईल अशी घोषणा केली होती, आता यावर सिनेटने देखील शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

Web Title: Kash patel appointment fbi director praised by us president donald trump

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2025 | 11:50 PM

Topics:  

  • Business News
  • US government
  • US President

संबंधित बातम्या

FD सोडा! RBI च्या फ्लोटिंग रेट्स बाँडमध्ये गुंतवणूक केल्याने मिळेल ‘जबरदस्त’ रिटर्न
1

FD सोडा! RBI च्या फ्लोटिंग रेट्स बाँडमध्ये गुंतवणूक केल्याने मिळेल ‘जबरदस्त’ रिटर्न

India US Trade Agreement: भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करार लवकरच निश्चित होण्याची शक्यता; शेतकरी, मच्छीमार आणि लघु उद्योगांवर लक्ष
2

India US Trade Agreement: भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करार लवकरच निश्चित होण्याची शक्यता; शेतकरी, मच्छीमार आणि लघु उद्योगांवर लक्ष

सुदीप फार्माचा ८९५ कोटींचा IPO २१ नोव्हेंबरला उघडणार; किंमतपट्टा ५६३ ते ५९३ निश्चित
3

सुदीप फार्माचा ८९५ कोटींचा IPO २१ नोव्हेंबरला उघडणार; किंमतपट्टा ५६३ ते ५९३ निश्चित

‘शेतकरी हा हवामानाचा नायक’, UPL कडून COP30 च्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय मोहिम सुरू
4

‘शेतकरी हा हवामानाचा नायक’, UPL कडून COP30 च्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय मोहिम सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.