जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने एचडीएफसी लाइफद्वारे ‘द मिसिंग बीट’ उपक्रमाचा शुभारंभ
देशाच्या अग्रगण्य विमाकंपन्यांपैकी एक असलेल्या एचडीएफसी लाइफने कार्डिओपल्मनरी रिससायटेशन (सीपीआर) प्राण वाचविण्याची क्षमता असणाऱ्या तंत्राविषयी जागरुकता पसरविण्याच्या हेतूने ‘द मिसिंग बीट’ नावाचा जनहितकारी उपक्रम सुरू केला आहे. कार्डिअॅक अरेस्ट हे भारतातील मृत्यूंसाठीचे एक प्रमुख कारण आहे. कार्डिअॅक (हृदयाशी संबंधित) आणीबाणीच्या प्रसंगी रुग्णाची मदत करावी अशी अनेकांची इच्छा असते, मात्र जागरुकतेच्या अभावी कुटुंबीय, मित्र किंवा अशा घटनेच्या वेळी तिथे हजर असलेल्या लोकांना रुग्णाची प्रभावीपणे मदत कशी करता येईल हे नेमकं कळत नाही.
हृदयाचे ठोके थांबतात किंवा शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांपर्यंत रक्त पोहोचवण्याचे कार्य पार पाडण्यास ते असमर्थ ठरते तेव्हा सीपीआरचे तंत्र वापरणे हा एक अत्यंत महत्त्वाचा हस्तक्षेप ठरू शकतो. हार्ट अटॅक किंवा बुडणाऱ्या माणसाला वाचविण्याच्या प्रयत्नांसारख्या इतर जीवघेण्या स्थितीमध्येही त्याचा वापर निर्णायक ठरू शकतो. मात्र, जीव वाचविण्याची क्षमता असूनही भारताच्या एकूण लोकसंख्येतील २ टक्क्यांहून अधिक लोकांना जीवनमरणाच्या प्रसंगी उपयुक्त ठरणाऱ्या सीपीआरची माहिती नाही. जागरुकतेच्या बाबतीत असलेली ही प्रचंड दरी लक्षात आल्यानेच एचडीएफसी लाइफ (HDFC Life)ला जागतिक हृदय दिनाच्या औचित्याने ‘द मिसिंग बीट’ मोहीम सुरू करण्याची प्रेरणा मिळाली.
चार व्यक्ती, त्यांची स्वप्ने, त्यांची नाती व त्यांच्या असुरक्षितता यांचे दर्शन घडविणाऱ्या त्यांच्या भावनिक वाटचालीचा मागोवा घेणारी एक हृद्य फिल्म या मोहिमेच्या केंद्रस्थानी असणार आहे. या चौघांपैकी प्रत्येकाच्या गोष्टीमध्ये आपल्या आयुष्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरू शकणाऱ्या प्रसंगांसाठी सज्ज राहण्याच्या महत्त्वावर भर देण्यात आला आहे व हृदयाशी संबंधित आणीबाणीच्या स्थिती हाताळण्यातील सीपीआर तंत्राची जीवनरक्षक क्षमता दाखविण्यात येणार आहे. या फिल्मच्या माध्यमातून प्रेक्षकांशी वैयक्तिक पातळीवर संवाद साधणे व सीपीआर सज्ज असल्याने तुम्हाला कुणालातरी जीवदान देता येईल हा संदेश ठळकपणे मांडणे हे या फिल्मचे लक्ष्य आहे.
या मोहिमेविषयी बोलताना एचडीएफसी लाइफचे चीफ मार्केटिंग ऑफिसर आणि स्ट्रॅटेजी विभागाचे ग्रुप हेड विशाल सबरवाल म्हणाले, “प्रतिष्ठा आणि आत्मसन्मान या गोष्टी केवळ आर्थिक स्वातंत्र्यातूनच नव्हे तर निर्णायक क्षणी इतरांची मदत करण्याच्या क्षमतेमधूनही मिळतो असे एचडीएफसी लाइफमध्ये आम्हाला ठामपणे वाटते. ही मोहीम केवळ जागरुकता निर्माण करण्यासाठी नसून कृती करण्यासाठी प्रेरणा देणारी आहे. आम्हाला प्रत्येक भारतीय नागरिकाला CPR सज्ज होण्याच्या दिशेने पहिले पाऊल उचलण्यासाठी प्रोत्साहित करायचे आहे. योग्य ज्ञान आणि तयारी यांच्या मदतीने आपण प्राण वाचवू शकतो आणि ‘सर उठा के जियो’ या ओळीचे मर्म खऱ्या अर्थाने जगू शकतो.”
एलएस डिजिटलच्या एलएस क्रिएटिव्हचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ क्रिएटिव्ह ऑफिसर मनेश स्वामी म्हणाले, “जिथे लोकांच्या आयुष्यावर थेट प्रभाव टाकेल असे काहीतरी ठोस काम करण्यासाठी जाहिरातदार आणि सर्जनशील क्षेत्रातील व्यक्ती एकत्र येतात अशा काही दुर्मिळ संयोगांपैकी हा एक संयोग आहे. गेल्या काही वर्षांपासून आपण अचानक झालेल्या कार्डिअॅक अरेस्टच्या भीतीदायक कहाण्या बातम्यांतून, इंटरनेवर आणि अगदी आपल्या आप्तेष्टांकडूनही आपल्या कानांवर येत आहेत. ‘द मिसिंग बीट’च्या निमित्ताने आम्हाला केवळ एका जाहिरात मोहिमेच्या पलीकडे जात काही साध्य करायचं आहे – ही एक चळवळ आहे, कृतीसाठी केलेले एक व्यापक आव्हान आहे, सीपीआरची माहिती असल्याने जगण्यामरण्याचा फरक पडू शकतो याची आठवण करून देणारा हा उपक्रम आहे.”
ते पुढे म्हणाले, “प्रेक्षकांशी संवाद साधणारी ही रचना साकारण्याचा प्रवास आमच्या टीमसाठी खूप आपलासा होता. आम्ही गेल्या वर्षभराहून अधिक काळ या मोहिमेसाठीचे संशोधन करत होतो; आम्ही जमा केलेला डेटा आणि आकडेवारी मन विषण्ण करणारी होती आणि याविषयी तत्काळ काहीतरी करण्याची गरज आम्हाला जाणवली. प्रेक्षकांनी ही फिल्म फक्त पाहू नये तर यातून सीपीआरची निकड आणि महत्त्व त्यांना जाणवावे अशी आमची इच्छा होती. या फिल्ममधली प्रत्येक चित्रचौकट आणि गोष्ट खऱ्या घटनांवरून तयार करण्यात आल्या, जेणेकरून प्रेक्षकांचे त्यांच्याशी भावनिक नाते जोडले जावे व परिस्थितीचे गांभीर्य त्यांना पूर्णपणे लक्षात यावे. या फिल्मच्या माध्यमातून आम्ही या साध्यासोप्या, जीवनरक्षक कौशल्याचे महत्त्व ओळखण्यासाठी लोकांना प्रेरित करू शकू आणि या देशाला सीपीआर सज्ज करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकू शकू अशी आम्हाला आशा आहे. आम्ही फक्त गोष्टी सांगत नसून असहाय्यतेवर विजय मिळविण्यासाठी कृती करण्यास प्रोत्साहन देत आहोत.”
आर्थिक वर्ष २०२४ मध्ये एचडीएफसी लाइफने ६.६ कोटी आयुष्यांना विमाकवच प्रदान केले व व्यक्तिगत दावे पूर्ण करण्याचे प्रमाण ९९.५ टक्क्यांवर पोहोचविण्यात यश मिळवले. यातून कंपनीची विमाधारक व त्यांच्या कुटुंबियांप्रती दृढ बांधिलकी दिसून आली आहे.