Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Syria News in Marathi : मॉस्को : एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. सीरियाचे (Syria) माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला आहे. सध्या ते सीरियातील सत्तापालटानंतर मॉस्कोमध्ये आश्रयित आहे. येथे त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, असद यांना विष देण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यता आले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सीरियात मोठा सत्तापालट झाला. सीरियामध्ये बंडखोर गट हयात तहरीरने अध्यक्ष बशर अल-असद यांना सत्तेतून हाकूलन लावले. त्यानंतर त्यांनी आपल्या कुटूंबीयांसोब मॉस्कोमध्ये आश्रय देण्यात घेतला होता. रशियाने (Russia) त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला सुरक्षा उपलब्ध करुन दिली होती.
मानवाधिकार संघटनांच्या मते, असद यांच्या हत्येचा जाणूनबुजून करण्यात आला आहे. यामागे रशियाची प्रतिमा खरबा करण्याचा हेतू आहे. या खुनाचा आरोप थेट मॉस्कोवर व्हावा याच अनुषांघाने ही हत्या करण्याचा हा प्रयत्न करण्यात आला आहे. सध्या रशियाने यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
असद यांना मारण्याचा हा पहिला प्रयत्न नाही. यापूर्वी देखील रशियात त्यांना विष देऊन मारण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे सांगितले जाते. यापूर्वी त्यांना अचानक श्वास घेण्याचा त्रास होत होता, तसेच सतत खोकलाही येत होता. तपासणी दरम्यान त्यांना विषबाधा झाल्याचे आढळून आले होते. परंतु वेळेत उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण बचावले.
गेल्या वर्षी डिसेंबर २०२४ मध्ये बशर अल-असद यांना सीरियातून आपली सत्ता सोडून पळून जावे लागले होते. सीरियाची राजधानी दमास्कसवर बंडखोर गटांनी ताबा मिळवला होता. यामध्ये असद सैन्याचा पराभव झाला. त्यानंतर असद यांनी सीरियातून पळ काढला आणि आपल्या कुंटुबासह मॉस्कोत आश्रय घेतला. व्लादिमिर पुतिन यांना त्यांना राजकीय आश्रय दिला. तेव्हापासून असद कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी फारसे दिसले नाहीत. सीरियामध्ये सध्या नव्या सरकारची स्थापना सुरु आहे. यामुळे नव्या सरकारने रशियाला असद यांना त्यांच्याकडे सोपवण्याची रशियाकडे मागणी केली आहे. परंतु रशियाने याला स्पष्ट नकार दिला आहे.
प्रश्न १. रशियात माजी राष्ट्राध्यक्ष बशर-अल असद यांच्यासोबत काय घडले?
रशियामध्ये सीरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांना मारण्याच प्रयत्न करण्यात आला. त्यांना विष देण्याचा प्रयत्न झाला.
प्रश्न २. बशर अल-असद यांना विष दिल्यानंतर प्रकृती कशी आहे?
बशल अल-असद यांना विष देण्यात आल्यानंतर त्यांना रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.
प्रशन ३. रशियाने बशरच्या हत्येच्या प्रयत्नावर काय प्रतिक्रिया दिली?
रशियाने बशर यांच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या हल्लेखोराचा शोध सुरु केला आहेत. तसेच घटनेवर दु:ही व्यक्त केले आहे.
१० लाख नोकऱ्या अन् ९ लाखाची गुंतवणूक…; भारत आणि युरोपीय देशांमध्ये FTA करार लागू