Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय विमा क्षेत्रात मोठी घडामोडी! लिबर्टी म्युच्युअलने ‘लिबर्टी जनरल इन्शुरन्स’मधील हिस्सा ७४ टक्क्यांवर नेला

लिबर्टी म्युच्युअलने भारतातील लिबर्टी जनरल इन्शुरन्समधील आपले भागभांडवल ७४% पर्यंत वाढवले आहे. यामुळे भारतात कंपनीचे वितरण जाळे आणि रिटेल विमा क्षेत्राचा मोठा विस्तार होणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 18, 2026 | 05:54 PM
लिबर्टी म्युच्युअलने 'लिबर्टी जनरल इन्शुरन्स'मधील हिस्सा ७४ टक्क्यांवर नेला

लिबर्टी म्युच्युअलने 'लिबर्टी जनरल इन्शुरन्स'मधील हिस्सा ७४ टक्क्यांवर नेला

Follow Us
Follow Us:

 

  • भारतीय विमा क्षेत्रात मोठी घडामोडी!
  • लिबर्टी म्युच्युअलने ‘लिबर्टी जनरल इन्शुरन्स’मधील हिस्सा ७४ टक्क्यांवर नेला
मुंबई, १८ मे २०२६: ‘लिबर्टी जनरल इन्शुरन्स लिमिटेड’ (एलजीआय) मधील आपले भागभांडवल वाढवून ७४ टक्क्यांवर नेले असल्याची घोषणा लिबर्टी म्युच्युअल इन्शुरन्सने आज केली आहे. यापूर्वी सप्टेंबर २०२५ मध्ये लिबर्टी म्युच्युअलने आपला हिस्सा ४९ टक्क्यांवरून ५५.४० टक्के केला होता. त्यानंतर आता भागभांडवलात कंपनीने ही नव्याने वाढ केली आहे.

भांडवली हिस्सा वाढविण्याच्या घडामोडीसंदर्भात बोलताना ‘लिबर्टी जनरल इन्शुरन्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि पूर्णवेळ संचालक श्री. पराग वेद म्हणाले, “लिबर्टी म्युच्युअलच्या अधिक भक्कम पाठबळामुळे आम्ही आता आमचे वितरण जाळे देशभर विस्तारण्यासाठी त्याचबरोबर रिटेल आणि व्यावसायिक क्षेत्रात आमची उपस्थिती अधिक मजबूत करण्यासाठी अतिशय उत्तम स्थितीत आहोत. सतत बदलणाऱ्या या बाजारपेठेत परिस्थितीनुसार स्वतःला योग्य स्थितीत ठेवताना मजबूत पायावर आधारलेला, सातत्यपूर्ण आणि लवचिक व्यवसाय उभारण्यावर आमचे लक्ष केंद्रित राहणार आहे.”

श्री. वेद आणखी टिप्पणी करताना पुढे म्हणाले, “भारतात असलेली विविधता आणि विमा संरक्षणाच्या वाढती मागणी यामुळे विमा व्यवसायाला विस्ताराची अनोखी संधी आहे. देशात विम्याचा प्रसार वाढवण्यात आम्ही मोलाची भूमिका बजावू शकतो. या क्षेत्रात वाटचाल करत असताना, शाश्वत आणि फायदेशीर वाढ मिळवणे, आमच्या भागधारकांसोबतचा विश्वास अधिक दृढ करणे याला आमचे प्राधान्य आहे आणि आमचे ग्राहक, भागीदार तसेच आम्ही सेवा देत असलेल्या समाजासाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.”

Narendra Modi : “भारतात गुंतवणुकीची सुवर्णसंधी…”, युरोप दौऱ्यात पीएम मोदींची मोठी घोषणा

या घडामोडीवर भाष्य करताना ‘लिबर्टी इंटरनॅशनल इन्शुरन्स एपीएसी’चे अध्यक्ष श्री. मॅथ्यू जॅक्सन म्हणाले, “आम्ही आशिया पॅसिफिक क्षेत्रात आमचा व्यवसाय विस्तारत आहोत आणि मजबूत पाया आणि वाढीच्या अफाट संधींमुळे भारत ही लिबर्टी म्युच्युअलसाठी एक अत्यंत महत्त्वाची बाजारपेठ राहिलेली आहे. ‘लिबर्टी जनरल इन्शुरन्स’मधील आमचे भागभांडवल वाढवल्यामुळे आम्हाला या व्यवसायाचा आणखी विकास करण्यास त्याचबरोबर आमच्या जागतिक क्षमता थेट या बाजारपेठेत आणण्यास खूप मदत होणार आहे.”

लिबर्टी म्युच्युअल इन्शुरन्स ग्रुपचा फॉर्च्यून ५०० कंपन्यांच्या यादीत ९१ व्या क्रमांकावर आहे आणि मालमत्ता व अपघात विमा क्षेत्रात ती जागतिक स्तरावर ९ वी सर्वात मोठी कंपनी आहे. २०२५ मध्ये या कंपनीची एकूण मालमत्ता १७८.२ अब्ज डॉलर्स आणि एकूण महसूल ५०.५ अब्ज डॉलर्स आहे.

Share Market Today: सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणावर उघडण्याची शक्यता; तज्ज्ञांनी दिले ‘हे’ शेअर्स खरेदीचे संकेत

Web Title: Liberty mutual increases stake to 74 percent in liberty general insurance india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 05:54 PM

Topics:  

  • Business News

संबंधित बातम्या

Lilavati Hospital चा मोठा उपक्रम! श्रवणदोष असलेल्या मुलांसाठी ‘ऑडिटरी व्हर्बल थेरपी’ क्लिनिक सुरू
1

Lilavati Hospital चा मोठा उपक्रम! श्रवणदोष असलेल्या मुलांसाठी ‘ऑडिटरी व्हर्बल थेरपी’ क्लिनिक सुरू

Fintech Industry : केवळ कर्ज देणे पुरेसे नाही, जबाबदार सवयी महत्त्वाच्या! फिनटेक क्षेत्राच्या भविष्याबाबत तज्ज्ञांचा मोठा दावा
2

Fintech Industry : केवळ कर्ज देणे पुरेसे नाही, जबाबदार सवयी महत्त्वाच्या! फिनटेक क्षेत्राच्या भविष्याबाबत तज्ज्ञांचा मोठा दावा

12 लाखांहून अधिक रुग्णांना मिळणार लाभ! भारतातील सर्वात मोठे ‘पेशंट सपोर्ट प्लॅटफॉर्म’!  HCAH अन् QMS चा मोठा निर्णय
3

12 लाखांहून अधिक रुग्णांना मिळणार लाभ! भारतातील सर्वात मोठे ‘पेशंट सपोर्ट प्लॅटफॉर्म’! HCAH अन् QMS चा मोठा निर्णय

Lilavati Hospital Robotic O-Arm: लीलावती हॉस्पिटलमध्ये स्पाईन सर्जरीचा नवा अध्याय! AI-सक्षम रोबोटिक O-Arm तंत्रज्ञानाची एन्ट्री
4

Lilavati Hospital Robotic O-Arm: लीलावती हॉस्पिटलमध्ये स्पाईन सर्जरीचा नवा अध्याय! AI-सक्षम रोबोटिक O-Arm तंत्रज्ञानाची एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.