Share Market Today: सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणावर उघडण्याची शक्यता; तज्ज्ञांनी दिले ‘हे’ शेअर्स खरेदीचे संकेत
Todays Gold-Silver Price: सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा घसरण; 10 ग्रॅमसाठी मोजावे लागणार इतके पैसे
शुक्रवारी, नफावसुलीमुळे भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला आणि निफ्टी ५० २३,६५० च्या पातळीखाली स्थिरावला. सेन्सेक्स १६०.७३ अंकांनी, म्हणजेच ०.२१ टक्क्यांनी घसरून ७५,२३७.९९ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ४६.१० अंकांनी, म्हणजेच ०.१९ टक्क्यांनी घसरून २३,६४३.५० वर स्थिरावला. शुक्रवारी बँक निफ्टी निर्देशांक ४१८.६० अंकांनी, म्हणजेच ०.७७ टक्क्यांनी घसरून ५३,७१०.३५ अंकांवर बंद झाला. आठवड्याभरात बँक निफ्टी निर्देशांकात २.८९ टक्क्यांची मोठी घसरण झाली. (फोटो सौजन्य – Pinterest)
मास्टर कॅपिटल सर्व्हिसेसचे मुख्य संशोधन अधिकारी, रवी सिंग यांनी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांना १० शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. ज्यामध्ये डीएलएफ, कोफोर्ज, भारत इलेक्ट्रॉनिक्स (बीईएल), एसआरएफ, अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइज, एनटीपीसी, ऑरोबिंदो फार्मा, कोल इंडिया, हिंदुस्तान झिंक, मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) या शेअर्सचा समावेश आहे. निओट्रेडरचे सह-संस्थापक आणि स्टॉक रिसर्च प्लॅटफॉर्म मार्केटस्मिथ इंडियाचे राजा व्यंकटरमण यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार लॅटेंट व्ह्यू ॲनालिटिक्स लिमिटेड, ॲम्बर एंटरप्रायझेस इंडिया लिमिटेड, ग्राफाइट इंडिया लिमिटेड आणि श्रीजी शिपिंग ग्लोबल लिमिटेड हे शेअर्स खरेदी करू शकतात.
प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनिी आज गुंतवणूकदारांना ॲस्ट्राझेनेका फार्मा, सुझलॉन एनर्जी आणि प्रिझम जॉन्सन या तीन शेअर्सची खरेदी आणि विक्री करण्याचा सल्ला दिला आहे. आनंद राठी शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स येथील इक्विटी टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक, जिगर एस. पटेल यांनी पुढील १-२ आठवड्यांसाठी खरेदी करण्यासाठी कोटक महिंद्रा बँक, अशोक लेलँड आणि बिकाजी फूड्स इंटरनॅशनल या स्टॉक्सची निवड केली आहे.
आजच्या व्यवहारात भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार इंडियन ऑइल, ओला इलेक्ट्रिक, जेएसडब्ल्यू सिमेंट, व्होडाफोन आयडिया, हिंदुस्तान कॉपर, टाटा स्टील, पॉवर फायनान्स, भारतीय पोलाद प्राधिकरण, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, कोचीन शिपयार्ड, प्रीमियर एनर्जीज, बजाज इलेक्ट्रिकल्स, दिल्लीवरी, एमक्योर फार्मा, एनसीसी या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी संवर्धन मदरसन इंटरनॅशनल, इंडो काउंट इंडस्ट्रीज, हेल्थकेअर ग्लोबल एंटरप्रायझेस, ग्राइंडवेल नॉर्टन आणि हिंदुस्तान ऑइल एक्सप्लोरेशन कंपनी या शेअर्सची शिफारस केली आहे.






