Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ Made In India वॉटर प्‍युरिफिकेशन ब्रँडच्या तिसऱ्या तिमाहीत झाली दमदार वाढ

लिव्‍हप्‍युअर आघाडीच्‍या वॉटर प्‍युरिफिकेशन ब्रँडच्या आर्थिक वर्ष २५ च्‍या तिसऱ्या तिमाहीत वाढ झाली आहे. कंपनीच्या नफ्यात किती वाढ झाली आहे, याबद्दल जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 18, 2025 | 08:40 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

लिव्‍हप्‍युअर या भारतातील ऑफलाइन विभागामधील आघाडीच्‍या वॉटर प्‍युरिफिकेशन ब्रँडने गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत आर्थिक वर्ष २५ च्‍या तिसऱ्या तिमाहीतील एकूण महसूलामध्‍ये ३४ टक्‍के वाढीची घोषणा केली आहे. लिव्‍हप्‍युअर ऑफलाइन एम्‍बेडेड सर्विस बाजारपेठेत पहिल्‍या क्रमांकाचा वॉटर प्‍युरिफायर ब्रँड बनला, तसेच उद्योगामधील त्‍यांचे नेतृत्‍व अधिक दृढ झाले आहे.

कंपनीचा नाविन्‍यता, ग्राहक-केंद्रित धोरणे आणि कार्यरत सर्वोत्तमतेवरील सातत्‍यपूर्ण फोकस या प्रभावी कामगिरीला चालना देण्‍यामध्‍ये साह्यभूत राहिला आहे. आमची प्रबळ अंमलबजावणी आणि मूल्‍यनिर्मितीवरील फोकस तिसऱ्या तिमाहीमध्‍ये ईबीआयटीडीएमधील वार्षिक १४९ टक्‍क्‍यांच्‍या वाढीसह स्‍पष्‍टपणे दिसून आला आहे. उद्योग-अग्रणी नेट प्रमोटर स्‍कोअर ८१ सह लिव्‍हप्‍युअर वॉटर प्‍युरिफिकेशन आणि होम सोल्‍यूशन्‍समधील विश्‍वसनीय नाव म्‍हणून आपले नाव अधिक दृढ करत आहे.

Bank Holiday: शिवजयंतीच्या दिवशी बँका बंद, RBI ने जारी केला आदेश, पाहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

कंपनीची विकासगती विविध विक्री चॅनेल्‍समध्‍ये दिसून आली. जनरल ट्रेडने अनपेक्षित 108 टक्‍के वाढीची नोंद केली, तर मॉडर्न ट्रेडने 32 टक्‍के वाढ केली. सीएसडी सीपीसी चॅनेल्‍सनी 36 टक्‍के वाढ केली. या आकडेवारींमधून उत्तमरित्‍या डिझाइन केलेल्‍या मल्‍टी-चॅनेल दृष्टिकोनाच्‍या माध्‍यमातून विविध ग्राहक विभागांच्‍या गरजांची पूर्तता करण्‍याप्रती लिव्‍हप्‍युअरची क्षमता दिसून येते.

लिव्‍हप्‍युअरच्‍या श्रेणीनुसार वाढीमधून होम सोल्‍यूशन्‍स बाजारपेठेतील त्‍यांचे वाढते फूटप्रिंट दिसून येते. वॉटर प्‍युरिफायर विभागाने 26 टक्‍क्‍यांची वाढ केली, ज्‍यामधून श्रेणीमधील कंपनीच्‍या नेतृत्‍वाची पुष्‍टी मिळते. किचन अप्‍लायन्‍सेस विभागाने अपवादात्‍मक १४५ टक्‍के वाढ केली, तर एअर कूलर्स विभागाने उल्‍लेखनीय १५४ टक्‍के वाढ केली. कंपनीच्‍या डब्‍ल्‍यूएएएस विभागाने विकासगती कायम राखली, जेथे ४६ टक्‍के वाढ केली. यामधून सबस्क्रिप्‍शन-आधारित वॉटर सोल्‍यूशन्‍ससाठी वाढती ग्राहक पसंती दिसून येते.

डेलॉइट इंडियाने केली एंटरप्राइझ ग्रोथ अवॉर्ड्स २०२५ साठी परीक्षक मंडळाची घोषणा

लिव्‍हप्‍युअरचे व्‍यवस्‍थापकीय संचालक राकेश कौल म्‍हणाले, ”आमच्‍या तिसऱ्या तिमाहीमधील निकालांमधून ग्राहकांचे जीवन संपन्‍न करणारे उच्‍च दर्जाचे सोल्‍यूशन्‍स वितरित करण्‍याप्रती लिव्‍हप्युअरची समर्पितता निदर्शनास येते. तिसऱ्या तिमाहीमध्‍ये महसूलात ३४ टक्‍क्‍यांची अपवादात्‍मक वाढ आणि ईबीआयटीडीएमध्‍ये १४९ टक्‍के वाढ यामधून ग्राहकांचा आमच्‍या ब्रँडवर असलेला विश्‍वास दिसून येतो. आमचा सतत नाविन्‍यता, कार्यरत कार्यक्षमता व बाजारपेठ विस्‍तारीकरणावर फोकस आहे. रिलिव्‍ह सारख्‍या उपक्रमांसह आम्‍ही व्‍यवसाय यशस्‍वी होण्‍याला गती देत आहोत, तसेच समाजात अर्थपूर्ण प्रभाव घडवून आणत आहोत. आम्‍ही पुढे जात आगामी संधींबाबत उत्‍सुक आहोत आणि प्रत्‍येक कुटुंबासाठी लिव्‍हप्‍युअर अनुभव अधिक उत्‍साहित करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत.”

Web Title: Livpure fy 25 third quarter results 34 percent increase in total revenue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2025 | 08:40 PM

Topics:  

  • Business News
  • Marathi News

संबंधित बातम्या

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन
1

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन

भारतीय कापड, हिरे, रसायन उद्योगातील एमएसएमईंना सर्वाधिक फटका, काय सांगतो CRISIL अहवाल? जाणून घ्या
2

भारतीय कापड, हिरे, रसायन उद्योगातील एमएसएमईंना सर्वाधिक फटका, काय सांगतो CRISIL अहवाल? जाणून घ्या

सलग पाचव्या दिवशी बाजार तेजीत, IT शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे सेन्सेक्स २१३ अंकांनी वधारला; निफ्टी २५०५० वर झाला बंद
3

सलग पाचव्या दिवशी बाजार तेजीत, IT शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे सेन्सेक्स २१३ अंकांनी वधारला; निफ्टी २५०५० वर झाला बंद

भारतीय ग्राहकांसाठी ट्रॅव्हल-रिटेल लॉयल्टी प्रोग्रामसाठी मॅरियट बोनव्हॉय आणि फ्लिपकार्टची भागीदारी
4

भारतीय ग्राहकांसाठी ट्रॅव्हल-रिटेल लॉयल्टी प्रोग्रामसाठी मॅरियट बोनव्हॉय आणि फ्लिपकार्टची भागीदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.