Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Magicbricks Housing Sentiment : भाड्याच्या घराला रामराम! तरुण भारतीयांमध्ये घर खरेदी करण्याचं क्रेझ; 3-4 BHK घरांना मोठी पसंती

Magicbricks Housing Sentiment : आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त मॅजिकब्रिक्सने प्रसिद्ध केलेल्या ताज्या 'हाउसिंग सेंटीमेंट इंडेक्स' (HSI) अहवालानुसार, भारतात Gen Z आणि प्रथमच घर खरेदी करणारे तरुण घरमालकीबाबत सर्वाधिक सकारात्मक आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 12, 2026 | 04:25 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • भाड्याच्या घराला रामराम!
  • तरुण भारतीयांमध्ये घर खरेदी करण्याचं क्रेझ;
  • 3-4 BHK घरांना सर्वाधिक पसंती!
Magicbricks Housing Sentiment : आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त मॅजिकब्रिक्सच्या ताज्या हाउसिंग सेंटीमेंट इंडेक्स (HSI) अहवालातून तरुण भारतीयांमध्ये घरमालकीची तीव्र आकांक्षा असल्याचे अधोरेखित झाले आहे. सर्व वयोगटांमध्ये Gen Z ने घरखरेदीबाबत सर्वाधिक सकारात्मक भावना नोंदवल्या आहेत.

Sony Pictures Network : सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडियाची भव्य फेस्टिव्ह स्लेट सादर! भेटीला येत आहेत तुमचे आवडते दिग्गज कलाकार

३० वर्षांपर्यंतच्या वयोगटातील Gen Z घरखरेदीदारांनी १२८ इतका HSI नोंदवला, जो Millennials च्या ११९ आणि Gen X च्या ११०–१०९ या HSI पेक्षा अधिक आहे. या निष्कर्षांवरून असे दिसून येते की, तरुण खरेदीदारांचा घरमालकीबाबतचा आत्मविश्वास कायम अधिक आहे, तर वय वाढत गेल्याने घरखरेदीविषयीची सकारात्मक भावना हळूहळू कमी होत जाते.

घर खरेदी करणाऱ्यांपैकी जवळपास ७५% जणांचे वय ४४ वर्षांपर्यंत

प्रथमच घर खरेदी करणाऱ्यांनी १३० इतका सर्वाधिक HSI नोंदवला आहे. त्यानंतर घरमालकीच्या उद्देशाने भाड्याने राहणाऱ्यांचा HSI ११८, तर दुसरे घर खरेदी करू इच्छिणाऱ्या विद्यमान घरमालकांचा HSI ११० इतका आहे. प्रथमच घर खरेदी करणाऱ्यांपैकी जवळपास ७५% जणांचे वय ४४ वर्षांपर्यंत आहे. यावरून भारतातील घरमालकीच्या मागणीत तरुण कुटुंबांची भूमिका महत्त्वाची असल्याचे अधोरेखित होते.

HSI सर्वेक्षणातील महिलांचा सहभाग ४०% पर्यंत वाढला

या निष्कर्षांमधून निवासी मालमत्तेबाबत निर्णय घेणाऱ्यांचा आधार अधिक व्यापक होत असल्याचेही दिसून येते. HSI सर्वेक्षणातील महिलांचा सहभाग मागील आवृत्तीतील १८% वरून ऑगस्ट २०२६ मध्ये ४०% पर्यंत वाढला असून, मागील आवृत्तीच्या तुलनेत त्यात दुपटीहून अधिक वाढ झाली आहे.

घरमालकीची आकांक्षा कायम मजबूत

घरमालकीची आकांक्षा कायम मजबूत असली तरी खरेदीदारांच्या अपेक्षा अधिक वास्तववादी होत आहेत. सध्या भारतीय घरखरेदीदार त्यांच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्नाच्या सरासरी ४.९ पट किमतीच्या मालमत्ता खरेदी करण्याचे लक्ष्य ठेवत आहेत, तर मागील आवृत्तीत हे प्रमाण ५.२ पट होते. अहवालानुसार, ६९% प्रतिसादकर्त्यांना पुढील वर्षभरात मालमत्तांच्या किमतीत कोणतीही वाढ होणार नाही किंवा जास्तीत जास्त ५% पर्यंत वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. यावरून नजीकच्या काळातील घरांच्या किमतीतील वाढीबाबत खरेदीदारांच्या अपेक्षा अधिक मोजून-मापून असल्याचे दिसून येते.

३ BHK श्रेणीपासून घरखरेदीविषयक सकारात्मक भावना

तरुण खरेदीदारांकडून मोठ्या घरांना असलेल्या पसंतीलाही चालना मिळत आहे. ३ BHK श्रेणीपासून घरखरेदीविषयक सकारात्मक भावना अधिक मजबूत होत असून, ४ BHK घरांनी १३१ इतका सर्वाधिक HSI नोंदवला आहे. त्यानंतर ४+ BHK घरांचा HSI १२८ इतका आहे. अहवालानुसार, ३ BHK आणि त्याहून मोठ्या घरांच्या पर्यायांना अद्याप चांगला प्रतिसाद मिळत असून, कुटुंबासाठी योग्य असलेल्या मोठ्या घरांची मागणी कायम असल्याचे यातून दिसून येते.

एकूण घरखरेदीविषयक भावना

घर खरेदी करण्याचा एकूण कल सकारात्मकच

 काही प्रमाणात कमी झाल्या असल्या तरी, घर खरेदी करण्याचा एकूण कल सकारात्मकच आहे. ५४% प्रतिसादकर्त्यांनी पुढील ६–१२ महिन्यांत घर खरेदी करण्याचा मानस व्यक्त केला आहे, ज्यातून नजीकच्या काळातील घरांच्या मागणीचा कल कायम असल्याचे दिसून येते. त्याचवेळी, किमतींबाबतच्या अपेक्षांमध्ये खरेदीदार अधिक सावध भूमिका घेत आहेत. जवळपास १० पैकी ७ खरेदीदारांना पुढील वर्षभरात घरांच्या किमती स्थिर राहतील किंवा जास्तीत जास्त ५% वाढतील, अशी अपेक्षा आहे.

मूल्य आणि दीर्घकालीन विचारांना प्राधान्य

“तरुण आणि प्रथमच घर खरेदी करणारे ग्राहक घरखरेदीविषयक सर्वाधिक सकारात्मक भावना कायम दर्शवत आहेत, जरी एकूण बाजारपेठेतील अपेक्षा अधिक मोजून-मापून होत असल्या तरी. या निष्कर्षांवरून तरुण भारतासाठी घरमालकीची आकांक्षा अद्यापही मजबूत असल्याचे स्पष्ट होते. तसेच, महिलांचा वाढता सहभाग निवासी मालमत्तेबाबत निर्णय घेणाऱ्या ग्राहकांचा आधार अधिक वैविध्यपूर्ण होत असल्याचे दर्शवतो. खरेदीदार या आकांक्षांचा समतोल साधताना परवडणारी किंमत, मूल्य आणि दीर्घकालीन विचारांना प्राधान्य देत आहेत,” असे प्रसून कुमार, चीफ मार्केटिंग ऑफिसर, मॅजिकब्रिक्स यांनी सांगितले.

N Chandrasekaran Resigns : टाटा समूहात मोठी खळबळ! एन. चंद्रशेखरन यांचा Tata Sons च्या अध्यक्षपदाचा दिला राजीनामा; नेमकं कारण काय?

Web Title: Magicbricks housing sentiment index gen z and first time home buyers lead

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 04:25 PM

Topics:  

  • Business News
  • Gen Z
  • Marathi News

संबंधित बातम्या

Guru Purnima: गुरुपौर्णिमेनिमित्त ‘प्रणाम’ संगीतोत्सव; जयतीर्थ मेवुंडी, देवकी पंडित, फजल-तौफिक कुरेशींसह दिग्गजांची मांदियाळी
1

Guru Purnima: गुरुपौर्णिमेनिमित्त ‘प्रणाम’ संगीतोत्सव; जयतीर्थ मेवुंडी, देवकी पंडित, फजल-तौफिक कुरेशींसह दिग्गजांची मांदियाळी

Yezdi Roadster 2026 : हॉकीचा माजी कर्णधार पी. आर. श्रीजेशच्या ताफ्यात नवी ‘येझदी’! ग्रीन मांबा रोडस्टरच्या लुकने जिंकले मन
2

Yezdi Roadster 2026 : हॉकीचा माजी कर्णधार पी. आर. श्रीजेशच्या ताफ्यात नवी ‘येझदी’! ग्रीन मांबा रोडस्टरच्या लुकने जिंकले मन

Chandrapur News: अडीच महिने उलटले, तरी करार रखडला; चंद्रपुरातील शाळांमध्ये पोषण आहारासाठी शिक्षकांची उधारी
3

Chandrapur News: अडीच महिने उलटले, तरी करार रखडला; चंद्रपुरातील शाळांमध्ये पोषण आहारासाठी शिक्षकांची उधारी

Raigad News: ४० वर्षांचा संघर्ष संपणार? नवीन शेवा आणि हनुमान कोळीवाड्याचा जेएनपीएविरोधात बेमुदत धरणे आंदोलनाचा निर्धार
4

Raigad News: ४० वर्षांचा संघर्ष संपणार? नवीन शेवा आणि हनुमान कोळीवाड्याचा जेएनपीएविरोधात बेमुदत धरणे आंदोलनाचा निर्धार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.