म्हणून एकनाथ शिंदेंनी फडणवीस, अजित पवारांसोबत जाणं टाळलं; या नेत्याने सांगितलं खरं कारण
महाराष्ट्रात पुन्हा एकदा फडणवीस सरकार सत्तेवर आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता.५) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दोघांच्याही मालमत्तेचा आढावा घेतल्यास मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापेक्षा उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे अधिक संपत्ती आहे. निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर नजर टाकली तर एकीकडे मुख्यमंत्री फडणवीस यांची संपत्ती 13.27 कोटी रुपये इतकी आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एकूण संपत्ती ही ३७ कोटी रुपये इतकी आहे.
कितीये फडणवीस यांची एकूण संपत्ती
फडणवीस यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार, त्यांची एकूण संपत्ती 13.27 कोटी रुपये इतकी आहे. तर त्यांच्यावर एकूण 62 लाख रुपयांचे कर्ज देखील आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यात 5 लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शेअर बाजार, बॉण्ड्स किंवा डिबेंचरमध्ये कोणतीही गुंतवणूक केलेली नाही. परंतु त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची बाँड, शेअर्स आणि म्युच्युअल फंडांमध्ये सुमारे 5.63 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे.
देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नीकडे सुमारे ९८ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 3 कोटींच्या घरात राहतात. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, स्थावर मालमत्तेत त्यांच्या आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या नावे १.२७ कोटी रुपयांची शेतजमीन आहे. तर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर 3 कोटी रुपयांचे घर आणि 47 लाख रुपयांचे दुसरे घर आहे. याशिवाय त्यांच्या पत्नीच्या नावावर ३६ लाख रुपयांची निवासी मालमत्ताही नोंदवण्यात आली आहे.
एचडीएफसी लाइफची ‘लाइफ फ्रीडम इंडेक्स’ची नवीन आवृत्ती प्रसिद्ध; वाचा… सविस्तर!
कितीये उपमुख्यमंत्री शिंदे यांची संपत्ती?
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांची एकूण संपत्ती 37,68,58,150 रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे केवळ पाच वर्षात त्यांची संपत्ती तीन पटीने वाढली आहे. एकनाथ शिंदे यांनी 2019 मध्ये निवडणूक लढवली तेव्हा त्यांनी 11,56,72,466 रुपयांची संपत्ती जाहीर केली होती.
निवडणुकीदरम्यान दिलेल्या मालमत्तेचा तपशील पाहिल्यास, एकनाथ शिंदे यांच्याकडे 1,44,57,155 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्याकडे 7,77,20,995 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. शिंदे यांच्याकडे 7,92,000 रुपयांचे सोन्याचे दागिने आहेत. तर त्यांच्या पत्नीकडे 41,76,000 रुपयांचे सोन्याचे दागिने आहेत.
Repo Rate : RBI कडून रेपोदराबाबत निर्णय जाहीर, तुमच्या EMI वर काय होईल परिणाम? वाचा सविस्तर बातमी
निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार एकनाथ शिंदे यांच्या स्थावर मालमत्तेबाबत बोलताना त्यांनी म्हटले आहे की, त्यांच्याकडे 13,38,50,000 रुपयांची स्थावर मालमत्ता असून, त्यात घर आणि जमिनीचा समावेश आहे. या प्रकरणात त्यांची पत्नीही पुढे असून, लता शिंदे यांच्या नावावर 15,08,30,000 रुपयांची स्थावर मालमत्ता नोंदणीकृत आहे.
फडणवीस की शिंदे? कोणावर आहे अधिक कर्ज?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांच्याही कर्जाबाबत बोलायचे झाले तर शिंदे पुढे आहेत. खरे तर, निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांच्या मालमत्तेचा तसेच दायित्वांचा तपशील दिला आहे. त्यानुसार एकनाथ शिंदे यांच्यावर 5,29,23,410 रुपये कर्ज आहे. तर त्यांची पत्नी लता शिंदे यांच्यावर 9,99,65,988 रुपयांचे कर्ज आहे. दोन्ही एकत्र घेतल्यास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुमारे १५ कोटी रुपयांचे कर्जदार आहेत. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिंदे यांच्या तुलनेत खूपच कमी कर्ज आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्यावर केवळ 62 लाखांचे कर्ज आहे. जे त्यांच्या पत्नीच्या नावावर आहे.