एचडीएफसी लाइफची 'लाइफ फ्रीडम इंडेक्स'ची नवीन आवृत्ती प्रसिद्ध; वाचा... सविस्तर!
भारतातील आघाडीच्या आयुर्विमा कंपन्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या एचडीएफसी लाइफने लाइफ फ्रीडम इंडेक्सची (एलएफआय) नवीनतम आवृत्ती प्रसिद्ध केली आहे. एलएफआयसाठी एचडीएफसी लाइफने २०११ साली सर्वेक्षण सुरू केले. हा निर्देशांक भारतीय ग्राहकांमधील ‘आर्थिक स्वातंत्र्या’च्या स्तराचे मापन करतो. सर्व वर्गांमधील उपभोक्त्यांच्या सातत्याने उत्क्रांत होत राहणाऱ्या आर्थिक गरजांबद्दल खोल माहिती पुरवण्यात या निर्देशांकाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
या सर्वेक्षणात प्रौढांच्या आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यांचे निरीक्षण केले जाते, त्यांचे वर्गीकरण तीन समूहांत केले जाते: यंग अस्पायरंट्स (तरुण महत्त्वाकांक्षी), प्राउड पेरेंट्स (पालकत्व अभिमानाने निभावणारे) आणि विजडम इन्व्हेस्टर्स (अनुभवाचा उपयोग करून गुंतवणूक करणारे).
एलएफआयमध्ये चार उपनिर्देशांक असतात:
● आर्थिक जागरूकता व परिचय निर्देशांक
● आर्थिक नियोजन निर्देशांक
● आर्थिक पर्याप्तता व समाधान निर्देशांक
● आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक
हे सर्वेक्षण (२०२४) निल्सेनआयक्यूने १५ शहरांमध्ये घेतले (४ विभाग व श्रेणी १, २, ३ शहरे यांचे उत्तम प्रतिनिधित्व) आणि त्यात २०७६ जणांनी भाग घेतला. २०२४ मधील ताज्या अभ्यासानुसार, लाइफ फ्रीडम इंडेक्स 70.8 अंकांवर आहे (२०२१ सालाच्या तुलनेत ९ अंक वर). कोविड साथीनंतर काहीशी खालावलेली ग्राहकांमधील भावना पूर्वपदावर आली असल्याचे यातून समजते. ग्राहकांच्या आर्थिक दृष्टिकोनातही आत्मविश्वासाच्या निकषावर एकूण सुधारणा झाली आहे.
Good News! शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, RBI ने घेतला महत्त्वाचा निर्णय, कर्ज घेणं आता सोपं होणार
एलएफआयच्या सर्व उपनिर्देशांकांमध्ये झालेल्या वाढीमुळेच ही वाढ झाली आहे. विशेषत: आर्थिक नियोजन आणि आर्थिक पर्याप्तता व समाधान या उपनिर्देशांकांमध्ये झालेली वाढ या वाढीला पूरक ठरली आहे. मात्र, आर्थिक जागरूकता व परिचय निर्देशांक तुलनेने कमी प्रमाणात वाढल्यामुळे आर्थिक उत्पादनांबद्दल अधिक चांगल्या पद्धतीने माहिती देण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
एलएफआयमुळे अधोरेखित झालेली आणखी एक बाजू म्हणजे ग्राहकांच्या प्राधान्यक्रमांची यादी. मुलांची आर्थिक सुरक्षितता, तंदुरुस्ती (शारीरिक व मानसिक दोन्ही) आणि स्वत:चे राहणीमान सुधारणे या यादीत अग्रक्रमाने येतात. निदर्शनास आलेला आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे सेवानिवृत्तीचे नियोजन हळूहळू एक आर्थिक जबाबदारी म्हणून महत्त्व प्राप्त करू लागले आहे, वयानुसार ही बाजू अधिकाधिक महत्त्वाची होत आहे. सेवानिवृत्तीचे नियोजन करताना उपभोक्ते आरोग्यासाठी, दैनंदिन आयुष्यासाठी व मुलांना मदत करण्यासाठी लागणाऱ्या पैशाचा विचार करतात.
Repo Rate : RBI कडून रेपोदराबाबत निर्णय जाहीर, तुमच्या EMI वर काय होईल परिणाम? वाचा सविस्तर बातमी
एचडीएफसी लाइफच्या स्ट्रॅटेजी विभागाचे समूह प्रमुख व मुख्य मार्केटिंग अधिकारी विशाल सभरवाल हा अहवाल प्रकाशित करताना म्हणाले, “भारतीय ग्राहकांमधील एकंदर आर्थिक सज्जतेचा निर्देशक प्राप्त व्हावा या उद्देशाने आम्ही लाइफ फ्रीडम इंडेक्स (एलएफआय) या सर्वेक्षणाची सुरुवात केली. हा निर्देशांक काळाच्या ओघात उत्क्रांत होत जाताना आम्ही पाहिला आहे, प्रत्येक सर्वेक्षणाच्या वेळी आर्थिक सज्जतेच्या निकषावरील ग्राहकांचा आत्मविश्वास सुधारलेला आम्हाला आढळला आहे. यातून आर्थिक सुरक्षिततेवर भर देऊन विकास आणि भवितव्याप्रती ठेवला जाणारा सकारात्मक दृष्टिकोन दिसून येतो.
यावर्षीच्या अभ्यासात काम करणाऱ्या स्त्रिया व श्रेणी ३ बाजारपेठांमधील आर्थिक स्वातंत्र्याचे स्तर उंचावल्याचे विशेषत्वाने दिसून आले. आयुर्विम्यावरील विश्वासाचा निर्देशांक (लाइफ इन्शुरन्स कॉन्फिडन्स इंडेक्स) लक्षणीयरित्या वाढला आहे, यातून आयुर्विम्याला सर्वांगीण आर्थिक नियोजनात दिले जाणारे महत्त्व अधोरेखित होत आहे. एचडीएफसी लाइफच्या माध्यमातून आम्ही करत असलेल्या प्रयत्नांना यातून आणखी चालना मिळेल असे आम्हाला वाटते. तसेच संपूर्ण आयुर्विमा उद्योगाच्या ‘२०४७ पर्यंत सर्वांना विमा’ पुरवण्याच्या प्रवासासाठीही या अभ्यासाची मदत होणार आहे.”