Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“तुमच्या सारख्या गद्दारांपेक्षा ते निष्ठावंत…; मुस्लीम महापौरवरुन टीका करणाऱ्या शिदेंवर संजय राऊतांचा घणाघात

खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला असून यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 13, 2026 | 12:06 PM
MP Sanjay Raut target DCM Eknath shinde over hindu muslim politics in maharashtra

MP Sanjay Raut target DCM Eknath shinde over hindu muslim politics in maharashtra

Follow Us
Follow Us:
  • खासदार संजय राऊतांची टीका
  • सय्यद इक्बाल हे परभणीचे महापौर झाल्याने दिले उत्तर
  • एकनाथ शिंदेंना म्हणाले अक्षरशत्रू
Sanjay Raut Live News : मुंबई : महापालिका निवडणुकांनंतर आता महापौर पदावरुन वाद निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या युती करण्यात आल्या आहेत. परभणीमध्ये ठाकरे गटाचे मुस्लीम नगरसेवक हे महापौर झाले आहेत. मात्र आता यावरुन विरोधकांनी जोरदार टीका केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखील मुस्लीम महापौरवरुन ठाकरे गटाला धारेवर धरलं. याबाबत खासदार संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला आहे. (Maharashtra Politics)

ठाकरे गटाचे सय्यद इक्बाल हे परभणीचे महापौर झाले आहेत. इक्बाल यांना 39 मतं मिळाली तर भाजपच्या उमेदवार तिरुमला खिल्लारे यांना 39 मतं मिळाली. त्यामुळे सय्यद इक्बाल हे महापौर झाले असून काँग्रेसचे गणेश देशमुख हे उपमहापौर झाले. खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. याबाबत ते म्हणाले की, “त्या एकनाथ शिंदे यांना सांगा जरा अभ्यास करा, डोक्याला तेल लावा थंड व्हा, त्यांना माहिती आहे का भाजपचे १२ नगरसेवक मुस्लिम आहेत. मुस्लिम काही घुसघोर नाहीत, आमचे तालुका प्रमुख आहेत पदाधिकारी आहेत. तुमच्या सारख्या गद्दारांपेक्षा ते निष्ठावंत बरे. तुम्ही काय मुसलमानांना तिकीट दिले नाही का? एकनाथ शिंदे हे अक्षरशत्रू आहेत. भाजपला संधी मिळाली असती तर त्या १२ मधूनच एक मुस्लिम महापौर झाला असता,” असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

हे देखील वाचा : खेडमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या भगवा लाटेचा धडाका; सत्तासमीकरणे बदलली, ठाकरे गटाला धक्का

 

पुढे ते म्हणाले की, “तुमच्यासारख्या बेईमान गद्दारांपेक्षा, ज्यांनी ज्या ताटात खाल्लं, तिथेच तंगडी वर करणारे हे सगळे लोक… त्यापेक्षा हे निष्ठावान शिवसैनिक आहेत. परभणीचे जे महापौर झालेत ते तालुकाप्रमुख आहे आमचा. अनेक वर्ष तो माणूस पक्षाचं काम करतोय, झिजतोय, पक्षाबरोबर राहिलेल्या अशा निष्ठावान शिवसैनिकाला जर परभणीत महापौर केलं तर गद्दारांच्या पोटात दुखणारंच,” अशी टीकाही खासदार संजय राऊतांनी केली.

“या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मुसलमान होते, मुंबई हायकोर्टामध्ये मुख्य न्यायाधीश मुस्लिम होते, उत्तर प्रदेश किंवा बिहारचे राज्यपाल मुस्लिम होते, या देशाचे राष्ट्रपाती वारंवार मुस्लिम झालेले आहेत. डॉ. अब्दुल कलाम हेही मुस्लिम होते ना…!” असे देखील खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.

हे देखील वाचा :  भारताच्या कोकिळा स्वातंत्र्यसेनानी सरोजिनी नायडू यांची जयंती; जाणून घ्या 13 फेब्रुवारीचा इतिहास

Web Title: Mp sanjay raut target dcm eknath shinde over hindu muslim politics in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 12:06 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • political news
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Political News : आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश
1

Political News : आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Devendra Fadnavis As Deputy PM: राजकारणात मोठा भूकंप होणार? देवेंद्र फडणवीस उपपंतप्रधान होणार; बड्या नेत्याचे खळबळजनक विधान
2

Devendra Fadnavis As Deputy PM: राजकारणात मोठा भूकंप होणार? देवेंद्र फडणवीस उपपंतप्रधान होणार; बड्या नेत्याचे खळबळजनक विधान

Vidhan Parishad: काँग्रेसचे ३ उमेदवार जाहीर! काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश अन् पोहरे यांना लागली लॉटरी
3

Vidhan Parishad: काँग्रेसचे ३ उमेदवार जाहीर! काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश अन् पोहरे यांना लागली लॉटरी

Sanjay Raut on Purnekar and CJP Protest: प्रदीप पुर्णेकरांचा खून पचू देणार नाही! अमित शाहांवर संजय राऊतांचा गंभीर आरोप
4

Sanjay Raut on Purnekar and CJP Protest: प्रदीप पुर्णेकरांचा खून पचू देणार नाही! अमित शाहांवर संजय राऊतांचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.