Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Insurance Market Crash : 24 तासांत 31400 कोटी स्वाहा! 18 वर्षांपासून प्रभाव असणाऱ्या कंपनीला मोठा झटका; नेमकं काय घडलं?

Insurance Market Crash : ३ मित्रांच्या एका दिग्गज कंपनीला बाजारात मोठा फटका बसला आहे. केवळ २४ तासांत कंपनीचे तब्बल ३१,४०० कोटी रुपये स्वाहा झाले असून शेअर्समध्ये मोठी पडझड पाहायला मिळाली आहे. अचानक झालेल्या या मोठ्या नुकसानाची मुख्य कारणे काय आहेत, कंपनीच्या भविष्यावर याचा काय परिणाम होणार?

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 25, 2026 | 06:32 PM
18 वर्षांपासून प्रभाव असणाऱ्या कंपनीला मोठा झटका ( सौजन्य - सोशल मीडिया )

18 वर्षांपासून प्रभाव असणाऱ्या कंपनीला मोठा झटका ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • 24 तासांत 31400 कोटी स्वाहा!
  • 18 वर्षांपासून प्रभाव असणाऱ्या कंपनीला मोठा झटका
  • नेमकं काय घडलं?
Insurance Market Crash : गेल्या १८ वर्षांपासून भारतीय विमा क्षेत्रात आपले वेगळे वर्चस्व निर्माण करणाऱ्या ३ मित्रांच्या एका दिग्गज कंपनीला बाजारात मोठा फटका बसला आहे. केवळ २४ तासांत कंपनीचे तब्बल ३१,४०० कोटी रुपये स्वाहा झाले असून शेअर्समध्ये मोठी पडझड पाहायला मिळाली आहे. नेमकी कोणती कंपनी आणि असं काय घडलं जाणून घेऊयात. ( Insurance Market Crash ) 

Indian Singles : कामाचा ताण अन् डिजिटल दुनियेत तरुण एकटे? डिजिटल कनेक्‍शन असूनही भारतातील तरुण त्रस्त; मॅच ग्रुप सर्व्हेचा दावा

२४ आणि २५ सप्टेंबर हे भारतातील आघाडीची विमा वेब एग्रीगेटर कंपनी, पॉलिसी बाजारसाठी खूप वाईट दिवस ठरले. कारण कंपनीचे शेअर्स ४० टक्क्यांपर्यंत घसरले. वास्तविक पाहता, विमा नियामक संस्था IRDAI चा एक प्रस्ताव पीबी फिनटेक म्हणजेच पॉलिसी बाजारची मूळ कंपनी सह इतर वित्तीय कंपन्यांसाठी घातक ठरला, ज्यामुळे त्यांच्या शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. परंतु, सर्वात मोठा फटका पॉलिसी बाजारच्या शेअर्सना बसला. पीबी फिनटेकच्या शेअर्समध्ये २ दिवसांत मोठी घसरण झाली आणि कंपनीचे बाजार भांडवल ३१४०० कोटी रुपयांनी कमी झाले.

IRDAI च्या प्रस्तावांमुळे नुकसान

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण IRDAI ने विमा वितरणाच्या अर्थशास्त्रात व्यापक बदलांचा प्रस्ताव दिला त्यामुळे गुरुवारी विमा वितरण प्लॅटफॉर्म पीबी फिनटेकच्या शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. सोप्या भाषेत सांगायचं तर या प्रस्तावात विमा व्यवसायातील कमिशन दरांवर मर्यादा घालण्याची शिफारस करण्यात आली आहे, ज्यामुळे विमा एग्रीगेटर कंपन्यांच्या महसुलाच्या संभाव्यतेबद्दल चिंता वाढली आहे.

कमी कमिशनमुळे व्यवसायात मंदी

पॉलिसी बाजारचे संपूर्ण महसूल मॉडेल विमा कंपन्यांकडून मिळणाऱ्या कमिशनवर अवलंबून आहे. विमा नियामकाच्या या प्रस्तावांमुळे त्यांच्या महसूल आणि नफ्यावर लक्षणीय परिणाम होण्याची शक्यता आहे. ब्रोकरेज फर्म जेफरीजने म्हटले आहे की, कमिशन दरांमध्ये १०% कपात केल्यास पीबी फिनटेकच्या एकूण महसुलात १०% ते १२% घट होऊ शकते.

३ मित्रांची कंपनी

पॉलिसीबझार, भारतातील अग्रगण्य विमा वेब एग्रीगेटरची स्थापना २००८ मध्ये गुडगाव येथे यशीश दहिया, आलोक बन्सल आणि अवनीश निर्जर यांनी केली. कंपनीचे सुरुवातीचे ध्येय विमा खरेदीसाठी एक ऑनलाइन व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे होते आणि तिथूनच पॉलिसीबझार एका ऑनलाइन ब्रोकरमध्ये विकसित झाले. गेल्या १८ वर्षांत, पीबी फिनटेकने एकल विमा बाजारपेठ म्हणून सुरू झालेल्या गोष्टीचे रूपांतर एका व्यापक आर्थिक प्लॅटफॉर्म सेवेत केले आहे, ज्यामध्ये एजंट-आधारित वितरण, कॉर्पोरेट विमा आणि यूएईमधील कामकाजाचा समावेश आहे.

Free LPG Cylinder : एक दोन नाही तर थेट 6 सिलेंडर मिळणार फ्री, कसं काय? जाणून घ्या काय आहे योजना?

Web Title: Major loss in insurance sector company market cap erased details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 06:32 PM

Topics:  

  • Insurance Policy
  • share market

संबंधित बातम्या

Stock Market Crash: गुंतवणूकदारांना मोठा झटका! 12 फायनान्शियल कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये ₹1.12 लाख कोटींची घट
1

Stock Market Crash: गुंतवणूकदारांना मोठा झटका! 12 फायनान्शियल कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये ₹1.12 लाख कोटींची घट

IPO Listingलाच मोठा धक्का! बाजारात एन्ट्री करताच शेअरला Lower Circuit
2

IPO Listingलाच मोठा धक्का! बाजारात एन्ट्री करताच शेअरला Lower Circuit

Share Market Today: शेअर बाजारात आज काय घडणार? काय म्हणाले तज्ज्ञ? ‘या’ शेअर्सवर ठेवा नजर
3

Share Market Today: शेअर बाजारात आज काय घडणार? काय म्हणाले तज्ज्ञ? ‘या’ शेअर्सवर ठेवा नजर

Share Market मध्ये कधी पैसा बुडणारच नाही; जर फॉलो केलात Warren Buffett यांचे 5 सिक्रेट फॉर्म्युले! काय आहे विशेष?
4

Share Market मध्ये कधी पैसा बुडणारच नाही; जर फॉलो केलात Warren Buffett यांचे 5 सिक्रेट फॉर्म्युले! काय आहे विशेष?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.