Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विमान तिकीट बुक केल्यानंतर दर कमी झाले? MakeMyTrip ने लाँच केलं Price Drop Protection; असा घेता येईल फायदा

MakeMyTrip Price Drop Protection : ऑनलाइन ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म मेकमायट्रिपने विमान प्रवाशांसाठी Price Drop Protection हे नवीन आणि अत्यंत उपयुक्त वैशिष्ट्य लाँच केले आहे. या सुविधेअंतर्गत फ्लाइटचे तिकीट बुक केल्यानंतर उड्डाणापूर्वी भाडे कमी झाल्यास, मेकमायट्रिप संबंधित प्रवाशाला फरकाची रक्कम थेट मूळ खात्यात परत करेल.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 29, 2026 | 06:50 PM
MakeMyTrip ने लाँच केलं Price Drop Protection ( सौजन्य - सोशल मीडिया )

MakeMyTrip ने लाँच केलं Price Drop Protection ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • विमान तिकीट बुक केल्यानंतर दर कमी झाले?
  • MakeMyTrip ने लाँच केलं Price Drop Protection
  • असा घेता येईल फायदा
MakeMyTrip Price Drop Protection : भारतातील प्रवासी ट्रिपचे नियोजन करताना बुकिंग नेमके कधी करावे याचा काळजीपूर्वक विचार करतात, ज्यामध्ये तिकिटांच्या दरांवर लक्ष ठेवणे, त्वरित बुकिंग करावे की आणखी वाट पाहावी हे ठरवणे आणि बुकिंग कन्फर्म झाल्यानंतर दर कमी होईल का, याबाबत अनेकदा साशंक राहणे यांचा समावेश होतो. तिकिटांच्या दरांशी संबंधित ही चिंता कमी करण्यासाठी, मेकमायट्रिपने लाँच केलेल्या Price Drop Protection या नवीन वैशिष्ट्याअंतर्गत, बुकिंग कन्फर्म झाल्यानंतर विमानाचे भाडे कमी झाल्यास त्यातील फरकाची रक्कम परत दिली जाते. या वैशिष्ट्यामुळे प्रवासी आत्मविश्वासाने लवकर बुकिंग करू शकतात, कारण उड्डाणापूर्वी कमी दर उपलब्ध झाल्यास त्यांना त्याचा लाभ मिळेल. ( MakeMyTrip Price Drop Protection ) 

Advertisement Expenses : स्वतःच्याच प्रसिद्धीसाठी Government ने उधळले कोट्यवधी रुपये? RTI द्वारे खर्चाचा खुलासा

भारतातील प्रवाशांची ही सावध विचारसरणी त्यांच्या बुकिंग करण्याच्या पद्धतीवरून स्पष्टपणे दिसून येते. प्रवासी अंतिम बुकिंग करण्यापूर्वी एकाच फ्लाइटचे दर अनेक वेळा तपासतात. आणि शेवटी ते बुकिंग करतात, तेव्हा बहुतेकदा प्रवासाची तारीख अगदी जवळ आलेली असते.

Price Drop Protection नेमकं कशासाठी?

प्रवासी ट्रिपचे नियोजन करत असताना वारंवार भाडे तपासतात, कारण त्यांच्या प्रवासाच्या योजना अद्याप निश्चित होत असतात; वैयक्तिक आणि कामाच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल होऊ शकतात आणि त्यांना शक्य तितके चांगले भाडे मिळवायचे असते. यामुळे बराच काळ भाडे शोधत राहणे आणि उशिरा बुकिंग करणे याला चालना मिळते. Price Drop Protection वैशिष्ट्य ही अनिश्चितता कमी करण्यासाठी आणि प्रवाशांना लवकर नियोजन करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे.

प्रवासांचा मिळतोय चांगला प्रतिसाद?

हे वैशिष्ट्य देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइट्ससाठी वन-वे व राउंड-ट्रिप बुकिंगवर उपलब्ध आहे. बुकिंग करताना प्रवासी Price Drop Protection वर क्लिक करून हा पर्याय निवडू शकतात, ज्याचे शुल्क देशांतर्गत फ्लाइट्ससाठी प्रति व्यक्ती 229 रुपये आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइट्ससाठी प्रति व्यक्ती 349 रुपयांपासून सुरू होते. चाचणी टप्प्यात सादर झाल्यापासून या वैशिष्ट्याला प्रवाशांमध्ये उत्तरोत्तर पसंती मिळत गेली आहे. हा पर्याय निवडलेल्या प्रवाशांपैकी उत्साहवर्धक संख्येने प्रवाशांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही फ्लाइट्सवर भाड्यात घट दिसून आली, ज्यातून बुकिंग करताना अधिक खात्रीची अपेक्षा असणाऱ्या प्रवाशांमध्ये या वैशिष्ट्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते.

प्रवाशांना सोयीनुसार बुकिंग करण्याचे स्वातंत्र्य

मेकमायट्रिपचे फ्लाइट्स, कॉर्पोरेट, जीसीसी आणि मार्केटिंग विभागाचे सीओओ राज ऋषी सिंग म्हणाले, “प्रवाशांनी लवकर बुकिंग करणे आणि त्यानंतर भाडे कमी होण्याची चिंता करणे, यापैकी एकाची निवड करण्याची गरज नाही. Price Drop Protection मुळे प्रवाशांना त्यांच्या सोयीनुसार बुकिंग करण्याचे स्वातंत्र्य मिळते, तसेच भाडे कमी झाल्यास त्यांना त्याचे संरक्षण मिळेल, याची खात्री मिळते. प्रवासाचे नियोजन करताना अधिक लवचिकता आणि मनःशांती देण्याचा हा एक सोपा मार्ग आहे.”

किती मिळेल रिटर्न?

भाड्यातील फरकावर मिळणारा कमाल परतावा देशांतर्गत फ्लाइट्ससाठी प्रति व्यक्ती 2,500 रुपये आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइट्ससाठी प्रति व्यक्ती 3,000 रुपये आहे. हे वैशिष्ट्य बुकिंग केल्याच्या वेळेपासून उड्डाणाच्या वेळेपूर्वी सहा तासांपर्यंत भाड्यात होणारी घट कव्हर करते. या कालावधीत भाडे कमी झाल्यास मेकमायट्रिप थेट संबंधित प्रवाशाला सूचित करते. परताव्याची रक्कम प्रवाशाने पैसे भरण्यासाठी वापरलेल्या मूळ पेमेंट स्रोतामध्ये जमा केली जाते.

Price Drop Protection मेकमायट्रिपच्या विद्यमान फ्लाइट अॅश्युरन्स सूटमध्ये सामील झाले आहे, ज्यामध्ये Zero Cancellation आणि Free Date Change यांचा समावेश आहे. या नवीन लाँचसह, हा सूट आता केवळ तिकीट रद्द करणे आणि प्रवासाच्या तारखांमधील बदलांपुरती मर्यादित न राहता बुकिंगनंतर दरांमध्ये होणाऱ्या बदलांना देखील कव्हर करते.

करदात्यांना मोठा दिलासा! Income Tax Audit ची मुदत वाढवली; पाहा ITR भरण्याची नवीन तारीख

Web Title: Makemytrip launches price drop protection refund on flight ticket price drop marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 06:50 PM

Topics:  

  • Aviation

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.