Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indian Singles : कामाचा ताण अन् डिजिटल दुनियेत तरुण एकटे? डिजिटल कनेक्‍शन असूनही भारतातील तरुण त्रस्त; मॅच ग्रुप सर्व्हेचा दावा

Loneliness Among Indian Singles : भारतातील आधुनिक जीवनशैली आणि धावपळीच्या युगात ३५ टक्के अविवाहित तरुणांना वारंवार एकटेपणा जाणवत असला, तरी ७० टक्के तरुण नवीन सामाजिक संबंध आणि दृढ नाती जोडण्यासाठी सक्रियपणे प्रयत्न करत आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 25, 2026 | 05:28 PM
कामाचा ताण अन् डिजिटल दुनियेत तरुण एकटे? ( सौजन्य - सोशल मीडिया )

कामाचा ताण अन् डिजिटल दुनियेत तरुण एकटे? ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • कामाचा ताण अन् डिजिटल दुनियेत तरुण एकटे?
  • डिजिटल कनेक्‍शन असूनही भारतातील तरुण त्रस्त
  • मॅच ग्रुप सर्व्हेचा महत्त्वपूर्ण दावा
Loneliness Among Indian Singles : संपूर्ण आशियामध्ये आधुनिक जीवनशैलीमुळे तरुण अविवाहित व्यक्तींना इच्छित अर्थपूर्ण नाती जोडणे अधिक आव्हानात्मक होत आहे. भारतात, व्यक्तींपर्यंत पोहोचण्याच्या किंवा ओळख होण्याच्या संधींची कमतरता हे आव्हान नाही, तर वाढत्या धावपळीच्या आणि डिजिटल माध्यमातून जोडल्या गेलेल्या जगात अर्थपूर्ण वाटणारी नाती शोधणे हे मुख्य आव्हान आहे.

भारतातील तरुण आजही सामाजिक आणि रोमँटिक नात्यांच्या शोधात आहेत, तरीही कामाचा ताण, थकवा आणि ऑनलाइन संवाद व प्रत्यक्ष आयुष्यातील नातेसंबंध यांच्यातील वाढत्या अंतरामुळे मनापासून आपलेपणा जाणवणे अधिक आव्हानात्मक बनत चालले आहे. ( Loneliness Among Indian Singles ) 

अरे देवा… मग Salary चं काय? Bank Strike मुळे पगारावर परिणाम? आता वाट बघावी लागणार

संशोधनामधून नात्यांमधील विरोधाभास समोर

माणसांमधील नात्यांचे हे बदलते स्वरूप अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी मॅच ग्रुपने भारतातील तरुण अविवाहित प्रौढांना एकटेपणा, सामाजिक नातेसंबंध, नाते आणि डेटिंग यांविषयी कसा अनुभव येतो याबाबत संशोधन करण्यासाठी इप्सॉसला नियुक्त केले होते. या संशोधनामधून नात्यांमधील विरोधाभास समोर आला आहे: भारतातील तरुण नाती जोडण्यासाठी सक्रियपणे प्रयत्न करत आहेत, पण व्यक्तींच्या सहवासात असणे आणि डिजिटल माध्यमातून कनेक्टेड असणे म्हणजे एकटेपणा कमी होणे असा अर्थ होत नाही. अनेकांसाठी, केवळ नवीन व्यक्तींना भेटण्याचे नवनवीन मार्ग शोधणे, तसेच कमी पण अधिक दृढ आणि अर्थपूर्ण नाती निर्माण करणे ही काळाची गरज आहे.

३५ टक्‍के अविवाहित व्यक्तींना एकटेपणा जाणवतो

भारतातील १८ ते ४५ वयोगटातील १,००० अविवाहित व्यक्तींवर करण्यात आलेल्या मॅच ग्रुप ह्युमन कनेक्शन सर्व्हेमधून निदर्शनास आले की, भारतातील ३५ टक्‍के अविवाहित व्यक्तींना वारंवार किंवा नेहमी एकटेपणा जाणवतो, तर ७० टक्‍के व्यक्ती नवीन सामाजिक संबंध जोडण्यासाठी सक्रियपणे प्रयत्न करत आहेत आणि ७५ टक्‍के व्यक्ती आठवड्यातून एकापेक्षा जास्त वेळा प्रत्यक्ष भेटून संवाद साधत आहेत. या निष्कर्षांवरून दिसून येते की, हा एकटेपणा नाती जोडण्याची इच्छा किंवा संधी नाही, तर आधुनिक जीवनात तणाव वाढण्यास कारणीभूत ठरत आहे.

ऑनलाइन व्यक्तींना कनेक्ट होतात, पण प्रत्यक्ष कठीण

भारतातील ६४ टक्‍के अविवाहित व्यक्ती म्हणतात की, ते सामाजिक जीवनापेक्षा काम किंवा अभ्यासाला अधिक प्राधान्य देतात, तर ५५ टक्‍के व्यक्ती म्हणतात की, ते दैनंदिन कामांनंतर खूप थकलेले असतात, ज्यामुळे त्यांना व्यक्तींशी मिसळणे किंवा संवाद साधणे जमत नाही. तसेच, निम्म्याहून अधिक (५८ टक्‍के) व्यक्ती म्हणतात की, ते ऑनलाइन माध्यमातून व्यक्तींशी कनेक्टेड असतात, पण त्यांना प्रत्यक्ष आयुष्यात एकटेपणा जाणवतो, यामधून डिजिटल जगात कनेक्टेड असणे आणि प्रत्यक्ष आयुष्यात अर्थपूर्ण मानवी नाते अनुभवणे यातील तफावत दिसून येते.

भारतातील तरुण अधिक दृढ नात्यांचा शोध

ही आव्हाने असताना देखील नाती जोडण्याची इच्छा प्रबळ आहे. भारतातील ७२ टक्‍के अविवाहित व्यक्ती म्हणतात की, ते अधिकाधिक नाती जोडण्यापेक्षा अधिक दृढ नाती जोडण्यास प्राधान्य देतात, तर ७० टक्‍के व्यक्ती नवीन सामाजिक संबंध निर्माण करण्यासाठी सक्रियपणे प्रयत्न करत आहेत. या निष्कर्षांवरून निदर्शनास येते की, भारतातील तरुण नात्यांपासून दूर जाण्याऐवजी इच्छित नात्यांबद्दल अधिक विचारपूर्वक निर्णय घेत आहेत.

नाती जोडण्याची ही गरज रोमँटिक संबंधांपर्यंतही विस्तारलेली दिसते. ७८ टक्‍के व्यक्तींचा खऱ्या प्रेमावर विश्वास आहे आणि ७७ टक्‍के व्यक्तींना विश्वास वाटतो की, ते अखेर त्यांच्यासाठी योग्य असेल्या व्यक्तीचा शोध नक्की घेतील. तसेच, ८५ टक्‍के व्यक्ती म्हणतात की, ते दीर्घकालीन नात्याच्या शोधात आहेत आणि जेन झीमध्ये हे प्रमाण ८९ टक्‍के आहे.

दीर्घकालीन भविष्य दिसणाऱ्या व्यक्तींसोबत डेटिंग

या निष्कर्षांवरून निदर्शनास येते की, भारतातील तरुण आता कोणासोबत नाते जोडायचे याबाबतीत अधिक विचारपूर्वक पुढाकार घेत आहेत. ६३ टक्‍के व्यक्ती तडजोड करून एखाद्या अयोग्य जोडीदारासोबत राहण्यापेक्षा शोध सुरू ठेवणे पसंत करतील, तर ७२ टक्‍के व्यक्ती म्हणतात की, ते दीर्घकालीन भविष्य दिसणाऱ्या व्यक्तींसोबत डेटिंग करतील, ज्यामधून सुसंगतता आणि दीर्घकालीन भविष्यावर आधारित नात्यांना असलेली पसंती दिसून येते.

“भारतातील तरुणांना पाहिजे असलेल्या नात्यांबाबत माहित आहे,” असे मॅच ग्रुपचे भारत आणि मिडल ईस्टमधील प्रादेशिक प्रमुख व वरिष्ठ संचालक अनुकुल कुमार म्हणाले. “या संशोधनातून निदर्शनास आले की, भारतातील ३५ टक्‍के अविवाहित व्यक्तींना वारंवार किंवा नेहमी एकटेपणा जाणवतो, तरीही ७० टक्‍के व्यक्ती नवीन सामाजिक संबंध जोडण्यासाठी सक्रियपणे प्रयत्न करत आहेत आणि ७२ टक्‍के व्यक्ती कमी, पण अधिक दृढ नात्यांना प्राधान्य देतात. यावरून स्पष्ट होते की, व्यस्त जीवनशैली आणि डिजिटल संवादामुळे खरी नाती जोडणे आव्हानात्मक होत असले, तरी अर्थपूर्ण नाते असण्याची इच्छा अजूनही कायम आहे. तंत्रज्ञान व्यक्तींना खरीखुरी, सुसंगत आणि अर्थपूर्ण वाटणारी नाती शोधून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकते.”

अर्थपूर्ण नाती शोधण्यात तंत्रज्ञानाची भूमिका

या सर्व आव्हानांचा सामना करत इतरांना भेटणे आणि त्यांच्याशी संवाद साधण्याच्या पद्धतींमध्ये तंत्रज्ञानाचा सहभाग वाढत आहे. सध्या भारतातील ४० टक्‍के अविवाहित व्यक्ती डेटिंग अॅप्सचा वापर करत आहेत, तर ६३ टक्‍के व्यक्ती म्हणतात की, डेटिंग अॅप्समुळे त्यांना इतरांशी अधिक कनेक्टेड वाटण्यास आणि एकटेपणा कमी होण्यास मदत होते. निम्म्याहून अधिक (५५ टक्‍के) व्यक्ती म्हणतात की, ते पुढील १२ महिन्यांत डेटिंग अॅप वापरण्याची शक्यता आहे, तर ६० टक्‍के व्यक्ती ऑनलाइन डेटिंगचा अनुभव उत्साहवर्धक असल्याचे सांगतात.

या संशोधनातून निदर्शनास येते की, व्यक्ती ऑनलाइन कनेक्ट होण्यामध्ये विश्वासाला अधिक प्राधान्य देतात. भारतातील ६० टक्‍के अविवाहित व्यक्ती म्हणतात की, ते ऑनलाइन डेटिंग करताना सुरक्षितता आणि समावेशकतेबाबत विचार करतात, तर ५२ टक्‍के व्यक्ती म्हणतात की, डेटिंग अॅप निवडताना पडताळणी केलेली व प्रमाणीकृत प्रोफाइल्स आणि प्रबळ सुरक्षा उपाय अत्यंत महत्त्वाचे घटक असतात.

अर्थपूर्ण नातेसंबंध शोधण्यासाठी तंत्रज्ञानाची अधिक व्यापक

या निष्कर्षांमधून केवळ डिजिटल माध्यमातून कनेक्ट होण्यापलीकडे खरोखरंच अर्थपूर्ण नातेसंबंध शोधण्यासाठी तंत्रज्ञानाची अधिक व्यापक भूमिका दिसून येते. आजच्या काळात डेटिंग व्यक्तींना भेटण्याचे आणि नाती निर्माण करण्याचा प्रमुख मार्ग ठरत आहे, ज्यामुळे व्यक्तींना सुरक्षित आणि आत्मविश्वासपूर्ण वाटेल असे वातावरण तयार करणे हे दृढ नाते निर्माण होण्‍यासाठी महत्त्वाचे आहे.

इप्सॉसने आज तरुण अविवाहित व्यक्तींना एकटेपणा, सामाजिक नातेसंबंध, नाते आणि डेटिंग यांविषयी येणारा अनुभव समजून घेण्यासाठी भारत, जपान, दक्षिण कोरिया आणि थायलंडमध्ये मॅच ग्रुप ह्युमन कनेक्शन सर्व्हे केला. भारतात या सर्व्हेमध्ये प्रमुख महानगर आणि प्रथम श्रेणीच्या शहरांमधील १८ ते ४५ वयोगटातील १,००० अविवाहित व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले.

3 दिवसांच्या Bank Strike मुळे सेवा विस्कळीत होणार? SBI सह इतर बँकांनी Customers साठी जारी केल्या महत्त्वाच्या सूचना!

Web Title: Match group ipsos survey 35 percent indian singles face loneliness marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 05:27 PM

Topics:  

  • Economic Survey
  • Youth

संबंधित बातम्या

Amravati Crime: नगर परिषदेसमोर संशयास्पद हालचाल अन् पोलिसांची झडती; पुढे जे सापडलं ते धक्कादायक
1

Amravati Crime: नगर परिषदेसमोर संशयास्पद हालचाल अन् पोलिसांची झडती; पुढे जे सापडलं ते धक्कादायक

Youth Innovation : DTU ची नवी योजना जाहीर! गावातील समस्यांवर शोधा उपाय अन् मिळवा कोटींचे बक्षीस
2

Youth Innovation : DTU ची नवी योजना जाहीर! गावातील समस्यांवर शोधा उपाय अन् मिळवा कोटींचे बक्षीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.