बँकांच्या ३ दिवसांच्या संपामुळे सेवा विस्कळीत होणार? ( सौजन्य - सोशल मीडिया )
देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने, SBI ने, मंगळवारी एका निवेदनात आपल्या ग्राहकांना ही सूचना जारी केली. त्यात म्हटले आहे की, इंटरनेट बँकिंग, मोबाईल ॲप्लिकेशन्स आणि यूपीआय सुविधा नेहमीप्रमाणे सुरू राहतील.
SBIने हे स्पष्ट केलं की, “काही बँक कर्मचारी संघटनांनी २८ ते ३० सप्टेंबर या तीन दिवसांच्या संपाची घोषणा केली आहे, त्यामुळे कृपया आपले अत्यावश्यक व्यवहार हे आगाई पूर्ण करा. इतर सर्व एटीएम आणि ग्राहक सेवा केंद्रे, इंटरनेट आणि मोबाईल बँकिंग, यूपीआय आणि इतर डिजिटल चॅनेल नेहमीप्रमाणे कार्यरत राहतील, त्यामुळे कृपया त्यांचा वापर करा.”
इंडियन बँकेनेही ग्राहकांना सतर्क केले आहे, “प्रस्तावित बँक संपामुळे बँकिंग सेवांवर परिणाम होऊ शकतो. कृपया मोबाईल बँकिंग, एटीएम आणि डिजिटल चॅनेलचा वापर करा.”
सध्या, बँका रविवारी, तसेच दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद असतात. बँक कर्मचारी RBI आणि LIC प्रमाणे पाच दिवसांच्या कामाच्या आठवड्याची मागणी करत आहेत. मार्च २०२४ च्या वेतन करारामध्ये यावर सहमती झाली होती, परंतु हे प्रकरण प्रलंबित आहे.
PLI योजना मागे घेण्याची मागणी – कर्मचारी सरकारच्या सुधारित पीएलआय (PLI) योजनेच्या अंमलबजावणीचाही निषेध करत आहेत. बँकांमध्ये वरिष्ठ अधिकारी आणि कनिष्ठ कर्मचारी यांच्या प्रोत्साहनांमध्ये मोठी तफावत आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर, केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सप्टेंबर २०२६ मध्ये या सुधारित योजनेच्या अंमलबजावणीला तात्पुरती स्थगिती दिली आहे.
पाच दिवसांचा संप टाळण्यासाठी, भारतीय रिझर्व्ह बँके RBI ने सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांना रविवार पासून सामान्य बँकिंग कामकाज पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. यानंतर, सर्व बँक शाखा, कार्यालये, एटीएम-संलग्न शाखा आणि करन्सी चेस्ट पूर्णपणे कार्यरत राहतील.
बँक संघटनांनी यापूर्वी ११ सप्टेंबर रोजी एक दिवसाचा संप केला होता. संपकरी बँक संघटनांनी आता इशारा दिला आहे की, त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास, ते २६ ऑक्टोबरपासून देशव्यापी अनिश्चित काळासाठी संप पुकारतील.
Aadhar Housing Finance: आधार हाउसिंग फायनान्सला मोठे रेटिंग अपग्रेड; ICRA कडून ‘AA+/Stable’ मानांकन






