Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता हे काय नवीन? McDonald’s च्या नव्या प्रयोगामुळे ग्राहकांमध्ये खळबळ? तुमच्या लोकेशनवरुन ठरणार बर्गरची किंमत…

McDonald's Dynamic Pricing : प्रसिद्ध फास्ट फूड साखळी McDonald's ने आपल्या मेनूमधील पदार्थांच्या किमती ठरवण्यासाठी 'लोकेशन बेस्ड प्रायसिंग' धोरण राबवण्याची तयारी सुरू केली आहे. या नवीन नियमानुसार, ग्राहक ज्या भागात राहतो किंवा जिथून ऑर्डर करत आहे, त्या भागाच्या आर्थिक स्तरानुसार बर्गर आणि इतर पदार्थांचे दर ठरवले जातील.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 30, 2026 | 07:10 PM
McDonald's च्या नव्या प्रयोगामुळे ग्राहकांमध्ये खळबळ! ( सौजन्य - सोशल मीडिया )

McDonald's च्या नव्या प्रयोगामुळे ग्राहकांमध्ये खळबळ! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • आता हे काय नवीन?
  • McDonald’s च्या नव्या प्रयोगामुळे ग्राहकांमध्ये खळबळ!
  • तुमच्या लोकेशनवरुन ठरणार बर्गरची किंमत
McDonald’s Dynamic Pricing : आजकाल जंक फूडचा क्रेझ भयंकर वाढला आहे. मला सांगा कोणाला आवडत नाही हे जंक फूड? त्यात जेव्हा बर्गर आणि फ्राईजचा विषय येतो, तेव्हा सगळे अगदी वेडे होऊन खायला बसतात. तुम्ही देखील या लिस्टमध्ये असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. कारण आता तुम्ही मॅकडोनाल्ड्समधून बर्गर ऑर्डर करत असाल तर त्याची किंमत तुम्हाला वेगवेगळी पाहायला मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला मिळणारा बर्गर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या किंमतींना मिळेल. बर्गरच्या किमती ठरवण्यासाठी कंपनी तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर काम करत आहे. पण नेमकं काय आहे हे प्रकरण? ( McDonald’s Dynamic Pricing ) 

Important Business Certificates : तुमचा व्यवसाय आहे? मग ‘हे’ 2 सर्टिफिकेट्स नक्की सोबत ठेवा; गरजेच्या वेळी लगेच मिळणार Loan

खरं तर, कंपनी AI आणि डेटाचा वापर करून, वेगवेगळ्या रेस्टॉरंट्सनुसार मेन्यूच्या किमती ठरवण्याकडे पावले उचलत आहे. याचा अर्थ असा की, बर्गरच्या किमती सर्वत्र सारख्याच असण्याची गरज नाही. आता किमती ठिकाणानुसार आणि ग्राहकाला परवडणाऱ्या रकमेनुसार ठरवल्या जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.

AI असणार मुख्य भूमिकेत?

मॅकडोनाल्ड्स आता प्रादेशिक स्तरावर बर्गरच्या किमती ठरवण्यावर काम करत आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्या विशिष्ट भागातील लोक जास्त पैसे खर्च करण्यास तयार असतील, तर बर्गरची किंमत जास्त असू शकते. तर दुसरीकडे, जर त्याच भागातील ग्राहक महागडा बर्गर खरेदी करण्यास तयार नसतील, किंवा त्यांना परवडण्यासारखा नसेल तर अशा भागांमधील दर त्यानुसार ठरवले जाऊ शकतात.
याव्यतिरिक्त, एआय वेगवेगळ्या रेस्टॉरंट्समधील विक्रीच्या जुना डेटा काढून त्याची तपासणी करेल आणि कशाला जास्त मागणी आहे हे ठरवेल. त्यामुळे, वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये बर्गरच्या किमतींमध्ये फरक दिसून येऊ शकतो.

भारतात ही सिस्टीम लागू करण्यात आली का?

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, ही AI प्रणाली अद्याप भारतात लागू करण्यात आलेली नाही. सध्या ती अमेरिकेतील मॅकडोनाल्ड्सच्या रेस्टॉरंट्समध्ये वापरली जात आहे. तथापि, भारतात ती कधी लागू केली जाईल याबद्दल अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

लाखो व्यवहारांच्या डेटाची तपासणी

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मॅकडोनाल्ड्सची AI प्रणाली मोठ्या संख्येने रेस्टॉरंटमधील व्यवहारांच्या डेटावर लक्ष ठेवते आहे. कोणत्या भागात बर्गरला किती मागणी आहे आणि कोणत्या भागातील ग्राहक किती पैसे खर्च करू शकतात, हे शोधणे हा तिचा उद्देश आहे. त्यामुळे योग्य किंमत ठरवता येऊ शकते आणि त्याचा फायदा कंपनीला मिळू शकतो.

Inflation Rate : ही Diwali खिशावर भारी! पेट्रोलपासून कांद्यांपर्यंत सोन्यापासून स्मार्टफोनपर्यंत… अरे देवा सगळंच महागणार?

Web Title: Mcdonalds to set burger prices based on customer location dynamic pricing marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 07:10 PM

Topics:  

  • Affordable Price

संबंधित बातम्या

McDonald’s चा मेन्यू बदलणार! बर्गर बाऊलपासून Egg Bites पर्यंत हाय-प्रोटीन पर्यायांची टेस्टिंग
1

McDonald’s चा मेन्यू बदलणार! बर्गर बाऊलपासून Egg Bites पर्यंत हाय-प्रोटीन पर्यायांची टेस्टिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.