Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Meesho IPO: मीशो IPO डिसेंबर 3 पासून सुरू..; रिटेल गुंतवणूकदारांसाठी किमान ‘इतक्या’ रुपये गुंतवणूक आवश्यक 

मीशो आयपीओ ३ डिसेंबर २०२५ ला उघडणार आहे. या मीशो आयपीओसाठी प्रति शेअर १०५ ते १११ रुपये निश्चित करण्यात आला असून  आणि एका लॉटमध्ये १३५ शेअर्स आहेत. Meesho IPO उघडण्यापूर्वीच याची जोरदार चर्चा सुरू आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Dec 01, 2025 | 12:16 PM
मीशो IPO डिसेंबर 3 पासून सुरू..; रिटेल गुंतवणूकदारांसाठी किमान 'इतक्या' रुपये गुंतवणूक आवश्यक 

मीशो IPO डिसेंबर 3 पासून सुरू..; रिटेल गुंतवणूकदारांसाठी किमान 'इतक्या' रुपये गुंतवणूक आवश्यक 

Follow Us
Close
Follow Us:
  • Meesho IPO ३ डिसेंबर २०२५ ला उघडणार
  • आयपीओ प्रति शेअर १०५ ते १११ रुपये निश्चित
  • लहान गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी
 

Meesho IPO: ई-कॉमर्स कंपनी असलेल्या मीशोचा आयपीओ ३ डिसेंबरला उघडणार आहे. ५ डिसेंबरपर्यंत गुंतवणूकदार या इश्यूमध्ये गुंतवणूक करू शकतील. ई-कॉमर्स क्षेत्रातील मीशो ही वेगाने उदयास येणारी कंपनी असून अल्पावधीतच बाजारात स्वतःचे स्थान निर्माण केले. अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या दिग्गजांशी स्पर्धा करत स्वता:चे स्थान निर्माण केले. अनलिस्टेड शेअर्स ग्रे मार्केटमध्ये मीशो आयपीओ ५,४२१.२० कोटी रुपयांनी व्यवहार करत आहेत. अंदाजे ३८% प्रीमियमवर व्यवहार सुरू असून ब्रोकरेज देखील सकारात्मक आहेत.

मीशो ४,२५० कोटी रुपयांचा नवीन इश्यू जारी करणार असून विद्यमान शेअरहोल्डर्स ओएफएसद्वारे १,१७० कोटी रुपयांचे शेअर्स विकतील. मीशोतील नवीन इश्यूमधून मिळणाऱ्या ४,२५० कोटी रुपयांच्या उत्पन्नाचा मोठा भाग हा तंत्रज्ञानात गुंतवला जाणार असून त्यामध्ये मीशो टेक्नॉलॉजीजच्या उपकंपनीसाठीच्या क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरवर तब्बल १,३९० कोटी रुपये खर्च केले जातील. तसेच, मार्केटिंग आणि ब्रँडिंग सारख्या गोष्टींवर १,०२० कोटी खर्च करण्यात येईल.मशीन लर्निंग आणि एआय टीमच्या पगारावर ४८० कोटी रुपये खर्च करणार आहेत.

हेही वाचा : LPG Gas Price: आनंदाची बातमी! 1 डिसेंबरपासून कमी झाले LPG सिलेंडरचे भाव, तुमच्या शहरातील लेटेस्ट दर घ्या जाणून

मीशोच्या आयपीओच्या किंमत प्रति शेअर १०५ ते १११ रुपये असे निश्चित करण्यात आला असून यामध्ये १३५ शेअर्सचा समावेश आहे. कोणत्याही गुंतवणूकदाराला किमान इतक्या शेअर्ससाठी बोली लावावी लागेल. आणि किमान बोली ही १४,९८५  रुपयांवर गुंतवणूक आवश्यक असेल. ग्रे मार्केटमध्ये मीशोचा आयपीओ उघडण्यापूर्वीच  चर्चा सुरू झाली असून अधिकृत वेबसाइट IPOWatch.in नुसार, मीशोचे अनलिस्टेड शेअर्स सध्या ग्रे मार्केटमध्ये ३६ रुपयांच्या प्रीमियमवर व्यवहार करत आहेत. यामुळे गुंतवणूकदारांना लक्षणीय परतावा मिळू शकतो.

मीशोच्या आयपीओमध्ये ब्रोकरेज फर्म फंड्सइंडियाने गुंतवणूक करण्याची शिफारस केली असून कंपनीच्या वापरकर्त्यांची वाढ चांगली आहे. मीशो हा भारतातील सर्वात मोठा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म बनला आहे. लॉजिस्टिक्स, जाहिराती आणि डेटा-चालित साधनांमधून मीशो महसूल निर्माण करते. तसेच, मीशोचे शून्य-कमिशन, अॅसेट-लाइट मार्केटप्लेस मॉडेल त्यांच्या वाढीला कारणीभूत ठरले.

हेही वाचा : New Tax On Tobacco Products: केंद्र सरकारचा तंबाखू उत्पादनांसंबधित मोठा निर्णय! तंबाखू उत्पादनांवर अतिरिक्त कराची तयारी? 

मीशो आयपीओ ३ डिसेंबरला उघडणार असून शुक्रवारी ५ डिसेंबर रोजी बंद होईल. मीशोच्या एका आयपीओमध्ये १३५ लॉट आहेत. किरकोळ गुंतवणूकदाराला किमान १४,९८५ रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. मीशोचे शेअर्स सोमवार, ८ डिसेंबर रोजी वाटप केले जातील. शेअर्स ९ डिसेंबरपर्यंत डीमॅट खात्यात जमा केले जातील. लिस्टिंग बुधवार, १० डिसेंबर रोजी बीएसई आणि एनएसईवर होईल.

Web Title: Meesho ipo december 3 retail investors share market

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2025 | 12:16 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.