Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वय 22 अन् कंपनी 1500 कोटींची! मराठमोळ्या अर्जुनची उद्योगक्षेत्रात गरुडझेप

अर्जुन देशपांडे, एक 22 वर्षीय तरुण जो आज जेनेरिक आधार या स्टार्टअप कंपनीचा फाउंडर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)आहे. महाभारतातील अर्जुनाला आपण सगळेच ओळखतो पण आज या प्रगतशील भारतातील अर्जुनला जाणून घेणे महत्वाचे आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jul 27, 2024 | 07:23 PM
फोटो सौजन्य: Facebook

फोटो सौजन्य: Facebook

Follow Us
Close
Follow Us:

“मी अचूक निर्णय घेत नाही तर घेतलेल्या निर्णयांना अचूक बनवतो” हे म्हणणे आहे भारतातील थोर उद्योजक रतन टाटा यांचे. आणि याच वाक्याला साजेशी अशी गोष्ट आहे अर्जुन देशपांडेची, ज्याला भारतीय फार्मा क्षेत्रातील रॉबिनहूड असे देखील म्हणले जाते.

अर्जुन हा मुंबईस्थित स्टार्टअप जेनेरिक आधारचा फाउंडर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. जेनेरिक आधार ही एक जेनेरिक औषधांसाठी एंड-टू-एंड ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे ज्याचा उद्देश देशातील प्रत्येक नागरिकासाठी उच्च-गुणवत्तेची औषधे परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध करून देणे आहे.

१६ वरीस स्वप्नांचं

अर्जुन नेहमीपासूनच आपल्या आजुबाजुच्या समस्या निक्षुन पाहायचा. त्याचा उद्योजकीय प्रवास महाविद्यालयीन काळात सुरू झाला जेव्हा त्याने लोकांसाठी परवडणारी औषधे उपलब्ध नसल्याचं निरीक्षण केले. 2018 मध्ये वयाच्या 16 व्या वर्षी, त्यांनी एका कंपनीची स्थापना केली जी सामान्यत: फार्मसीमध्ये आढळणाऱ्या ब्रँडेड औषधांना पर्याय म्हणून स्वस्त आणि परवडणारी जेनेरिक औषधे देत होती. याच महत्वाकांक्षी निर्णयामुळे आज २२ व्या वर्षी अर्जुनच्या कंपनीचा टर्नओव्हर तब्बल 1500 कोटींचा झाला आहे.

रतन टाटांची अमूल्य साथ

अर्जुनचे कष्ट फळास आले जेव्हा त्याची कंपनी ही 500 कोटींची बनली. या त्याच्या उत्तुंग कामगिरीवर उद्योगक्षेत्रातील अनेक दिग्गजांनी त्याचे कौतुक केले. यातीलच एक होते रतन टाटा. TED talk वर आपले विचार मांडताना अर्जुनने फार्मा सेक्टवर आपला दृष्टिकोन प्रकट केला होता. हाच दृष्टिकोन रतन टाटा यांना भावला आणि त्यांनी जेनेरिक आधार कंपनीला आपल्या गुंतवणुकीचा आधार दिला.

वय लहान पण कीर्ती महान

अर्जुनची कामगिरी भारतातील तरुण उद्योजकांमध्ये मोठ्या प्रमाणावर ओळखली जाते. यामुळेच त्याचे नाव फोर्ब्सच्या 30 अंडर 30 एशिया आणि फॉर्च्युन इंडिया 40 अंडर 40 या यादीत आले होत. एप्रिल 2023 साली अर्जुन देशपांडेला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून देशाच्या लोकसंख्येसाठी स्वस्त औषधे बनविण्याच्या प्रयत्नांबद्दल प्रशंसा मिळाली. तसेच त्याला “wonder kid of pharma” असे देखील संबोधले.

 

Web Title: Meet arjun deshpande who is 22 and his company worth rs 1500 crores

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2024 | 07:22 PM

Topics:  

  • Business Man

संबंधित बातम्या

पंतप्रधान मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान वोंग यांच्या हस्ते जेएन पोर्ट पीएसए मुंबई टर्मिनल फेज-२ चे उद्घाटन
1

पंतप्रधान मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान वोंग यांच्या हस्ते जेएन पोर्ट पीएसए मुंबई टर्मिनल फेज-२ चे उद्घाटन

सरकारची मोठी कर सुधारणा, २०४७ पर्यंत समान कर स्लॅब लागू करण्याची तयारी
2

सरकारची मोठी कर सुधारणा, २०४७ पर्यंत समान कर स्लॅब लागू करण्याची तयारी

भविष्य सांगून उभा केला कोटींचा साम्राज्य! InstaAstro ची यशोगाथा
3

भविष्य सांगून उभा केला कोटींचा साम्राज्य! InstaAstro ची यशोगाथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.