
मेंटॉस फ्रेश ॲक्शनची नवीन भन्नाट जाहिरात! ( सौजन्य - सोशल मीडिया )
या कॅम्पेनच्या केंद्रस्थानी आहे पिठाच्या गिरणीत रंगलेली एक मजेशीर ॲड फिल्म. गिरणीचा मालक डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण पिठात भरलेला असतो, अन् तितक्यातच त्याची बायको त्याला लग्नाला जायची आठवण करून देते. कपडे बदलायला अजिबात वेळ नसल्याने, तो गिरणीत काम करणाऱ्या मुलाकडे बघतो. तो मुलगा पटकन एक ‘मेंटॉस फ्रेश ॲक्शन’ तोंडात टाकतो.
त्यातून ताजेपणाचा असा काही कडक झटका बसतो की वाऱ्याची एक जोरदार लाट सुटते आणि मालकाच्या अंगावरचं सगळं पीठ उडून जातं, अन् आतली मस्त इस्त्री केलेली शेरवानी बाहेर येतो. जेव्हा ते उडालेलं सगळं पीठ मागे उभ्या असलेल्या त्याच्या बायकोच्याच अंगावर जाऊन पडतं, तेव्हा मात्र यामधली खरी मजा येते.
मेंटॉस फ्रेश ॲक्शनच्या कडक ताजेपणाचा हा जोरदार झोत एका भन्नाट दृश्यातून समोर येतो, तर हा शेवट तरुणांच्या पसंतीस उतरेल असा मजेशीर, उत्साही आणि खेळकर पद्धतीने दाखवला आहे. विनोदाची जोड आणि थोडीशी मज्जा यामुळे प्रॉडक्टचा हा अनुभव मनोरंजक, जवळचा वाटणारा आणि सहज लक्षात राहणारा बनतो.
या कॅम्पेनबद्दल बोलताना, परफेक्टी व्हॅन मेल इंडियाचे मार्केटिंग डायरेक्टर गुंजन खेतान म्हणाले: “मेंटॉस फ्रेश ॲक्शनच्या माध्यमातून आम्हाला अशी तीव्र आणि थंडगार ताजेपणाची अनुभूती आणायची होती, जी मेंटॉस पोर्टफोलिओमध्ये एक नवीन भर घालेल. ‘क्या सांस खुली, क्या हवा चली’ या विचाराने आम्हाला हा अनुभव अगदी मनोरंजक पद्धतीने सादर करण्याचा मार्ग दिला, ज्यामध्ये या ताजेपणाची प्रखरता दाखवण्यासाठी विनोद आणि गंमतीशीर आधार घेतला आहे. एका साध्या प्रॉडक्टच्या अनुभवाला एका अनपेक्षित आणि मनोरंजक क्षणात बदलून, ही TVC मेंटॉसच्या खेळकर स्वभावाला चोखपणे मांडते.”
Ans: "क्या सांस खुली, क्या हवा चली" ही नवीन TVC ची मुख्य टॅगलाईन आहे.
Ans: यात डोक्यापासून पायापर्यंत पिठाने भरलेला गिरणीचा मालक, मेंटॉस फ्रेश ॲक्शन खाल्ल्यावर सुटणारी वाऱ्याची लाट आणि त्यामुळे अंगावरील पीठ उडून घडणारा एक खेळकर व मजेशीर शेवट दाखवण्यात आला आहे.
Ans: गुंजन खेतान हे परफेक्टी व्हॅन मेल इंडियाचे मार्केटिंग डायरेक्टर आहेत.