Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खूशखबर… IT क्षेत्रात गुंतवणुकीची मोठी संधी! Mirae Asset चा नवा IT Index Fund बाजारात, ‘ही’ खास वैशिष्ट्ये

Mirae Asset IT Index Fund : म्युच्युअल फंड क्षेत्रातील आघाडीच्या मिरे अॅसेट म्युच्युअल फंडाने 'मिरे अॅसेट बीएसई इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंडेक्स फंड' लाँच करण्याची घोषणा केली आहे. हा फंड गुंतवणूकदारांना भारतातील आयटी सेवा, सॉफ्टवेअर, हार्डवेअर आणि एआय-संबंधित कंपन्यांमध्ये एकाच इंडेक्सद्वारे गुंतवणुकीची संधी देतो.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 09, 2026 | 05:50 PM
आयटी क्षेत्रात गुंतवणुकीची मोठी संधी!

आयटी क्षेत्रात गुंतवणुकीची मोठी संधी!

Follow Us
Follow Us:
  • भारतीय आयटी क्षेत्राचा फायदा मिळणार!
  • मिरे अॅसेटचा नवा इंडेक्स फंड लाँच
  • ५,००० रुपयांपासून करा गुंतवणूक
Mirae Asset IT Index Fund : मिरे अॅसेट इन्वेस्टमेंट मॅनेजर्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडने मिरे अॅसेट बीएसई इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंडेक्स फंड (बीएसई इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी टोटल रिटर्न इंडेक्सचे अनुकरण/ट्रॅकिंग करणारी एक ओपन-एंडेड योजना) लाँच करण्याची घोषणा केली आहे. ( Mirae Asset IT Index Fund ) 

बांधकाम आणि इंजिनिअरिंग क्षेत्रासाठी मोठी बातमी! गंज लागण्याची चिंता मिटणार; AM/NS ने लाँच केला Pelican ब्रँड

पॅसिव्ह आणि नियमांवर आधारित प्रवेश देतो

हा फंड गुंतवणूकदारांना एकाच इंडेक्स-ट्रॅकिंग उत्पादनाद्वारे आयटी सेवा, सॉफ्टवेअर उत्पादने, आयटी-सक्षम सेवा आणि हार्डवेअर कंपन्यांपर्यंत भारतातील तंत्रज्ञान क्षेत्राचा पॅसिव्ह आणि नियमांवर आधारित प्रवेश देतो. या फंडासाठी न्यू फंड ऑफर (एनएफओ) ८ सप्टेंबर २०२६ रोजी खुला होईल आणि २२ सप्टेंबर २०२६ रोजी बंद होईल; तसेच ही योजना २८ सप्टेंबर २०२६ रोजी सतत विक्री आणि पुनर्खरेदीसाठी पुन्हा सुरु होईल.

आयटी क्षेत्राने अनेक तंत्रज्ञान चक्रांची परीक्षा

“डॉट-कॉम क्रॅशपासून ते कोविड-१९ पर्यंत, भारतातील आयटी क्षेत्राने अनेक तंत्रज्ञान चक्रांची परीक्षा दिली आहे आणि प्रत्येक वेळी हा उद्योग परिस्थितीशी जुळवून घेत अधिक दृढ होऊन समोर आला आहे. आमचा विश्वास आहे की, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हे भारतातील आयटी कंपन्या प्रदान करत असलेल्या मूलभूत मूल्यांमधील व्यत्यय नसून एक असाच बदल दर्शवते,” असे मिरे अॅसेट इन्वेस्टमेंट मॅनेजर्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडचे ईटीएफ प्रॉडक्ट्स हेड आणि फंड मॅनेजर सिद्धार्थ श्रीवास्तव म्हणाले.

उद्योगातील संभाव्य वाढीच्या पुढील टप्प्यात सहभागी

“हे क्षेत्र एका महत्त्वाच्या टप्प्यावर आले असताना, मिरे अॅसेट बीएसई इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंडेक्स फंडचे उद्दिष्ट गुंतवणूकदारांना एआय-संबंधित सेवांमधील प्रगतीच्या नेतृत्वाखालील उद्योगातील संभाव्य वाढीच्या पुढील टप्प्यात सहभागी होण्याची संधी देणे हे आहे.”

७८ कंपन्यांमधील संधींचा समावेश

बीएसई इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंडेक्स हा बीएसई ऑलकॅप विश्वातून तयार केला गेला आहे आणि ७८ कंपन्यांमधील संधींचा समावेश करतो, ज्यामुळे सॉफ्टवेअर व कन्सल्टिंग, आयटी-सक्षम सेवा, सॉफ्टवेअर उत्पादने, संगणक हार्डवेअर आणि उपकरणे या क्षेत्रांमध्ये निफ्टी आयटी इंडेक्सच्या तुलनेत अधिक विविधतापूर्ण पोर्टफोलिओ मिळतो.

लार्ज-कॅप्सचे प्रमाण अंदाजे ७२ टक्के

हा इंडेक्स अधिक संतुलित मार्केट-कॅप मिश्रण देखील प्रदान करतो, ज्यामध्ये लार्ज-कॅप्सचे प्रमाण अंदाजे ७२ टक्के आहे आणि मिड व स्मॉल-कॅप्स एकत्रितपणे उर्वरित २८ टक्के भाग व्यापतात. या तुलनेत निफ्टी आयटी इंडेक्सचे ८०:२० चे प्रमाण प्रामुख्याने लार्ज-कॅप्सकडे झुकलेले आहे. हे गुंतवणूकदारांना प्रस्थापित आयटी प्रमुखांसोबत नव्याने उदयास येणाऱ्या आणि वेगाने वाढणाऱ्या तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये सहभागी होण्याची संधी देते.

या इंडेक्स फंडामध्ये किमान गुंतवणुकीची रक्कम ५,००० रुपये आणि त्यानंतर १ रुपयाच्या पटीत आहे. या फंडाचे व्यवस्थापन श्री. रितेश पटेल आणि श्री. अक्षय उदेशी यांच्याद्वारे केले जाईल.

काय सांगता? मिश्रित इंधनामुळे इंजिन खराब झालं तर मिळणार Claim; Zuno Insurance ने लाँच केले Fuel Guard

Web Title: Mirae asset launches bse information technology index fund nfo details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 05:50 PM

Topics:  

  • bse
  • Mutual Fund

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.