Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रिलायन्स इंडस्ट्रीजकडून महाराष्ट्रात सरकारी बांधकाम कंपनीचे अधिग्रहण; 1,628 कोटींना झालाय व्यवहार

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने शुक्रवारी नवी मुंबई आयआयए प्रायव्हेट लिमिटेड (NMIIA) मध्ये 74 टक्क्यांचे भांगभाडवल 1,628.03 कोटी रुपयांमध्ये विकत घेण्याची घोषणा केली.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Dec 14, 2024 | 08:35 PM
रिलायन्स इंडस्ट्रीजकडून महाराष्ट्रात सरकारी बांधकाम कंपनीचे अधिग्रहण; 1,628 कोटींना झालाय व्यवहार

रिलायन्स इंडस्ट्रीजकडून महाराष्ट्रात सरकारी बांधकाम कंपनीचे अधिग्रहण; 1,628 कोटींना झालाय व्यवहार

Follow Us
Close
Follow Us:

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने शुक्रवारी नवी मुंबई आयआयए प्रायव्हेट लिमिटेड (NMIIA) मध्ये 74 टक्क्यांचे भांगभाडवल 1,628.03 कोटी रुपयांमध्ये विकत घेण्याची घोषणा केली. अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळाने 11 डिसेंबर 2024 रोजी मंजूर केलेला हा करार शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ ऑफ महाराष्ट्र लिमिटेड (CIDCO) च्या संमतीनंतर पूर्ण झाला.

अधिग्रहनाचा व्यवहार

दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने नवी मुंबई IIA प्रायव्हेट लिमिटेडचे 57.12 कोटी शेअर्स 28.50 रुपये प्रति शेअर या दराने विकत घेतले आहेत. जे कंपनीच्या 74 टक्के शेअर्सच्या बरोबरीचे आहे. शुक्रवारी, 13 डिसेंबर रोजी बाजार बंद झाल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजने या कराराची माहिती दिली आहे. नवी मुंबई IIA प्रायव्हेट लिमिटेडमध्ये सिडकोचा उर्वरित 26 टक्के हिस्सा आहे. या संपादनानंतर नवी मुंबई IIA प्रायव्हेट लिमिटेड ही रिलायन्सची उपकंपनी बनली आहे.

पैसे तयार ठेवा! 19 डिसेंबरला येणार 2 मोठे आयपीओ, कमाई करण्याची मोठी संधी?

कंपनीबाबत थोडक्यात माहिती

नवी मुंबई IIA प्रायव्हेट लिमिटेडची उलाढाल 2021-22 या आर्थिक वर्षात 34.74 कोटी रुपये आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 32.89 कोटी रुपये आणि 2023-24 या आर्थिक वर्षात 34.89 कोटी रुपये असल्याची माहिती कंपनीने फाइलिंगमध्ये दिली आहे. कंपनी महाराष्ट्रात औद्योगिक क्षेत्रे बांधण्यात कार्यरत आहे.

NMIIA ची स्थापना 15 जून 2004 रोजी करण्यात आली आणि ती महाराष्ट्रात एकात्मिक औद्योगिक क्षेत्रांच्या (IIA) विकासात गुंतलेली आहे. IIA विकसित करण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर नियोजन अधिनियम, 1966 च्या कलम 40(1B) अंतर्गत महाराष्ट्र सरकारने विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून त्याची नियुक्ती केली आहे.

मोफत आधार कार्ड अपडेट करण्याच्या अंतिम मुदतीत वाढ; 14 जून 2025 पर्यंत असेल संधी!

रिलायन्सच्या शेअर्सची स्थिती

शुक्रवारी RIL चे शेअर्स 0.75 टक्क्यांच्या वाढीसह 1273.35 रुपयांच्या पातळीवर बंद झाले. गेल्या आठवडाभरात कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत जवळपास 3 टक्क्यांची घसरण झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स 2024 मध्ये नकारात्मक राहिले आहेत. या काळात कंपनीच्या शेअर्सची किंमत सुमारे 2 टक्क्यांनी घसरली आहे. ऑक्टोबर महिन्यात कंपनीचा एक्स-बोनस स्टॉक म्हणून व्यवहार झाला होता. तेव्हा कंपनीने एका शेअरवर एक शेअर बोनस दिला होता.

(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Mukesh ambani reliance industries buy 74 percent stake in navi mumbai iia for rs 1628 crore keep eye on stock

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2024 | 08:34 PM

Topics:  

  • Mukesh Ambani
  • Reliance Industries

संबंधित बातम्या

देशभरात अन्न उत्पादन सुविधा उभारण्यासाठी रिलायन्स कंझ्युमरचा सरकारसोबत 40,000 कोटी रुपयांचा करार
1

देशभरात अन्न उत्पादन सुविधा उभारण्यासाठी रिलायन्स कंझ्युमरचा सरकारसोबत 40,000 कोटी रुपयांचा करार

Reliance च्या शेअरधारकांसाठी महत्वाची बातमी! नफा आणि मार्जिन वाढण्याची शक्यता, कारण काय? जाणून घ्या
2

Reliance च्या शेअरधारकांसाठी महत्वाची बातमी! नफा आणि मार्जिन वाढण्याची शक्यता, कारण काय? जाणून घ्या

Jio IPO च्या घोषणेनंतरही कठीण काळ! AGM नंतर कोसळला रिलायन्स इंडस्ट्रीजचा स्टॉक, 1700 च्या वर जाणार का?
3

Jio IPO च्या घोषणेनंतरही कठीण काळ! AGM नंतर कोसळला रिलायन्स इंडस्ट्रीजचा स्टॉक, 1700 च्या वर जाणार का?

एका बाजूला मुकेश अंबानीची AGM, दुसऱ्या बाजूला मात्र रिलायन्सचे बुडले 71000 कोटी रुपये
4

एका बाजूला मुकेश अंबानीची AGM, दुसऱ्या बाजूला मात्र रिलायन्सचे बुडले 71000 कोटी रुपये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.