
JioFinance Super Update: JioFinance Named Feature Launch!
जिओफायनान्स अॅपने नवीन लाँच केलेल्या फीचरमुळे वापरकर्त्यांना त्यांचे म्युच्युअल फंड, बँक खाते आणि स्टॉक पोर्टफोलिओ संबधित सगळी माहिती यामध्ये एकाच ठिकाणी पाहता येईल. यासाठी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर जाण्याची गरज पडणार नाही. तसेच तुमच्या आर्थिक गुंतवणुकींना लिंक करून सहजपणे ट्रॅक आणि विश्लेषण करण्याची वापरकर्त्यांना परवानगी देते.
हेही वाचा : UPI Payment Error: UPI पेमेंट फेल? नेटवर्क, सर्व्हर डाऊन की सुरक्षा अलर्ट — जाणून घ्या खरे कारण
जिओफायनान्सचा हा नवा फीचर वापरकर्त्यांना रोख प्रवाह, खर्च आणि गुंतवणुकीचे संपूर्ण चित्र रिअल-टाइममध्ये दाखवतो. आणि AI-आधारित स्मार्ट सूचनांद्वारे चांगल्या पैशांचे व्यवस्थापन करण्यास देखील मदत करते. पैशांचा मागोवा घेण्यासाठी जिओफायनान्स अॅपमध्ये 3 प्रमुख वैशिष्ट्ये जोडली आहेत.
जिओफायनान्स अॅपमध्ये 3 प्रमुख वैशिष्ट्ये
या वैशिष्ट्याचे काय महत्व आहे?
जिओ फायनान्स प्लॅटफॉर्म अँड सर्व्हिसेस लिमिटेडचे सीईओ सुरभ एस. शर्मा यांनी याबद्दल माहिती देताना ‘प्रत्येक भारतीयाचे आर्थिक जीवन सोपे तसेच, पारदर्शक बनवण्यासाठी जिओफायनान्स अॅपची ही सुविधामहत्वाची आणि उपयुक्त आहे.असे म्हणाले आहेत. लाखो भारतीयांचे आर्थिक बळ अर्थात सक्षमीकरण सुनिश्चित करण्यासाठी या अॅपच्या क्षमता मजबूत करत आहोत. या अॅपद्वारे वापरकर्त्यांना त्यांच्या सर्व वित्तीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करण्यात येतील. ज्यामुळे त्यांचा वेळ वाचेल.
जिओफायनान्सचा वापर कसा करायचा?
Ans: JioFinance कर्जे आणि ठेवी तसेच बाकीच्या बँक खाती आणि गुंतवणूक एकाच ठिकाणी रिअल-टाइममध्ये प्रदर्शित करते. याचा अर्थ संपूर्ण आर्थिक चित्र एकाच ठिकाणी पाहता येते.
Ans: वापरकर्ते त्यांचे बॅलन्स, खर्च आणि गुंतवणूक याचा अभ्यास करण्यासाठी बँक खाती, म्युच्युअल फंड, इक्विटी आणि ETF लिंक करू शकतात. फिक्स्ड आणि रिकरिंग डिपॉझिट देखील जोडू शकतात.
Ans: जे वापरकर्त्यांना AI-आधारित अंतर्दृष्टी आणि सूचनांद्वारे त्यांचे आर्थिक निर्णय सुधारण्यास मदत करते.