Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुकेश अंबानीच्या रिलायन्समध्ये गेल्या 42 हजार नोकऱ्या, 21 लाख कोटींची कंपनी तोट्यात?

Mukesh Ambani Reliance Industries: रिलायन्स इंडस्ट्रीजने FY24 मध्ये 11 टक्के अर्थात 42000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्यात आले आहे. कंपनीने मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2023-24 या आर्थिक वर्षात 42000 कर्मचारी कमी केले असल्याचा अहवाल समोर आलाय. कंपनीने नोकरभरतीत कपात केली आहे. याचा सर्वात मोठा परिणाम रिलायन्सच्या रिटेल क्षेत्रावर दिसून आला आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 08, 2024 | 01:45 PM
मुकेश अंबानी रिलायन्स

मुकेश अंबानी रिलायन्स

Follow Us
Close
Follow Us:

देशातील आघाडीचे उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठ्या प्रमाणात टाळेबंदी करण्यात आली आहे. रिलायन्सने 42000 लोकांना कामावरून काढून टाकले आहे. अंबानींच्या कंपनीची गणना देशातील मोठ्या कंपन्यांमध्ये केली जाते. रिलायन्स इंडस्ट्रीजने आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत 15,138 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. त्यांची कंपनी 21 लाख कोटी रुपयांची उलाढाल करणारी देशातील पहिली कंपनी ठरली आहे. 

रिलायन्स इंडस्ट्रीजचा करपूर्व नफा 1 लाख कोटींच्या पुढे गेला आहे. असे करणारी पहिली भारतीय कंपनी ठरली. मात्रा आता यानंतर धक्कादायक वास्तव समोर आलंय. रिलायन्सने FY24 मध्ये नोकऱ्या 11 टक्क्यांनी कमी केल्या आहेत. कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 (FY24) मध्ये कर्मचाऱ्यांची संख्या 42,000 ने कमी केली असल्याचे आता समोर आलेय. (फोटो सौजन्य – instagram) 

कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात 

रिलायन्स इंडस्ट्रीजने FY24 मध्ये 42000 कर्मचारी कमी केले आहेत टक्केवारीनुसार साधारण 11% कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आहे. कंपनीने मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2023-24 या आर्थिक वर्षात 42000 कर्मचारी कमी केले आहेत. रिलायन्सच्या रिटेल क्षेत्रावर सर्वात मोठा परिणाम दिसून आला आहे, जिथे स्टोअर्सच्या संथ विस्ताराचा प्रभाव दिसून आला आहे.

हेदेखील वाचा – मुकेश अंबानींनी भरली केंद्र सरकारची तिजोरी; हरियाणाच्या अर्थसंकल्पापेक्षाही दिला अधिक पैसा!

काय आहे कारण 

रिलायन्समधील खर्च

रिलायन्सने इनपुट खर्च कमी करण्यासाठी कमी भरती केली आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात रिलायन्समधील कर्मचाऱ्यांची संख्या 389,000 होती, जी 2023-24 या आर्थिक वर्षात 347,000 इतकी कमी झाली. सुमारे 42 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या. कंपनीच्या वार्षिक अहवालानुसार नवीन नियुक्त्यांमध्येही घट झाली आहे. या वर्षी, रिलायन्सने नवीन नियुक्ती एक तृतीयांश पेक्षा कमी करून 170,000 इतकी केली आहे. 

काय सांगतात तज्ज्ञ

रिलायन्स इंडस्ट्रीजमधील कमी होणाऱ्या नोकऱ्यांबाबत एका आघाडीच्या ब्रोकिंग फर्मच्या तज्ज्ञाने सांगितले की, रिलायन्समध्ये नोकऱ्या आता येणार नाहीत असं अजिबात नाही. कंपनीचे नवीन व्यवसाय परिपक्व होत आहेत, कंपनीच्या नवीन व्यवसायांना डिजीटल उपक्रमांकडून पुरेसा पाठिंबा मिळाला आहे. 

आता ते त्यांचे कार्य अधिक चांगल्या पद्धतीने व्यवस्थापित करण्यासाठी त्यांच्याकडे योग्य बळ आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की नवीन व्यवसायाच्या संधी आणि रणनीतीतील बदलांमुळे कंपनीतील प्रमुखांची संख्या वाढणार नाही. कंपनी खर्च व्यवस्थापन आणि कार्यक्षमता चांगल्या प्रकारे समजते आणि त्यामुळे पुढे यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. 

हेदेखील वाचा – मुकेश अंबानी शेअर बाजार सुपरस्टार गुंतवणुकदारांच्या यादीत सामील, जाणून घ्या पोर्टफोलिओ – नेटवर्थ

रिटेल व्यवसायात कपात 

रिलायन्सच्या रिटेल व्यवसायात सर्वात मोठी कपात झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात रिलायन्स रिटेलचा RIL च्या एकूण कर्मचारी संख्येपैकी सुमारे 60% वाटा होता. किरकोळ कर्मचाऱ्यांची संख्या FY23 मध्ये 245,000 च्या तुलनेत FY24 मध्ये 207,000 होती. जर आपण रिलायन्स जिओबद्दल चर्चा करणार असू तर तेथील कर्मचाऱ्यांची संख्या FY23 मध्ये 95,000 वरून FY24 मध्ये 90,000 पर्यंत कमी झाली. कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांमध्ये कपात झाली असली तरी कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या खर्चात 3% वाढ झाली आहे आणि ती 25,699 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

Web Title: Mukesh ambani reliance industries company cut off 11 percent workers highest number of job cuts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2024 | 01:45 PM

Topics:  

  • Business News
  • Mukesh Ambani
  • Reliance Retail

संबंधित बातम्या

Samsung TV युजर्ससाठी खूशखबर! सॅमसंग टीव्‍ही प्‍लसचा टॉप क्रिएटर्ससोबत करार
1

Samsung TV युजर्ससाठी खूशखबर! सॅमसंग टीव्‍ही प्‍लसचा टॉप क्रिएटर्ससोबत करार

Mirae Asset Infrastructure Fund launched! पायाभूत सुविधांच्या महाचक्रात गुंतवणूक करण्याची संधी
2

Mirae Asset Infrastructure Fund launched! पायाभूत सुविधांच्या महाचक्रात गुंतवणूक करण्याची संधी

BLS International ने नोंदवली आतापर्यंतची सर्वोच्च तिमाही कामगिरी; चीनमध्ये व्हिसा करार, जागतिक विस्तार
3

BLS International ने नोंदवली आतापर्यंतची सर्वोच्च तिमाही कामगिरी; चीनमध्ये व्हिसा करार, जागतिक विस्तार

LNG Project: दहशतवादी हल्ल्यामुळे थांबलेला मोझांबिक एलएनजी प्रकल्प 53 महिन्यांनंतर पुन्हा मार्गावर; या प्रकल्पात भारताचा मोठा वाटा
4

LNG Project: दहशतवादी हल्ल्यामुळे थांबलेला मोझांबिक एलएनजी प्रकल्प 53 महिन्यांनंतर पुन्हा मार्गावर; या प्रकल्पात भारताचा मोठा वाटा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.