Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुकेश अंबानींची म्युच्यूअल फंडात एन्ट्री; जिओ-ब्लॅकरॉकला सेबीने दिली मंजुरी!

सिक्‍युरिटीज अँड एक्‍स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) जिओ आणि ब्लॅकरॉक यांना म्युच्यूअल फंडात येण्यास मंजुरी दिली आहे. या दोन्ही कंपन्यांनी संयुक्तपणे ऑक्टोबर 2023 मध्ये परवान्यासाठी सेबीकडे अर्ज केला होता. या दोन्ही कंपन्या त्यांच्या नव्या प्रकल्पासाठी 15-15 कोटी डॉलर्सची गुंतवणूक करणार आहेत.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 05, 2024 | 09:48 PM
मुकेश अंबानींची म्युच्यूअल फंडात एन्ट्री; जिओ-ब्लॅकरॉकला सेबीने दिली मंजुरी!

मुकेश अंबानींची म्युच्यूअल फंडात एन्ट्री; जिओ-ब्लॅकरॉकला सेबीने दिली मंजुरी!

Follow Us
Close
Follow Us:

सिक्‍युरिटीज अँड एक्‍स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) भांडवली बाजार नियामक संस्थेने म्युच्यूअल फंड मार्केटशी निगडीत मोठा निर्णय घेतला आहे. सेबीने जिओ आणि ब्लॅकरॉक यांना म्युच्यूअल फंडात येण्यास मंजुरी दिली आहे. उद्योगपती मुकेस अंबानी यांच्या नेतृत्त्वातील जिओ फायनॅन्शियल सर्व्हिसेसच्या म्युच्यूअल फंडातील प्रवेशामुळे या क्षेत्रातील स्पर्धा वाढू शकते.

2023 साली झालाय करार

जिओ फायनॅन्शियलने शुक्रवारी एक्स्चेंज फायलिंगमध्ये याबाबत अधिक माहिती दिली आहे. जिओ फायनॅन्शियलने दिलेल्या माहितीनुसार 3 ऑक्टोबर रोजी ब्लॅकरॉक फायनॅन्शियल मॅनेजमेंटसोबतच्या संयुक्त व्हेंचरला म्युच्यूअल फंडात प्रवेश करण्यास तत्त्वत: मंजुरी देण्यात आली आहे. जिओ आणि ब्लॅकरॉक या दोन्ही कंपन्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे सेबीकडे सुपूर्द केल्यानंतर त्यांच्या या व्हेंचरला अंतिम मंजुरी दिली जाईल. या दोन्ही कंपन्यांनी जुलै 2023 मध्ये एकमेकांशी करार केलेला आहे. म्युच्यूअल फंड मार्केटमध्ये प्रवेश मिळावा. या दोन्ही कंपन्यांनी संयुक्तपणे ऑक्टोबर 2023 मध्ये परवान्यासाठी सेबीकडे अर्ज केला होता. या दोन्ही कंपन्या त्यांच्या नव्या प्रकल्पासाठी 15-15 कोटी डॉलर्सची गुंतवणूक करणार आहेत.

हे देखील वाचा – धोनीचा ‘ड्रोन’ शॉट, हा आयपीओ येण्याआधीच गुंतवले 4 कोटी रुपये; वाचा… का केलीये माहीने गुंतवणूक!

‘चांगला गंतवणूक पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न’

ब्लॅकरॉक आणि जिओच्या या जॉइंट व्हेंचरला मंजुरी मिळाल्यानंतर ब्लॅकरॉक कंपनीच्या रेचल लॉर्ड यांनी प्रतिक्रिया दिली. सेबीच्या या निर्णयामुळे आम्हाला आनंद झाला आहे. आम्ही भारतातील कोट्यवधी लोकांना स्वस्त आणि चांगला गंतवणूक पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू. जिओ फायनॅन्शियल सर्व्हिस या कंपनीसोबत हातमिळवणी करून आम्ही भारताला बचत करणाऱ्या देशापासून गुंतवणूक करणाऱ्या देशात बदलण्यासाठी प्रयत्न करू. ब्लॅकरॉक आणि जिओ फायनॅन्सियल सर्व्हिसेस या दोन्ही कंपन्या वेल्थ मॅनेजमेंट आणि स्टॉक ब्रोकिंग बिझनेसमध्ये काम करणार आहेत.

कंपनी 2023 मध्ये शेअर बाजारावर सूचिबद्ध

जिओ फायनॅन्शियल सर्व्हिसेस ही कंपनी वेगवेगळ्या प्रकारच्या वित्तीय सेवा देता. अगोदर ही कंपनी रिलायन्स उद्योग समूहाची एक उपकंपनी होती. ऑगस्ट 2023 मध्ये ही कंपनी शेअर बाजारावर सूचिबद्ध झाली. जिओ फायनॅन्शियल सर्व्हिसेस या कंपनीची उपकंपनी जिओ फायनान्स या कंपनीकडे एनबीएफसीचा परवाना आहे. याच कंपनीची जिओ पेमेंट्स बँक ही आणखी एक उपकंपनी आहे. जिओ फायनॅन्शियल सर्व्हिसेस या कंपनीला एनबीएफसीतून कोअर इन्व्हेस्टमेंट कंपनीत बदलण्यास आरबीआयने मंजुरी दिली आहे.

(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Mukesh ambanis entry into mutual funds sebi approved jio blackrock deal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2024 | 06:48 PM

Topics:  

  • Mukesh Ambani
  • Mutual Fund
  • sebi

संबंधित बातम्या

Jio IPO च्या घोषणेनंतरही कठीण काळ! AGM नंतर कोसळला रिलायन्स इंडस्ट्रीजचा स्टॉक, 1700 च्या वर जाणार का?
1

Jio IPO च्या घोषणेनंतरही कठीण काळ! AGM नंतर कोसळला रिलायन्स इंडस्ट्रीजचा स्टॉक, 1700 च्या वर जाणार का?

भारतातील मध्यमवर्गाची पसंती Mutual Fund गुंतवणुकीला, बँक ठेवींचा वाटा झाला कमी
2

भारतातील मध्यमवर्गाची पसंती Mutual Fund गुंतवणुकीला, बँक ठेवींचा वाटा झाला कमी

एका बाजूला मुकेश अंबानीची AGM, दुसऱ्या बाजूला मात्र रिलायन्सचे बुडले 71000 कोटी रुपये
3

एका बाजूला मुकेश अंबानीची AGM, दुसऱ्या बाजूला मात्र रिलायन्सचे बुडले 71000 कोटी रुपये

Reliance Industries AGM 2025 : जिओचा IPO कधी येणार? मुकेश अंबानींची मोठी घोषणा
4

Reliance Industries AGM 2025 : जिओचा IPO कधी येणार? मुकेश अंबानींची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.