धोनीचा 'ड्रोन' शॉट, हा आयपीओ येण्याआधीच गुंतवले ४ कोटी रुपये; वाचा... का केलीये माहीने गुंतवणूक!
महेंद्रसिंग धोनी हे क्रिकेट जगतात झळकणारे मोठे नाव आहे. मात्र, मैदानापासून दुर असणारा माही सध्या उद्योग जगतात. चांगलाच प्रसिद्ध असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या शेअर बाजार आठवडाभरापासून मोठी घसरण दिसून आली आहे. असे असतानाही आता भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने एका ड्रोन बनवणाऱ्या कंपनीत मोठी गुंंतवणूक केली आहे. ही कंपनी लवकरच आपला आयपीओ लाँन्च करण्याच्या तयारीत असून, धोनीने त्यात आपले ४ कोटी रुपये लावले आहेत.
महेंद्रसिंग धोनी क्रिकेटच्या मैदानावरच नव्हे तर व्यावसायिक जगतातही मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो. त्याने यापुर्वी अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. आता धोनीने ड्रोन निर्मिती कंपनी गरुड एरोस्पेसमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. धोनीने ही रक्कम अशा वेळी गुंतवली आहे. जेव्हा कंपनी आपला आयपी लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
धोनीने गरुड एरोस्पेसमध्ये किती रक्कम गुंतवली आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार ही रक्कम 4 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या गुंतवणुकीनंतर धोनीची या कंपनीतील भागीदारी 1.1 टक्के झाली आहे. धोनीने या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यात त्याने आधीच पैसेही गुंतवले आहेत.
काय म्हणालाय धोनी?
धोनी म्हणाला आहे की, गरुडच्या प्रवासाचा एक भाग असल्याचा मला अभिमान आहे कारण ते जागतिक स्तरावर विस्तारत आहेत. तसेच, कृषी, संरक्षण, उद्योग आणि ग्राहक ड्रोन यांचा या क्षेत्रावर सकारात्मक परिणाम होत आहे. तर गरुड एरोस्पेसचे संस्थापक आणि सीईओ अग्निश्वर जयप्रकाश म्हणाले आहे की, धोनीने गरुड एरोस्पेसमध्ये आपल्या सर्वांना प्रेरणा दिली आहे. त्याचे प्रोत्साहन आणि अतुलनीय पाठिंबा आम्हा सर्वांना आमचे सर्वोत्तम देण्यासाठी प्रेरणा देतो. धोनीच्या स्टार पॉवरने गरुडला भारताच्या सर्वात दुर्गम कानाकोपऱ्यात पोहोचण्यास सक्षम केले आहे.
अनेक कंपन्यांमध्ये धोनीची गुंतवणूक
धोनीची अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे. तो सध्या आयपीएलमध्ये खेळतो. अशा परिस्थितीत त्याचे उत्पन्न क्रिकेटबरोबरच व्यवसायातूनही होते. धोनी सुप्रसिद्ध कपडे ब्रँड सेव्हनचाही संस्थापक आहे. तो जाहिरातींमधून पैसेही कमावतो. धोनीकडे रांचीमध्ये माही रेसिडेन्सी आणि बेंगळुरूमध्ये एमएस धोनी ग्लोबल स्कूल नावाचे मध्यम श्रेणीचे हॉटेल देखील आहे. धोनीकडे ‘धोनी स्पोर्ट्सफिट’ नावाची जिमची साखळीही आहे. एका रिपोर्टनुसार धोनीची एकूण संपत्ती 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)