Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ आहेत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दोन बहिणी; …एक तर चालवते अब्जावधींच्या कंपनीचा कारभार!

मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांचा मुलगा अनंत अंबानी यांचा विवाह राधिका मर्चंट यांच्यासोबत १२ जुलै रोजी होणार आहे. यासाठी अनेकांना आमंत्रण देण्यात आले आहे. विशेष म्हणजे मुकेश अंबानी यांच्या दोन बहिणी देखील या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jul 09, 2024 | 09:42 PM
'या' आहेत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दोन बहिणी; ...एक तर चालवते अब्जावधींच्या कंपनीचा कारभार!

'या' आहेत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दोन बहिणी; ...एक तर चालवते अब्जावधींच्या कंपनीचा कारभार!

Follow Us
Follow Us:

देशातील सर्वात महत्त्वाची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांचे पुत्र मुकेश आणि अनिल अंबानी यांच्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. पण त्यांच्या दोन बहिणी दीप्ती आणि नीना यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहितीये. कारण या दोन्ही बहिणी नेहमी प्रसिद्धीपासून लांब राहतात. मात्र, त्या दोघीही प्रसिद्ध उद्योगपतीच्या पत्नी असून, नीना कोठारी या तर आपल्या पतीच्या मृत्यूनंतर अब्जावधी रुपयांचा कारभार सांभाळत आहे. तर दीप्ती साळगावकर या गोव्यातील व्यापारी दत्तराज साळगावकर यांच्याशी झाला आहे.

हळदी समारंभाला उपस्थिती

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा १२ जुलै रोजी विवाह होणार आहे. सोमवारी (ता.८) रात्री अँटिलियामध्ये हळदी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यात अंबानी कुटुंबातील सदस्य तर होतेच पण अनेक सेलिब्रिटी ही सहभागी झाले होते. मुकेश अंबानी यांची मोठी बहीण नीना कोठारी आणि धाकटी बहीण दीप्ती साळगावकर देखील या समारंभात पोहोचल्या होत्या. परिणामी, आता दोघींही चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.

नीना कोठारी सांभाळतात भावाप्रमाणेच अब्जावधींचा कारभार

मुकेश अंबानी यांची मोठी बहीण नीना कोठारी या देखील एक बिझनेसवुमन असून, त्या आपल्या भावाप्रमाणेच अब्जावधींचा कारभार सांभाळत आहे. त्यांचा विवाह 1986 साली प्रसिद्ध व्यावसायिक भद्रश्याम कोठारी यांच्यासोबत झाला. मात्र, 2015 मध्ये भद्रश्याम कोठारी यांचे कॅन्सरमुळे निधन झाले. तेव्हापासून नीना कोठारी याच ‘कोठारी शुगर्स एंड केमिकल्स लिमिटेड’ या आपल्या पतीच्या कारभार सांभाळत आहे. नीना कोठारी यांना नयनतारा कोठारी आणि अर्जुन कोठारी अशी दोन मुले आहेत.

कोण आहेत दीप्ती साळगावकर?

दीप्ती साळगावकर या अंबानी भावंडांमध्ये सर्वात लहान आहेत. त्यांचा जन्म 23 जानेवारी 1962 रोजी झालाय. त्यांचा विवाह गोव्यातील व्यापारी दत्तराज साळगावकर यांच्याशी झाला आहे. दीप्ती यांच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. कारण त्या प्रसिद्धीपासून दूर राहतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीप्ती यांची संपत्ती सुमारे एक अब्ज डॉलर्स इतकी आहे. त्यांचे पती दतराज साळगावकर हे गोव्यातील प्रसिद्ध व्यापारी आहेत. व्हीएम साळगावकर ग्रुप ऑफ कंपनीजचे ते मालक आणि एमडी आहेत.

Web Title: Mukesh ambanis two sisters nina dipti one runs a multi billion company

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2024 | 09:42 PM

Topics:  

  • Mukesh Ambani
  • reliance group
  • Reliance Industries

संबंधित बातम्या

Forbesच्या श्रीमंतांच्या यादीत मोठा उलटफेर! गौतम अदानी पुन्हा नंबर 1, अंबानींचं स्थान घसरलं
1

Forbesच्या श्रीमंतांच्या यादीत मोठा उलटफेर! गौतम अदानी पुन्हा नंबर 1, अंबानींचं स्थान घसरलं

Mumbai News: सचिन वाझेंच्या जामिनावर कोर्टाचा निर्णय; अँटिलिया प्रकरणातील साडेपाच वर्षांचा कारावास
2

Mumbai News: सचिन वाझेंच्या जामिनावर कोर्टाचा निर्णय; अँटिलिया प्रकरणातील साडेपाच वर्षांचा कारावास

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
3

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.