Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nepal Flood Damage : नेपाळमध्ये निसर्गाचा तांडव! सगळीकडे हाहाःकार… पूरग्रस्त देश सावरण्यासाठी 48000 कोटींची गरज

Nepal Flood Damage : नेपाळमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेला भीषण पूर आणि भूस्खलनामुळे देशाचे अभूतपूर्व नुकसान झाले आहे. जलप्रलयातून सावरत उद्ध्वस्त झालेला देश पुन्हा पूर्ववत उभा करण्यासाठी तब्बल ४८,००० कोटी रुपयांचा प्रचंड खर्च येणार असल्याचा अंदाज आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 29, 2026 | 08:05 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • नेपाळमध्ये निसर्गाचा तांडव!
  • सगळीकडे हाहाःकार…
  • देश सावरण्यासाठी 48000 कोटींची गरज
Nepal Flood Damage : नेपाळमध्ये निसर्गाने रौद्ररुप दाखवलं. विनाशकारी आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस माजला आहे. अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत रस्ते, पूल आणि वीजपुरवठा यांसारख्या अत्यावश्यक सेवांचं नुकसान झालं आहे. सगळी घरं चिखलाच्या साम्राज्यात डुबुन गेली आहे. बरीच माणसं बेपत्ता आहेत. आता देशासमोर पूरग्रस्त भागांचे पुनर्वसन करणे आणि अत्यावश्यक पायाभूत सुविधा पूर्ववत करण्याचे मोठे आव्हान निर्माण झालं आहे. देशाला पुन्हा वसवण्यासाठी 48000 कोटी रुपयांचा खर्च येऊ शकतो. असा अंदाज वर्तवला गेला आहे. ( Nepal Flood Damage ) 

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! वार्षिक पगारवाढ दुप्पट होणार? किती पगार वाढणार?

नेपाळचे एकमेव अब्जाधीश आणि चौधरी ग्रुपचे अध्यक्ष, बिनोद चौधरी यांनी हा अंदाज व्यक्त केला. त्यांच्या मते, या संपूर्ण प्रक्रियेसाठी किमान ५ अब्ज डॉलर्स, म्हणजेच अंदाजे ४८,००० कोटी रुपये खर्च येऊ शकतो. चौधरी यांनी सांगितले की, या नुकसानीची भरपाई केवळ आर्थिक माध्यमातून करता येणार नाही. तर त्यासाठी बराच वेळही लागू शकतो. नेपाळची भौगोलिक परिस्थिती पुनर्रचना प्रक्रियेला आणखी गुंतागुंतीची बनवू शकते, ज्यामुळे सरकार आणि खाजगी क्षेत्र या दोघांसमोर एक मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.

पुरामुळे माजला विध्वंस

२६ ऑगस्ट रोजी, चीनला लागून असलेल्या नेपाळच्या पर्वतीय प्रदेशात अचानक आलेल्या पुरामुळे अनेक भागांवर परिणाम झाला. पाण्याच्या या अचानक आलेल्या प्रवाहाने अनेक रस्ते आणि पूल वाहून नेले. बऱ्याच गावांमध्ये पाणी शिरलं. या आपत्तीत मोठ्या संख्येने लोक मृत आणि बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. वितळणाऱ्या हिमनद्यांमुळे हा पूर आला असल्याचा सांगितलं जात आहे.

चौधरी ग्रुपकडून मदतीची तयारी

चौधरी ग्रुपने पुरामुळे बाधित झालेल्यांना मदत करण्यासाठी सरकार, स्थानिक भागीदार आणि लष्करासोबत काम करण्याची तयारी केली आहे. कंपनीने बाधितांना मदत करण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांना कामाला लावले आहे. या योजनेअंतर्गत,लोकांसाठी पुनर्वसन केंद्रे लवकरच स्थापन करण्याची योजना आहे. याव्यतिरिक्त, बाधित कुटुंबांसाठी घरे पुन्हा बांधणे, व्यवसाय पुन्हा सुरू करणे आणि नुकसान झालेल्या शाळांना आधार देण्याचे कामही केले जाईल. नेपाळचे एकमेव अब्जाधीश चौधरी ग्रुपचे अध्यक्ष बिनोद चौधरी यांच्याकडून मोठी मदत येत आहे.

Infosys Executive Missing : नेपाळमध्ये निसर्गाचा भयंकर कोप! महापुरात इन्फोसिसचे दिग्गज अधिकारी बेपत्ता!

Web Title: Nepal flood damage devastation rebuilding country requires 48000 crores

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 08:05 PM

Topics:  

  • Nepal Flood
  • Nepal News

संबंधित बातम्या

नेपाळच्या पूरस्थितीने हेलावला ‘टॉक्सिक’चा गायक, घेतला मोठा निर्णय, म्हणाला- “मी लवकरच…”
1

नेपाळच्या पूरस्थितीने हेलावला ‘टॉक्सिक’चा गायक, घेतला मोठा निर्णय, म्हणाला- “मी लवकरच…”

Nepal Flood: नेपाळ जलप्रलयामुळे बिहारमध्ये सतर्कतेचा इशारा; गंडक, कोसी धरणांचे दरवाजे उघडले, 5 जिल्ह्यांमध्ये 24 तास हाय अलर्ट
2

Nepal Flood: नेपाळ जलप्रलयामुळे बिहारमध्ये सतर्कतेचा इशारा; गंडक, कोसी धरणांचे दरवाजे उघडले, 5 जिल्ह्यांमध्ये 24 तास हाय अलर्ट

Infosys Executive Missing : नेपाळमध्ये निसर्गाचा भयंकर कोप! महापुरात इन्फोसिसचे दिग्गज अधिकारी बेपत्ता!
3

Infosys Executive Missing : नेपाळमध्ये निसर्गाचा भयंकर कोप! महापुरात इन्फोसिसचे दिग्गज अधिकारी बेपत्ता!

Nepal Flash Flood: आंतरराष्ट्रीय मदतीबाबत बालेन शाह यांचा मोठा निर्णय; भारत आणि चीनकडे आपत्कालीन याचना
4

Nepal Flash Flood: आंतरराष्ट्रीय मदतीबाबत बालेन शाह यांचा मोठा निर्णय; भारत आणि चीनकडे आपत्कालीन याचना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.