Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NHAI New Toll Rules : 1 नोव्हेंबरपासून बदलणार Highway Toll चे नियम! फक्त ‘इतक्या’ रुपयांत मिळणार संपूर्ण वर्षाचा टोल पास

NHAI New Toll Rules : राष्ट्रीय महामार्गांवरील प्रवास करणाऱ्या आणि टोल प्लाझाच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांसाठी केंद्र सरकारकडून एक अत्यंत दिलासादायक घोषणा करण्यात आली आहे. येत्या १ नोव्हेंबर २०२६ पासून लागू होणाऱ्या नव्या नियमांनुसार, टोल प्लाझाच्या २० किलोमीटर परिघात राहणाऱ्या खासगी वाहनधारकांसाठी पास उपलब्ध करुन दिला जाणार आहे

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 27, 2026 | 12:41 PM
1 नोव्हेंबरपासून बदलणार Highway Toll चे नियम! ( सौजन्य - सोशल मीडिया )

1 नोव्हेंबरपासून बदलणार Highway Toll चे नियम! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • 1 नोव्हेंबरपासून बदलणार Highway Toll चे नियम!
  • फक्त ‘इतक्या’ रुपयांत मिळणार संपूर्ण वर्षाचा टोल पास
  • पाससाठी कोण करु शकतं अर्ज?
NHAI New Toll Rules : वाहनधारकांनो लक्ष द्या, जर तुम्ही सतत प्रवास करत असाल आणि तुम्हाला नेहमी टोल भरावा लागत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. १ नोव्हेंबरपासून नियमांमध्ये बदल होणार आहे.रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम, 2008 मध्ये सुधारणा केली आहे. या बदलत्या नियमांचा नेमका कोणाला आणि किती फायदा होणार? याबाबत जाणून घेऊयात. ( NHAI New Toll Rules ) 

Share Market Today: शेअर बाजारात पुन्हा घसरणीचे संकेत! कोणते स्टॉक्स ठरणार महत्त्वाचे? पाहा संपूर्ण यादी

जे लोकं टोल प्लाझाच्या आसपास राहतात त्यांना सतत टोल भरावा लागत असेल त्यांच्यासाठी देखील ही बातमी दिलासा देणारी आहे. कारण आता त्यांना दररोज टोल टॅक्स भरण्याच्या खर्चापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. टोल प्लाझाच्या 20 किलोमीटर परिघात राहणारे काही खाजगी वाहन मालक वार्षिक स्थानिक टोल पास घेऊ शकतील. हा नवीन नियम 1 नोव्हेंबर 2026 पासून लागू होणार आहे. या पाससाठी शासनाने वार्षिक शुल्क निश्चित केलं आहे. मात्र याचा लाभ घेण्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत.

पाससाठी कोण करु शकतं अर्ज?

नवीन नियमानुसार, टोल प्लाझाच्या २० किलोमीटरच्या परिसरात राहणारे बिगर-व्यावसायिक वाहन मालक सवलतीच्या पाससाठी अर्ज करू शकतील. पासचे शुल्क टोल प्लाझाच्या स्थानावर अवलंबून असेल. जर टोल प्लाझा नगरपालिका किंवा स्थानिक शहर क्षेत्राच्या हद्दीबाहेर असेल, तर वार्षिक पासची किंमत ₹१,५०० असणार आहे. मात्र नगरपालिका किंवा स्थानिक शहर क्षेत्राच्या हद्दीत असलेल्या टोल प्लाझासाठी वार्षिक शुल्क ₹३,००० असणार आहे. हा पास संबंधित टोल प्लाझावर प्रवासासाठी वैध असेल. यामुळे पात्र वाहन मालकांना वारंवार टोल भरण्याची गरज भासणार नाही तर एक निश्चित वार्षिक शुल्क भरण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

कोणाला मिळणार नाही फायदा?

ही सुविधा केवळ खाजगी वाहनांसाठी उपलब्ध असेल. वाहनावर एक वैध आणि सक्रिय FASTag असणे आवश्यक आहे. हा पास केवळ संबंधित आसपासच्या टोल प्लाझावरच वैध असणार आहे. पण, प्रत्येक स्थानिक रहिवाशाला या सुविधेचा लाभ घेता येणार नाही. जर येण्या-जाण्यासाठी सर्व्हिस रोड किंवा पर्यायी रस्ता उपलब्ध असेल, तर सवलतीचा पास दिला जाणार नाही. याव्यतिरिक्त, हा पास राष्ट्रीय महामार्गांवर किंवा द्रुतगती मार्गांवर वैध असणार नाही, जिथे कापलेल्या अंतरावर आधारित टोल आकारला जातो.

दरांमध्ये होणार वार्षिक बदल

अधिसूचनेनुसार, सरकार दरवर्षी १ एप्रिल रोजी या पाससाठीचे निर्धारित दर सुधारित करेल. याचा अर्थ असा की, वार्षिक शुल्क भविष्यात बदलू शकते. एकूणच, हा नियम टोल प्लाझाजवळ राहणाऱ्या पात्र खाजगी वाहन मालकांना दिलासा देऊ शकतो. मात्र, पास बनवण्यापूर्वी, वाहनाची पात्रता आणि संबंधित टोल प्लाझावर लागू असलेल्या अटी जाणून घेणे आवश्यक असेल.

Diwali मध्ये Credit Card वर बेस्ट ऑफर्स! 70000 पर्यंत रक्कम वाचवाल? जाणून घ्या बँकांची ऑफर

💡

Frequently Asked Questions

  • Que: हा वार्षिक टोल पास काढण्यासाठी कोण पात्र असणार आहे?

    Ans: जे वाहनधारक संबंधित टोल प्लाझापासून २० किलोमीटरच्या परिघात राहतात आणि ज्यांच्याकडे वैध व सक्रिय फास्टॅग असलेली खाजगी व गैर-व्यावसायिक वाहने आहेत, ते या पाससाठी पात्र असतील.

  • Que: वार्षिक लोकल टोल पासचे शुल्क किती असणार आहे?

    Ans: पास टोल प्लाझाच्या स्थानानुसार ठरवला गेला असून, महापालिका किंवा स्थानिक शहर हद्दीबाहेरील प्लाझासाठी वार्षिक शुल्क १,५०० रुपये आणि हद्दीत असलेल्यांसाठी ३,००० रुपये इतके असेल.

  • Que: नवीन नियमांबाबत इतर काय अटी किंवा मर्यादा आहेत?

    Ans: हा पास केवळ त्याच एका विशिष्ट टोल प्लाझासाठी मान्य असेल ज्यासाठी तो काढला गेला आहे. तसेच, जर संबंधित प्रवाशांच्या रहिवासी मार्गावर पर्यायी सर्व्हिस रोड उपलब्ध असेल, तर ते या सवलतीसाठी पात्र ठरत नाहीत.

Web Title: Nhai new toll rules annual pass for rs 1500 from november 1 marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 12:41 PM

Topics:  

  • NHAI
  • Toll
  • Toll Plaza

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.