Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NSE IPO : NSE मधील गुंतवणुकीतून मालामाल! Soach Global विकणार 20% हिस्सा; मिळणार 25 पट रिटर्न

NSE IPO : मॉरिशसस्थित 'Soach Global Opportunities Fund' ने NSE मधील आपल्या दशकभरापूर्वीच्या गुंतवणुकीतील २०% हिस्सा IPO च्या ऑफर फॉर सेलद्वारे विकण्याचा निर्णय घेतला आहे. या विक्रीतून कंपनीला सुमारे २५ पट परतावा मिळण्याची अपेक्षा आहे,

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 17, 2026 | 02:21 PM
NSE मधील गुंतवणुकीतून मालामाल! ( सौजन्य - सोशल मीडिया )

NSE मधील गुंतवणुकीतून मालामाल! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • NSE मधील गुंतवणुकीतून मालामाल!
  • Soach Global विकणार 20% हिस्सा
  • मिळणार 25 पट रिटर्न
NSE IPO : मॉरिशसमध्ये स्थित Soach Global Strategic Holdings Limited ही Soach Global Opportunities Fund ची पूर्ण मालकीची उपकंपनी असून (दोन्हींना एकत्रितपणे “Soach Global” असे संबोधले आहे), कंपनीने नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडमधील दशकभरापूर्वी केलेल्या गुंतवणुकीतील काही हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आहे. फंड NSE च्या प्रारंभिक सार्वजनिक समभाग विक्रीत (IPO) ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून आपल्या हिस्सेदारीचा काही भाग विकत आहे. IPO आज खुला झाला आहे. ( NSE IPO ) 

Stock Market मध्ये भीतीचं वातावरण! China च्या एन्ट्रीने उडाली खळबळ… आता काय होणार?

गुंतवणुकीचे एकूण मूल्य ₹59.25 कोटी

फंडाने जानेवारी 2016 मध्ये इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (IFCI) कडून NSE चे 1,50,000 इक्विटी शेअर्स प्रति शेअर ₹3,950 या दराने खरेदी केले होते. या गुंतवणुकीचे एकूण मूल्य ₹59.25 कोटी होते. त्यानंतरच्या दशकभरात विविध कॉर्पोरेट कृतींमुळे कोणतीही अतिरिक्त गुंतवणूक न करता फंडाची हिस्सेदारी वाढून 82,50,000 शेअर्स झाली. या कॉर्पोरेट कृतींचा समायोजित विचार केल्यानंतर फंडाची सरासरी अधिग्रहण किंमत प्रति शेअर ₹71.8 आहे.

सुमारे 25 पट परतावा

आता फंड आपल्या 82,50,000 शेअर्सपैकी 16,50,000 इक्विटी शेअर्स विकत आहे. हे त्याच्या एकूण हिस्सेदारीच्या 20% इतके आहे. IPO च्या ₹1,700 ते ₹1,785 प्रति शेअर या किंमतपट्ट्यानुसार या विक्रीचे मूल्य सुमारे ₹280 कोटी ते ₹295 कोटी इतके असेल. यामुळे फंडाला त्याच्या मूळ एकूण गुंतवणुकीच्या जवळपास पाच पट रक्कम मिळेल, म्हणजेच सुमारे 25 पट परतावा मिळेल. फंड NSE मधील उर्वरित 66,00,000 शेअर्सची हिस्सेदारी, म्हणजेच आपल्या एकूण हिस्सेदारीपैकी 80% हिस्सा कायम ठेवणार आहे. या किंमतपट्ट्यानुसार या उर्वरित हिस्सेदारीचे मूल्य सुमारे ₹1,120 कोटी ते ₹1,180 कोटी इतके आहे.

केवळ 13 कोटी लोक NSE वर नोंदणीकृत गुंतवणूकदार

Soach Global Opportunities Fund चे संस्थापक आणि संचालक अनुभव दयाल म्हणाले, “भारत ही वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. मोठ्या संख्येने तरुण विकासाच्या संधींचा शोध घेत आहेत आणि भांडवली बाजारात सहभागी होण्यातील जोखीम आणि संधी याबाबत वेगाने जाणून घेत आहेत. आम्ही ऑफर फॉर सेलमध्ये सहभागी होत आमच्या मालकीतील काही हिस्सा विकत आहोत, कारण मोठ्या संख्येने सामान्य रिटेल गुंतवणूकदारांनी NSE मध्ये काही हिस्सा असावा, अशी आमची इच्छा आहे. हे रिटेल गुंतवणूकदार NSE मध्ये थेट किंवा म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून छोटी हिस्सेदारी खरेदी करतील, तेव्हा त्यांनाही NSE च्या वाढीचा फायदा मिळेल, ज्याप्रमाणे गेल्या दहा वर्षांपूर्वी NSE मध्ये गुंतवणूक करून आम्हाला मिळाला आहे. भारताच्या 1.4 अब्ज लोकसंख्येपैकी केवळ सुमारे 13 कोटी लोक NSE वर नोंदणीकृत गुंतवणूकदार आहेत आणि हीच एक मोठी संधी आहे.”

NSE च्या महसुलात वाढ होऊ शकते

ते पुढे म्हणाले, “आपल्या देशात सण किंवा कौटुंबिक समारंभांच्या वेळी सोने खरेदी करण्याची परंपरा आहे. एकदा कुटुंबाने खरेदी केलेले सोने दीर्घकाळ, अगदी अनेक पिढ्यांपर्यंत जपून ठेवले जाते. पैशांची अत्यंत गरज भासल्याशिवाय ते सहसा विकले जात नाही. रिटेल गुंतवणूकदार NSE च्या शेअर्सची तुलना सोने खरेदीशी करू शकतात. मल्टी-ॲसेट-क्लास ट्रेडिंग प्लॅटफॉर्म म्हणून NSE च्या महसुलात वाढ होऊ शकते, तर त्याचा ऑपरेटिंग खर्च मोठ्या प्रमाणात स्थिर राहील, कारण त्यातील बहुतांश खर्च यापूर्वीच करण्यात आला आहे. हे नॅनोसेकंदमध्ये व्यवहारांचे सेटलमेंट करणारे हाय-टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म आहे”.

स्थिर खर्चाच्या आधारावर महसुलात वाढ

“तसेच इक्विटी, कमोडिटीज, वीज वायदे, बाँड इंडेक्स फ्युचर्स आणि कोळसा अशा विविध ॲसेट क्लासेसमध्ये व्यवहार करण्याची सुविधा देते. भारताची अर्थव्यवस्था जसजशी विकसित होईल, तसतशी व्यवहार करता येणाऱ्या उत्पादनांची यादीही वाढत जाईल. त्यामुळे मोठ्या प्रमाणात स्थिर खर्चाच्या आधारावर महसुलात वाढ होईल. याचा परिणाम लिस्टिंगनंतर NSE च्या प्रति शेअर किमतीतही दिसून येईल. ही आमच्या हिस्सेदारीची एकतर्फी आंशिक विक्री आहे आणि पुन्हा गुंतवणूक करण्याची आमची कोणतीही योजना नाही.”

सांगता काय? UPI Transactions वर डबल दणका… 2000 पेक्षा जास्तच्या MDR वर लागू होणार 18 % GST

Web Title: Nse ipo soach global 25 times returns partial stake sale marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 02:21 PM

Topics:  

  • IPO News
  • share market

संबंधित बातम्या

Share Market Today : सुसाट… कालच्या क्रॅशनंतर आज बाजारात तुफान तेजी! उघडताच ‘या’ शेअर्सनी मारली मोठी उसळी; गुंतवणूकदार खूश
1

Share Market Today : सुसाट… कालच्या क्रॅशनंतर आज बाजारात तुफान तेजी! उघडताच ‘या’ शेअर्सनी मारली मोठी उसळी; गुंतवणूकदार खूश

Multibagger Stock : 4 वर्षांत गुंतवणूकदार झाले करोडपती; कंडोम बनवणाऱ्या कंपनीचा शेअर सुसाट! 3 वेळा दिला बोनस
2

Multibagger Stock : 4 वर्षांत गुंतवणूकदार झाले करोडपती; कंडोम बनवणाऱ्या कंपनीचा शेअर सुसाट! 3 वेळा दिला बोनस

Africa IPO : डांगोटे रिफायनरीचा विक्रमी IPO! आफ्रिकेतील सर्वात मोठ्या शेअर विक्रीतून उभारणार अब्जावधी डॉलर
3

Africa IPO : डांगोटे रिफायनरीचा विक्रमी IPO! आफ्रिकेतील सर्वात मोठ्या शेअर विक्रीतून उभारणार अब्जावधी डॉलर

Global Market Crash : नशीब… भारतातील शेअर बाजार आज बंद! शेजारील देशांच्या बाजारात हाहाःकार, काय नेमकी परिस्थिती?
4

Global Market Crash : नशीब… भारतातील शेअर बाजार आज बंद! शेजारील देशांच्या बाजारात हाहाःकार, काय नेमकी परिस्थिती?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.