एक राष्ट्र, अब्जावधी उत्सव : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर भव्य वार्षिक खरेदी महोत्सवाचे आयोजन!
अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडद्वारे व्यवस्थापित छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने (सीएसएमआयए) देशांतर्गत व परदेशी प्रवाशांच्या आनंदात भर घालण्यासाठी वन नेशन, बिलिअन सेलिब्रेशन्स (एक राष्ट्र, अब्जावधी उत्सव) हा भव्य वार्षिक खरेदी महोत्सव आयोजित केला आहे.
जागतिक स्तरावर विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या अदानी एंटरप्रायजेस लिमिटेडची अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड ही उपकंपनी आहे. १८ ऑक्टोबर २०२४ ते १० जानेवारी २०२५ या काळात सुरू राहणाऱ्या या चैतन्यपूर्ण उत्सवात विविध प्रादेशिक उत्सव साजरे केले जात आहेत. आकर्षक विषयांवरील सजावटी केल्या जात आहेत. प्रवाशांना आकर्षित करून घेणारे उपक्रम राबवले जात आहेत आणि खात्रीशीर बक्षिसांसह रोमांचक स्पर्धा घेतल्या जात आहेत.
या काळात सीएसएमआयएच्या विश्वात पाऊल टाकणाऱ्या प्रवाशाला भारतातील चैतन्यपूर्ण उत्सवांचा खास अनुभव घ्यायला मिळेल. दिवाळीच्या लखलखाटापासून ते ख्रिसमसच्या प्रसन्नतेपर्यंत आणि नववर्षाच्या आनंदापर्यंत सर्व सणांची जादू दाखवण्यासाठी विमानतळ सज्ज आहे. या दिवाळीला करण्यात आलेली नेत्रदीपक सजावट नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे. अंधारावर प्रकाशाने मिळवलेला विजय या सजावटीद्वारे साजरा केला जात आहे.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)
ग्राहक विमानतळावरील सहभागी रिटेल व एफअँडबी दुकानांमधून खरेदी करून या उत्सवात भाग घेऊ शकतात. यंदा सीएसएमआयएने धारावीतील प्रसिद्ध कुंभारवाड्यातील कारागिरांशी सहयोग करून, सुमारे १ लाख हाताने तयार केलेल्या पणत्या खरेदी केल्या आहेत. या पणत्या प्रवाशांना भेट म्हणून दिल्या जातील. कुंभारकाम करणाऱ्या १०० हून अधिक कारागिरांनी या पणत्या तयार केल्या आहेत. यात विशीतील तरुण कारागिरांपासून साठीतील अनुभवी मुरब्बी कारागिरांचा समावेश आहे. या सर्वांच्या हातून घडलेल्या पणत्यांमध्ये कुंभारवाड्याच्या सांस्कृतिक समृद्धीचे तसेच पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या कारागिरीच्या वारशाचे सुंदर प्रतिबिंब उमटले आहे.
या स्वदेशी, हाताने घडवलेल्या पणत्यांचा पुरस्कार करून हा उपक्रमही भारताच्या कारागिरीच्या वारशावर प्रकाश टाकत आहे तसेच स्थानिक कारागिरांनाही मदत करत आहे. कुंभारवाड्यातील कारागिरांच्या माध्यमातून सणासुदीचे दिवस उजळून टाकणे मेक इन इंडिया उपक्रमालाही पूरक आहे. मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ व टर्मिनल २ अशा दोन्ही ठिकाणी प्रवासीही कुंभारवाड्यातील प्रतिभावान कारागिरांच्या मार्गदर्शनाखाली दिवे तयार करून आपल्यातील सर्जनशीलता आजमावू शकतात. शिवाय, प्रवासी एफअँडबी दुकानात ६९९ रुपयांहून अधिक मूल्याची खरेदी करून किंवा रिटेल दुकानांमध्ये २,१९९ रुपयांहून अधिक मूल्याची खरेदी करून ४ दिव्यांचा संच मोफत घरी घेऊन जाऊ शकतात आणि प्रवासातही सण साजरा करू शकतात.
वन नेशन बिलिअन सेलिब्रेशन्स उत्सवाच्या माध्यमातून सीएसएमआयए प्रवाशांचा अनुभव आणखी उंचावण्याचे काम करत असतानाच, समृद्ध सांस्कृतिक अनुभव, खिळवून ठेवणारे उपक्रम व बक्षीस मिळवून देण्याच्या संधी यांनी भरगच्च अशा उत्सवी सफरीवर स्वार होण्यासाठी प्रवशांना आमंत्रण देत आहे. या उत्सवातून भारतीय सणांचे चैतन्य तर साजरे केले जात आहेच, शिवाय स्थानिक कारागिरांना सहाय्य करण्याप्रती तसेच शाश्वत परंपरांना आधार देण्याप्रती विमानतळाचे समर्पणही दिसून येते. अनन्यसाधारण उत्पादने, रोमांचक स्पर्धा आणि हस्तकलेचा आनंद यांच्या माध्यमातून प्रत्येक प्रवाशाचा प्रवास आनंद, सर्जनशीलता व स्मरणीय क्षणांनी भरगच्च होईल, याची काळजी सीएसएमआयए घेत आहे.