Mumbai Plane Accident Breaking: मुंबई एअरपोर्टवर मोठा अपघात! मालवाहू ट्रकची विमानाला धडक अन्...
मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक मोठा अपघात घडला आहे. मुंबई एअरपोर्टवर एका मालवाहू ट्रकनी विमानाला धडक दिली आहे. अकासा एअरलाईन्सच्या विमानाला एका मालवाहू ट्रकने धडक दिल्याची घटना घडली आहे. हे विमान मुंबईवरून दिल्लीला जाणार होते. या अपघातामध्ये विमानाचे आणि ट्रकचे देखील नुकसान झाले आहे.
अकासा एअरलाईन्सचे एक विमान मुंबईवरून दिल्लीला उड्डाण करणार होते. मात्र कार्गो ट्रकने धडक दिल्याने या विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले. विमान उड्डाण करण्याआधी हा अपघात घडला. या अपघातामध्ये मालवाहू ट्रकचे आणि विमानाचे नुकसान झाले आहे. दरम्यान उड्डाण रद्द झाल्याने प्रवाशांना दुसरा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार मुंबई एअरपोर्टवर ही घटना पहाटेच्या सुमारास घडली आहे. हे विमान बंगळुरूवरून मुंबईला आले होते. तिथून ते दिल्लीला उड्डाण करणार होते. मुंबई लँड झाल्यावर या विमानातून माल उतरवला जात होता. दरम्यान माल असणाऱ्या एका ट्रकचा भाग विमानाच्या पंख्याला धडकला. त्यामुळे विमानाचे नुकसान झाले व उड्डाण रद्द करण्यात आले आहे.
फ्युएल स्विच बंद असल्याने प्लेन थेट….; रिपोर्टमधून समोर आला धक्कादायक खुलासा
गेल्या महिन्यात अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला होता. अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेताच काही मिनिटांनी हे विमान एका मेडिकल कॉलेजवर कोसळले. या दुर्घटनेत २४२ पैकी २४१ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर एक प्रवाशी सुदैवाने बचावला आहे. या घटनेचा तपास सुरु आहे. सर्व शक्यता तपासून पाहिल्या जात आहेत. लवकरच प्राथमिक तपासणीचा अहवाल समोर येणार आहे. मात्र अमेरिकेतील एका मीडिया अहवालात मोठी शंका उपस्थित करण्यात आली आहे. याबाबत जाणून घेऊयात.
Ahmedabad Plane Crash: फ्युएल स्विच बंद असल्याने प्लेन थेट….; रिपोर्टमधून समोर आला धक्कादायक खुलासा
अमेरिकेतील मीडिया संस्था असणाऱ्या ‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या अहवालानुसार, अपघातग्रस्त झालेल्या विमानाच्या इंजिनमध्ये फ्युएल सप्लाय नियंत्रित करणारे स्विच बंद करण्यात आले होते. यामुळे विमानाने उड्डाण करताच त्यातील थ्रस्ट बंद झाला विमान खाली येऊ लागले. थ्रस्ट हे विमानातील महत्वाची गोष्ट समजली जाते, जी विमानाला उड्डाण करताना मदत करते.
आतापर्यंत झालेल्या तपासात याबाबत माहिती समोर आलेली नाही. किंवा तांत्रिक बिघाड असल्याचे समोर आले नाही.ज्यामध्ये स्विच बंद करण्याबाबत सांगितले जात आहे. पायलट या स्विचचा वापर विमान सुरु करणे, बंद करणे किंवा अत्यावश्यक वेळेत करत असतात. भारतातील यंत्रणांचा तपास अहवाल समोर येण्याआधीच अमेरिकेन मीडियाचा हा अहवाल समोर आल्याने एकच चर्चा सुरु झाली आहे.