Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Onion Price Rise : चाललंय काय? सरकारला दरावर नियंत्रण मिळेना, कांदा पुन्हा रडवणार… बाजारात 70 रुपये किलोने विक्री

Onion Price Rise : केंद्र सरकारने महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी बफर स्टॉकमधून कांदा बाजारात आणूनही किरकोळ बाजारात कांद्याचे दर प्रतिकिलो ७० रुपयांवर पोहोचले आहेत. पुरवठ्यातील तुटवडा आणि आवक घटल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 18, 2026 | 05:10 PM
चाललंय काय? कांदा पुन्हा रडवणार... ( सौजन्य - सोशल मीडिया )

चाललंय काय? कांदा पुन्हा रडवणार... ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • चाललंय काय? कांदा पुन्हा रडवणार…
  • बाजारात 70 रुपये किलोने विक्री
  • सरकारला दरावर नियंत्रण मिळेना
Onion Price Rise : गेल्या काही दिवसांपासून महागाईचा भडका बराच उडाला आहे. या परिस्थितीमुळे लोकांचा हालहाल झाले आहेत. स्वयंपाक घरातील वस्तूंचे दर तर कडाडले आहेत. साखरेच्या दरवाढीनंतर कांद्याने सामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने बफर प्रणालीसुद्धा सुरू केली. पण याचा काही उपयोग झाला नाही; आजही लोकांना या वाढलेल्या किमतींपासून कोणताही दिलासा मिळालेला नाही. कांद्याचे दर गगनाला भिडत आहे. काय आहे मार्केटची परिस्थिती ? ( Onion Price Rise )

Chicago Pneumatic चं नवं तंत्रज्ञान, CPS 950-300 पोर्टेबल एअर कॉम्प्रेसर लाँच; आता कठीण ड्रिलिंग कामंही होणार अधिक सुलभ

या महागाईतून दिलासा देण्यासाठी सरकार आपल्या बफर साठ्यातील कांदा जनतेला ३५ रुपये प्रति किलो दराने विकत आहे. असे असूनही, देशाच्या अनेक भागांमध्ये लोकांना बाजारात ६०-७० रुपये प्रति किलो दराने कांदा खरेदी करण्यास भाग पडत आहे.

सरकार कांदा ३५ रुपये प्रति किलो दराने विकतोय

सरकारने बफर स्टॉकमध्ये कांदा साठवून ठेवला आहे, परंतु उत्पादन क्षेत्रांमधून देशभरातील विविध शहरे आणि बाजारपेठांमध्ये त्याची वाहतूक कशी करायची, हे सर्वात मोठे आव्हान आहे. सरकारने २४ ऑगस्टपासून बफर स्टॉकमधून कांद्याची विक्री सुरू केली आहे. यासाठी एनसीसीएफ, नाफेड, केंद्रीय गोदामे आणि मोबाईल व्हॅनचा वापर केला जात आहे. ‘ऑनियन एक्सप्रेस’च्या माध्यमातून कांदा उत्पादक राज्यांमधून प्रमुख ग्राहक शहरांमध्ये पोहोचवला जात आहे.

कांदा महाग का होतोय?

कांद्याच्या भाववाढीचे एक प्रमुख कारण म्हणजे रबी आणि खरीप हंगामातील काढणीमधील कालावधी. साधारणपणे, या काळात जुन्या रबी कांद्याचा साठा हळूहळू कमी होतो आणि नवीन खरीप पीक पूर्णपणे बाजारात आलेले नसते. यामुळे काही काळासाठी कांद्याचा पुरवठा कमी होतो, ज्यामुळे भाव वाढतात.

देशात कांद्याची टंचाई आहे का?

सरकारच्या मते देशात कांद्याची एकूण टंचाई नाही. २०२५-२६ मध्ये कांद्याचे उत्पादन ३०.७३७ दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे, जे गेल्या वर्षीच्या ३०.७६७ दशलक्ष टनांच्या जवळपास समान आहे. सरकारने २०२६-२७ मध्ये बफर स्टॉकसाठी २० लाख टन रब्बी कांदा खरेदी करण्याचे लक्ष्य ठेवले होते. यापैकी अंदाजे १.२१ दशलक्ष टन कांदा आधीच खरेदी करण्यात आला आहे. बफर स्टॉकसाठी कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा यासाठी खरेदी दरही १८.७५ रुपयांवरून २१.२५ रुपये प्रति किलोपर्यंत वाढवण्यात आला आहे.

ना घर, ना स्वतःची गाडी; देशाचे पंतप्रधान Modi यांच्या एकूण संपत्तीचा आकडा किती? जाणून घ्या नेमकी कुठे आहे गुंतवणूक

Web Title: Onion price hikes 70 rupees per kg no relief government buffer stock marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 05:10 PM

Topics:  

  • Rate Hike

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.