पालमोनासने 'शार्क टँक इंडिया'मध्ये केली १.२६ कोटींची गुंतवणूक
मुंबई : पालमोनासच्या (पालमोनास) संस्थापक पल्लवी मोहाडिकर दागिन्यांच्या क्षेत्रात नवा अध्याय लिहीत आहेत. त्या लक्झरीला केवळ उच्चभ्रूंसाठी मर्यादित न ठेवता, तो प्रत्येकासाठी सहजसाध्य आणि आकर्षक बनवत आहेत. महाविद्यालयात असताना ऑनलाईन साड्या विकण्यापासून ते करागिरी या भारतातील आघाडीच्या हस्तनिर्मित साडी ब्रँडची स्थापना करण्यापर्यंत त्यांचा प्रवास जिद्दीचा आणि नवकल्पनांचा आहे. आता पालमोनासच्या माध्यमातून त्या भारतातील पहिल्या ‘डेमी-फाईन’ ज्वेलरी ब्रँडच्या निर्मितीकडे वळल्या आहेत. ‘शार्क टँक इंडिया’मध्ये नामिता थापर आणि रितेश अग्रवाल यांच्याकडून ₹१.२६ कोटींची गुंतवणूक मिळवत त्यांनी उद्योगविश्वात मोठी झेप घेतली आहे.
विणकर कुटुंबात जन्मलेल्या पल्लवींना लहानपणापासूनच उत्तम कारागिरी आणि गुणवत्तेची जाण होती. त्यांचे पहिले उद्यम, करागिरी, एक बहु-कोटींचा ब्रँड झाला आणि नंतर मेंसा कंपनीने त्याची मालकी घेतली. त्यानंतर त्यांनी ज्वेलरी उद्योगात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला आणि फॅशन ज्वेलरी व फायन ज्वेलरी यामधील अंतर भरून काढण्याचे ध्येय ठेवलं. पालमोनासच्या संस्थापक पल्लवी मोहाडिकर म्हणतात, “लक्झरी ही फक्त काही मोजक्या लोकांसाठी नसावी, तर ती प्रत्येकासाठी असावी. करागिरीच्या माध्यमातून मी हस्तनिर्मित साड्या सर्वांसाठी सहज उपलब्ध केल्या, आणि पालमोनासद्वारे मी हेच उच्च-गुणवत्तेच्या दागिन्यांसाठी करत आहे. ‘शार्क टँक’ केवळ निधी उभारण्याचा प्लॅटफॉर्म नव्हता, तर भारताला ‘डेमी-फाईन’ ज्वेलरीचे महत्त्व समजावून सांगण्याची संधी होती. आणि ही तर फक्त सुरुवात आहे.”
पालमोनासची संकल्पना स्पष्ट होती, लक्झरी ही फक्त खास प्रसंगांसाठी नसून, ती रोजच्या जीवनाचा भाग असावी. पालमोनासच्या पहिल्या काही आठवड्यांतच बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने ब्रँडचा ग्राहक म्हणून शोध घेतला आणि त्याच्या दर्जा, डिझाइन आणि परवडणाऱ्या किंमतींशी त्वरित जोडली गेली. पल्लवींनी तिला सह-संस्थापक होण्याची विनंती केली, आणि श्रद्धानेही कोणताही विचार न करता ती संधी स्वीकारली.
यावेळी श्रद्धा कपूर म्हणतात, “मला नेहमीच उच्च-गुणवत्तेचे पण परवडणारे दागिने हवे होते—जे तडजोड वाटू नयेत. जेव्हा मी पालमोनास शोधले, तेव्हा मला जाणवलं की हेच ते आहे. त्यामुळे या प्रवासाचा भाग होण्याची संधी मिळाल्यावर, मी क्षणभरही विचार केला नाही.” केवळ दोन वर्षांत पालमोनास एक भरभराटीला आलेला ब्रँड बनला आहे. त्याच्या यशाने ‘शार्क टँक इंडिया’वरील गुंतवणूकदार नामिता थापर आणि रितेश अग्रवाल यांचे लक्ष वेधले आणि त्यांनी ₹१.२६ कोटींची गुंतवणूक केली.
पल्लवी आणि श्रद्धा यांच्यासाठी हा केवळ व्यवसायातील विजय नाही —तर ही एक सिद्धी आहे की स्वप्ने पूर्ण करता येतात. ‘शार्क टँक इंडिया’च्या पाठबळाने पालमोनास आता भारतातील प्रत्येक घरात ‘डेमी-फाईन’ ज्वेलरी पोहोचवण्यास सज्ज आहे, ज्यामुळे लक्झरी केवळ प्रतिष्ठेचा विषय न राहता सर्वांसाठी सहजसाध्य ठरेल. उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी पल्लवींचा साधा सल्ला आहे – “पूर्ण तयारी झाल्यावर नव्हे, तर आजच सुरुवात करा. परिपूर्ण योजनांची वाट पाहू नका. खरी शिकवण प्रत्यक्ष कृतीतून मिळते.”