Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘कार आणि दारूच्या शुल्कात आता कपात’, ब्रिटेनसह झालेल्या FTA वर पियूष गोयल यांचा खुलासा

केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी ब्रिटनसह करण्यात आलेल्या FTA चा भारतीय व्यक्तींना अधिक लाभ होणार असल्याचे सांगितले. कार्स आणि दारूच्या शुल्कावर कपात मिळणार आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 27, 2025 | 12:34 AM
FTA च्या लाभाबाबत पियुष गोयल यांचा खुलासा (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

FTA च्या लाभाबाबत पियुष गोयल यांचा खुलासा (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

सध्या FTA कराराची जोरदार चर्चा रंगली आहे आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी शनिवारी सांगितले की, ब्रिटनसोबतच्या व्यापार करारात भारतीय हितसंबंधांशी कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही. यामुळे भारताला प्रचंड फायदा होईल. ब्रिटिश बाजारपेठेतील संभाव्य संधींचा फायदा घेण्यासाठी मैदान तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.

पाच वर्षांच्या एफटीए अंमलबजावणीनंतर, दोन्ही देश कराराचा आढावा घेतील. गोयल म्हणाले की, करारात दोन्ही देशांनी त्यांच्या संवेदनशील उत्पादनांना व्यापारापासून दूर ठेवले आहे. भारत ब्रिटनमधून येणाऱ्या कार आणि दारू या दोन्हींवरील शुल्क टप्प्याटप्प्याने कमी करेल आणि त्यांची आयात देखील मर्यादित केली जाईल. यामुळे आमच्या उत्पादनावर परिणाम होणार नाही (फोटो सौजन्य – Instagram)

भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढतेय 

यावेळी गोयल म्हणाले की, आता प्रत्येक विकसित देश भारतातील आपल्या व्यवसाय भविष्याकडे पाहत आहे. भारतीय अर्थव्यवस्था सर्वात वेगाने वाढत आहे. भारतात मध्यमवर्ग खूप वेगाने उदयास येत आहे. भारत एक विश्वासार्ह व्यावसायिक भागीदार म्हणून उदयास येत आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारत हा एक लोकशाही देश आहे जिथे कायद्याचे राज्य आहे.

कराराच्या वेळी ब्रिटिश पंतप्रधानांनी म्हटले होते की भारतासोबतचा व्यापार करार आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. वाणिज्यमंत्र्यांनी सांगितले की अमेरिका, युरोपियन युनियन (EU), ओमान, न्यूझीलंड सारख्या देशांसोबत व्यापार करारावर चर्चा खूप प्रगती झाली आहे. पेरू, चिली सारख्या देशांसोबतही व्यापार चर्चा सुरू आहेत.

मोतीलाल ओसवालने HDFC बँक शेअर खरेदी करण्याची विनंती, पुढच्या आठवड्यात धूम; धमाका करण्यासाठी Stock रेडी!

UPA सरकारने चर्चा अर्ध्यावरच सोडली

गोयल म्हणाले की, ब्रिटनसोबत व्यापार करारावरील चर्चा UPA सरकारमध्येच सुरू झाली होती, परंतु त्यांच्या सरकारने ती अर्ध्यावरच सोडली. २०२२ मध्ये मोदी सरकारमध्ये यावर चर्चा सुरू झाली आणि आम्ही ती एका निष्कर्षापर्यंत पोहोचवली, ज्यामुळे भारताच्या निर्यातीला मोठा फायदा होईल.

ते म्हणाले की, यूपीए सरकारच्या काळात आसियान आणि इतर देशांसोबत व्यापार करार झाले होते, पण भारताला त्यांचा कोणताही फायदा मिळाला नाही. त्या देशांनी भारतीय वस्तूंसाठी त्यांचे दरवाजे फारच कमी उघडले, तर आम्ही त्यांच्यासाठी आमचे दरवाजे पूर्णपणे उघडले. याचा भारताला नक्कीच फायदा होणार असून व्यापार अधिक वाढणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले आहे. तर FTA चा अर्थव्यवस्थेवरही चांगला परिणाम होऊ शकतो. सध्या सगळीकडे या उचलेलेल्या महत्त्वाच्या पावलाबाबत चर्चा सुरू आहे आणि भारतीय अर्थव्यवस्थेत याचा मोठा हातभार लागणार असल्याचेही म्हटले जात आहे. 

ब्रिटिश कंपन्यांना भारतात उत्पादन करण्याची मोठी संधी, ४०,००० सरकारी निविदांमध्ये होऊ शकतात सहभागी

Web Title: Piyush goyal highlight india uk fta significant benefits for indians

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2025 | 12:34 AM

Topics:  

  • britain
  • Business
  • Piyush Goyal

संबंधित बातम्या

बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराचे पडसाद परदेशात; लंडनमध्ये दिपू दासच्या हत्येविरोधात तीव्र निदर्शने
1

बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराचे पडसाद परदेशात; लंडनमध्ये दिपू दासच्या हत्येविरोधात तीव्र निदर्शने

लंडनच्या रस्त्यांवरही पान-गुटखा थुंकण्याचा  घाणरेडा प्रकार; परदेशी महिला पत्रकाराच्या व्हिडिओने उडाली खळबळ
2

लंडनच्या रस्त्यांवरही पान-गुटखा थुंकण्याचा घाणरेडा प्रकार; परदेशी महिला पत्रकाराच्या व्हिडिओने उडाली खळबळ

नववर्ष २०२६ साठी गुंतवणूकदारांना सुवर्णसंधी! मिरे अॅसेटच्या तज्ज्ञांनी मांडला विकासाचा रोडमॅप
3

नववर्ष २०२६ साठी गुंतवणूकदारांना सुवर्णसंधी! मिरे अॅसेटच्या तज्ज्ञांनी मांडला विकासाचा रोडमॅप

Maulana Shamsul Huda: ईडीने ब्रिटनमधील धर्मगुरूविरुद्ध दाखल केला मनी लाँड्रिंगचा गुन्हा; कोट्यवधींच्या मालमत्तेची चौकशी सुरू
4

Maulana Shamsul Huda: ईडीने ब्रिटनमधील धर्मगुरूविरुद्ध दाखल केला मनी लाँड्रिंगचा गुन्हा; कोट्यवधींच्या मालमत्तेची चौकशी सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.