Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cancer Treatment: मोशन-सेंसिटिव्ह कर्करोगांवरील उपचारांना नवे तंत्रज्ञान! एसीटीआरईसी आणि कोटक महिंद्राचा महत्त्वपूर्ण CSR उपक्रम

कॅन्‍सर केअर अधिक प्रमाणात उपलब्‍ध करून देण्‍याच्‍या दिशेने महत्वपूर्ण पाऊल उचलत कोटक महिंद्रा प्राइम लिमिटेडने टाटा मेमोरिअल सेंटरचा भाग अ‍ॅडवान्‍स्‍ड सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्‍युकेशन इन कॅन्‍सरसह सहयोग केले.

  • By Priti Hingane
Updated On: Dec 10, 2025 | 05:00 PM
एसीटीआरईसी आणि कोटक महिंद्राचा महत्त्वपूर्ण CSR उपक्रम

एसीटीआरईसी आणि कोटक महिंद्राचा महत्त्वपूर्ण CSR उपक्रम

Follow Us
Close
Follow Us:
  • एसीटीआरईसीमध्ये कर्करोग उपचारांची नवी क्रांती
  • कोटक महिंद्राचे महत्त्वपूर्ण सहयोग
  • नवी मुंबईत होणार कर्करोग उपचार
 

Advanced Cancer Treatment: कॅन्‍सर केअर अधिक प्रमाणात उपलब्‍ध करून देण्‍याच्‍या दिशेने महत्वपूर्ण पाऊल उचलत कोटक महिंद्रा प्राइम लिमिटेड (केएमपीएल)ने टाटा मेमोरिअल सेंटरचा भाग अ‍ॅडवान्‍स्‍ड सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्‍युकेशन इन कॅन्‍सर (एसीटीईआरसी) सोबत सहयोग केला आहे. या सहयोगांतर्गत नवी मुंबईमधील खारघर येथील त्‍यांच्‍या प्रोटोन थेरपी सेंटरमध्‍ये एसडीएक्‍स®️ व्‍हॉल्‍यूण्‍टरी ब्रेद होल्‍ड सिस्‍टम इन्‍स्‍टॉल करण्‍यात येईल. श्री. सूजर राजाप्‍पन तसेच श्री. मुरलीधरन एस. यांच्‍या हस्‍ते उद्घाटन करण्‍यात आले.

हे प्रगत तंत्रज्ञान डॉक्‍टरांना अचूक रेडिएशन थेरपी देण्‍यास, तसेच रूग्‍णांना उपचारदरम्‍यान त्‍यांचा श्‍वास रोखून धरण्‍याकरिता मार्गदर्शन करण्‍यास मदत करेल, जे विशेषत: फुफ्फुसाचा कर्करोग, यकृताचा कर्करोग, स्‍वादुपिंडाचा कर्करोग आणि स्‍तनाचा कर्करोग यावरील उपचारासाठी महत्त्वाचे आहे, जेथे श्‍वासोच्‍छवासामुळे ट्यूमर्स स्‍थानांतरित होऊ शकतात. एसडीएक्‍स®️ सिस्‍टम फक्‍त ट्यूमरवर रेडिएशन जाण्‍याची खात्री देते, ज्‍यामुळे आरोग्‍यदायी अवयवांचे संरक्षण होते आणि उपचार निष्‍पत्ती वाढते.

हेही वाचा : India-US Trade Deal: अमेरिकन शेती उत्पादनांसाठी भारताची आतापर्यंतची ‘बेस्ट ऑफर’..; जाणून घ्या सविस्तर

ही सिस्‍टम का महत्त्वाची आहे?

  • प्रोटोन थेरपी कर्करोगावरील सर्वात प्रगत उपचार
  • एसडीएक्‍स®️ सिस्‍टम तंत्रज्ञान एसीटीआरईसीच्‍या प्रोटोन थेरपी सेटअपशी सुसंगत
  • मोशन-सेन्सिटिव्‍ह कर्करोगांवर सुरक्षितपणे व प्रभावीपणे उपचार करण्‍यासाठी आवश्‍यक
  • एसीटीआरईसी आता प्रोटोन-आधारित एसबीआरटी (स्‍टेरिओटॅक्टिक बॉडी रॅडिएशन थेरपी)
  • अत्‍यंत अचूक, उच्‍च डोस उपचार पद्धत जगण्‍याची शक्‍यता वाढवते आणि दुष्‍परिणाम कमी करते
एसीटीआरईसी दरवर्षाला ३५,००० हून अधिक रूग्‍णांवर उपचार करते, ज्‍यापैकी बहुतांश आर्थिकदृष्‍ट्या कमकुवत पार्श्वभूमींमधील असतात.
डॉ. राहुल कृष्‍णर्ती म्‍हणाले की, ”एसडीएक्‍स सिस्‍टम मोशन-व्‍यवस्‍थापित रॅडिएशन उपचारापीसाठी गेम-चेंजर आहे. यकृताचा कर्करोग व स्‍वादुपिंडाचा कर्करोग यावर उपचार करताना श्‍वासोच्‍छवासामुळे ट्यूमरचे स्‍थान बदलत राहते, ज्‍यामुळे अचूक उपचार करणे आव्‍हनात्‍मक होऊन जाते. या अपग्रेडसह आम्‍ही आता रूग्‍णांना प्रोटोन-आधारित एसबीआरटी देण्‍यास सुसज्‍ज आहोत, या उपचारासह जगण्‍याची शक्‍यता वाढण्‍यासोबत कर्करोगाचा त्रास कमी होतो.”

हेही वाचा : Technology Investment: पंतप्रधान मोदींची जागतिक तंत्रज्ञान सीईओंसोबत बैठक; कॉग्निझंट, इंटेल व मायक्रोसॉफ्ट वाढवणार भारतात गुंतवणूक

एसीटीआरईसीचे संचालक डॉ. पंकज चतुर्वेदी म्हणाले, ”एसडीएक्‍स®️ व्‍हॉल्‍युण्‍टरी ब्रेद होल्‍ड सिस्‍टम एसीटीआरईसीच्‍या प्रोटोन थेरपी सेटअपशी सुसंगत असलेले एकमेव तंत्रज्ञान आहे, ज्‍यामुळे मोशन-सेन्सिटिव्‍ह कर्करोगांवर सुरक्षितपणे व प्रभावीपणे उपचार करण्‍यासाठी महत्त्वाचे आहे. टीएमसीच्‍या वतीने मी हे सामाजिक कार्य ओळखण्‍यासह त्‍याप्रती योगदान देण्‍यासाठी कोटक महिंद्रा प्राइम लिमिटेडचे आभार व्‍यक्‍त करतो. एसडीएक्‍स®️ व्‍हॉल्‍युण्‍टरी ब्रेद होल्‍ड सिस्‍टम स्‍मार्ट ब्रेद-होल्डिंग कोच सारखी आहे, जी रूग्‍ण व डॉक्‍टरांना एकत्रित काम करत सुरक्षितपणे अत्‍यंत अचूक रेडिएशन थेरपी देण्‍यास मदत करते. हे लहान परिवर्तन कर्करोगावरील उपचारामध्‍ये आमूलाग्र बदल घडवून आणेल.”

हा उपक्रम केएमपीएलच्‍या आरोग्‍यसेवेवरील फोकस क्षेत्रांतर्गत कॉर्पोरेट सोशल रिस्‍पॉन्सिबिलटी (सीएसआर) कटिबद्धतेचा भाग आहे. केएमपीएल दर्जेदार आरोग्‍यसेवा, तसेच पायाभूत सुविधेमधील अपग्रेड्स आणि प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञान उपलब्‍ध करून देणाऱ्या प्रकल्‍पांना पाठिंबा देते.

”केएमपीएलमध्‍ये आमचा विश्वास आहे की, सर्वाधिक गरज असलेल्‍या व्‍यक्‍तींना जागतिक दर्जाच्‍या आरोग्‍यसेवा उपलब्‍ध असल्‍या पाहिजेत. टाटा मेमोरिअल सेंटरसोबत या सहयोगाच्‍या माध्‍यमातून आम्‍हाला त्‍यांच्‍या एसीटीआरईसीला प्रत्‍येक रूग्‍णाला जागतिक दर्जावर प्रशंसित त्‍यांच्‍या कॅन्‍सर केअर सेवा देण्‍यामध्‍ये साह्य करण्‍याचा अभिमान वाटतो,” असे कोटक महिंद्रा प्राइम लिमिटेडचे व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी शाहरूख तोडीवाला म्‍हणाले.

Web Title: Proton therapy upgrade in actrec kotak mahindra prime gets sdx breath hold system support

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2025 | 05:00 PM

Topics:  

  • cancer
  • Kotak Mahindra Bank

संबंधित बातम्या

आतड्यांचा कॅन्सर झाल्यानंतर त्वचेवर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, योग्य वेळी ओळखा चेहऱ्यावर दिसून येणारे बदल
1

आतड्यांचा कॅन्सर झाल्यानंतर त्वचेवर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, योग्य वेळी ओळखा चेहऱ्यावर दिसून येणारे बदल

कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ, जगात भारत तिसऱ्या क्रमांकावर… कोणत्या राज्यात सर्वाधिक रुग्ण? वाचा एका क्लिकवर
2

कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ, जगात भारत तिसऱ्या क्रमांकावर… कोणत्या राज्यात सर्वाधिक रुग्ण? वाचा एका क्लिकवर

पिवळीधम्मक दिसतेय लघवीची धार? बाइल डक्टमध्ये अडकलेला असू शकतो Pancreatic Cancer, 6 धक्कादायक लक्षणं
3

पिवळीधम्मक दिसतेय लघवीची धार? बाइल डक्टमध्ये अडकलेला असू शकतो Pancreatic Cancer, 6 धक्कादायक लक्षणं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.