हिवाळ्यात मिळणाऱ्या 'या' भाज्या 'कर्करोगाच्या शत्रू', नियमित सेवन केल्यास शरीरातील घाण पडून जाईल बाहेर
हिवाळ्यात बाजारात दिसणारे काळे गाजर सगळ्यांचं खूप सामान्य वाटतं. पण यामध्ये असलेली पोषक तत्व शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहेत. काळे गाजर खाल्ल्यामुळे शरीर आतून स्वच्छ होते.
भारतीय जेवणात चव वाढवणारी लाल तिखट मिरची केवळ तिखटपणाच वाढवत नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. रोजच्या आहारात योग्य प्रमाणात मिरचीचे सेवन केल्यास शरीरात घाण बाहेर पडून जाते.
रताळ खाल्ल्यामुळे शरीराला भरपूर फायदे होतात. शरीरातील अशुद्धता स्वच्छ करण्यासाठी आणि ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात एक तरी रताळ खावे.
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना भोपळा खायला आवडत नाही. भोपळ्याच्या भाजीचे नाव काढल्यानंतर मुलं नाक मुरडतात. पण या भाजीमध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते.
हिवाळ्यात बथुआ हा हिरव्या पालेभाज्यांचा राजा आहे. हिरव्या पालेभाज्या शरीराला भरपूर पोषण देतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत करतात.