
१० मिनिटांचा व्यायाम Stomach cancer पासून वाचवेल जीव! कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी जेवणाच्या ताटात असायला हवेत 'हे' पदार्थ
पोटाच्या कॅन्सरची लक्षणे?
पोटाचा कॅन्सर होऊ नये म्हणून व्यायाम का करावा?
कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी काय करावे?
कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. पण हाच जीवघेणा आजार झाल्यानंतर शरीरात अनेक बदल जाणवू लागतात. कॅन्सरच्या अनियंत्रित पेशी वाढू लागल्यानंतर शरीरात असंख्य बदल दिसू लागतात, पण सामान्य समस्या समजून दुर्लक्ष केले जाते. असे न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. शरीराच्या कोणत्याही लहान मोठ्या अवयवाला कॅन्सरची लागण होऊ शकते. जगभरात कॅन्सरच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात पोटाच्या आणि आतड्यांच्या कॅन्सरचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आहेत.(फोटो सौजन्य – istock)
शारीरिक हालचाली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणाऱ्या बदलांमुळे पोटाच्या कॅन्सरची लागण होण्याची शक्यता असते. पोटाच्या कॅन्सरची लागण झाल्यानंतर शरीरात कॅन्सरच्या अनियंत्रित पेशी वाढणे, मलविसर्जनाच्या सवयी, कोणत्याही कारंणाशिवाय वजन कमी होणे, पोटात वारंवार वेदना होणे इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पोटाच्या कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी नियमित कोणता व्यायाम करावा, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.
सकाळी उठल्यानंतर नियमित व्यायाम आणि शारीरिक हालचाली केल्यास कॅन्सरच्या अनियंत्रणत पेशी वाढत नाहीत. नियमित १५ ते २० मिनिटं हाय-इंटेंसिटी सायकलिंग किंवा व्यायाम केल्यास रक्तातील प्रथिनांची पातळी वाढते, ज्यामुळे कॅन्सरच्या पेशी नष्ट होण्यास मदत होते. कॅन्सर पेशींचा ऊर्जेचा पुरवठा कमी करण्यासाठी आणि पेशी नष्ट करण्यासाठी नियमित २० मिनिटं व्यायाम करावा. नियमित व्यायाम केल्यामुळे पॉलिप्स’ तयार होण्याचा धोका कमी होतो आणि तुम्ही कायमच निरोगी राहता. तसेच सकाळी उठल्यानंतर नियमित ३० सेकंद बर्पीज, ३० सेकंद स्क्वॅट्स, ३० सेकंद जंपिंग जॅक्स आणि ३० सेकंद माऊंटन क्लाइंबर्स केल्यास शरीराला कोणत्याही आजाराची कधीच लागण होणार नाही.
सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर नियमित पपईचे सेवन करावे. वाटीभर पपई सकाळच्या नाश्त्यात नियमित खाल्ल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातील आणि आरोग्य सुधारेल. कॅन्सर होण्यास कमी फायबर असलेले पदार्थ आणि रेड मीट कारणीभूत ठरते. रेड मीटमध्ये असलेले हानिकारक घटक शरीरातील पेशींचे गंभीर नुकसान करतात. आहारात पपईसोबतच बाजरीची भाकरी, डाळ-भात, मोड आलेली कडधान्ये, पपई आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा. यामुळे पचनसंस्था कायमच सक्रिय राहते.
सकाळी उठल्यानंतर किंवा वेळ मिळेल तेव्हा व्यायाम करावा. कॅन्सर झाल्यानंतर पुन्हा कॅन्सर होऊ नये म्हणून शरीराची खूप जास्त काळजी घ्यावी. व्यायाम केल्यामुळे कॅन्सरचा धोका २८ टक्क्यांनी कमी होतो. नियमित व्यायाम केल्यामुळे केमोथेरपीसारख्या उपचारांचे दुष्परिणाम कमी होतात आणि शरीराची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
Ans: सुरुवातीला लक्षणे दिसत नाहीत, परंतु नंतर अपचन, पोटात अस्वस्थता, भूक न लागणे, पोट फुगणे, आणि जेवणानंतर मळमळ ही लक्षणे दिसू शकतात.
Ans: H. pylori संसर्ग, धूम्रपान, जंक फूडचे अतिसेवन, खारवलेले किंवा प्रक्रिया केलेले अन्न खाणे.
Ans: होय, जर तो सुरुवातीच्या टप्प्यात आढळला आणि त्वरित उपचार केले, तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो.