
फोटो सौजन्य सोशल मिडिया
Mumbai Expensive Deal : DMart चे संस्थापक राधाकिशन दमानी यांनी वरळी येथील ‘थ्री सिक्स्टी वेस्ट’ मधील आलिशान फ्लॅट तीन वर्षांसाठी भाड्याने दिला आह. मुंबई मधील ही सर्वात मोठी आणि महागडी गुंतवणूक आहे. तर मुंबईतील हा सर्वात महागडा व्यवहार केला असल्याचे मानले जात आहे.
मुबईच्या अल्ट्रा-लक्झरी रिअल इस्टेट मार्केट मध्ये आता पुन्हा एक चर्चा समोर आहे. ग्राहाकांच्या पंसतीचे असलेले ‘डी-मार्ट’ शॅाप या डी-मार्ट’ च्या संस्थापकांनी म्हणजेचं राधाकिशन दमानी यांनी त्यांच्या संबंधित कंपनीने मुंबईतल्या वरळी इथे एक आलिशान अपार्टमेंट लीजवर दिले आहे. हा व्यवहार मुंबईतील सर्वाधिक महागड्या रेंटल डीलपैकी एक मानला जात आहे.
या व्यवहाराची नोंदणी आणि कागदपत्राची माहिती समोर आली आहे; या व्यवहारात जवळ जवळ 28.5 लाख माहिन्याचे भाडे लीजवर दिले आहे. वरळी मधील हे अपार्टमेंट ‘थ्री सिक्स्टी वेस्ट’ या लक्झरी प्रोजेक्टमध्ये आहे. तर वरळीतल्या डॉ. अॅनी बेझंट रोडवर हे अपार्टमेंट आहे. टॉवर क्रमांक बी 19 मजल्यावरील हे घर आहे. तब्बल 6,831 चौरस फूट क्षेत्रफळ असून; यात अपार्टमेंट बरोबर चार गाड्यांची पार्किंगची व्यवस्था देखिल आहे
या घराचा व्यवहार लीज वर करण्यात आला आहे. हा व्यवहारा 28 सप्टेंबर 2026 रोजी करण्यात आला आहे. त्याची नोंदणी देखिल करण्यात आली आहे. याचा कालावधी 36 महिण्यांचा आहे. म्हणजेचं हा व्यवहार तीन वर्षांचा करण्यात आला आहे. सुरुवातीला याचे मासिक भाडे 28.5 लाख रुपये असणार आहे. म्हणजे केवळ तीन वर्षांच्या भाड्याची रक्कम 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त असणार आहे.
या व्यवहारातील तब्बल 1.71 कोटी रुपयांचा सिक्युरिटी डिपॉझिट करण्यात आली आहे. या आलिशान अपार्टमेंटसाठी भाडेकरू कंपनीने ही रक्कम जमा केली आहे. अपार्टमेंटचा भाडेकरू म्हणून आयव्हीएल धनसेरी पेट्रोकेम इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे नाव नोंदवण्यात आले आहे.
2026 मध्ये मुंबईच्या लक्झरी रिअल इस्टेटमध्ये वरळी हे प्रमुख स्पाॅट ठरत आहे. 5 कोटी पेक्षा जास्त किमतीच्या घरांच्या व्यवहारांमध्ये वरळीने बाजी मारली आहे. या ठिकाणी लक्झरी रेंटल मार्केटमध्येही या परिसराचा मोठा वाटा आहे.
PM Kisan योजनेचे 2 हजार एकाच घरात बाप मुलगा दोघांनाही मिळतील? नेमका काय आहे सरकारी नियम?