Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: साताऱ्यात घर खरेदीसह गुंतवणुकीची संधी; साताऱ्यात २६ नोव्हेंबरपासून ‘रचना २०२६’ प्रदर्शन!

Satara News: बिल्डर्स असोसिएशनच्या सातारा शाखेचे हे ३६ वे वर्ष असून, सातारा शहरासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना या प्रदर्शनाची उत्सुकता असते. सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत प्रदर्शन खुले राहणार आहे. प्रवेश विनामूल्य असला तरी पूर्वनोंदणी आवश्यक आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 20, 2026 | 02:57 PM
Rachana 2026 Satara Exhibition, Builders Association Of India Satara,

Rachana 2026 Satara Exhibition, Builders Association Of India Satara,

Follow Us
Follow Us:
  • साताऱ्यात घर खरेदी अन् गुंतवणुकीची मोठी पर्वणी
  • १०० स्टॉल्समध्ये घरांपासून आधुनिक बांधकाम तंत्रज्ञानापर्यंतचे पर्याय
  • गृहप्रकल्पांपासून ते आधुनिक बांधकाम तंत्रज्ञानापर्यंतचे सर्व पर्याय एकाच छताखाली
Satara News: घर खरेदीचे स्वप्न पाहणारे ग्राहक, बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीच्या संधी शोधणाऱ्यांसाठी साताऱ्यात मोठी पर्वणी उपलब्ध होणार आहे. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, सातारा सेंटरच्या वतीने २६ ते २९ नोव्हेंबर दरम्यान पोलिस परेड ग्राऊंड येथे ‘रचना २०२६’ या भव्य वास्तू व बांधकाम प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रदर्शनात सुमारे १०० स्टॉल्स उभारण्यात येणार असून, घरापासून ते आधुनिक बांधकाम तंत्रज्ञानापर्यंतचे विविध पर्याय एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. असोसिएशनचे चेअरमन कौस्तुभ मोरे व व्हाईस चेअरमन हर्षद वालावलकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. असोसिएशनचेसचिव निलेश शिंदे खजिनदार शरद जाधव समिती सदस्य रामदास जगताप सचिन देशमुख संतोष कुमार जगताप इत्यादी एवढी उपस्थित होते.

Raigad News: खोपोली-पनवेल-बेलापूर मार्गावर प्रवाशांची गर्दी वाढली; एनएमएमटी बसफेऱ्या अपुऱ्या, विद्यार्थी आणि

बिल्डर्स असोसिएशनच्या सातारा शाखेचे हे ३६ वे वर्ष असून, सातारा शहरासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना या प्रदर्शनाची उत्सुकता असते. सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत प्रदर्शन खुले राहणार आहे. प्रवेश विनामूल्य असला तरी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. https://vms.ruha.co.in/registration/rachana-visitor या लिंकवर नोंदणी करता येणार आहे.

असोसिएशनचे सचिव निलेश शिंदे यांनी सांगितले की, सातारा शहर आणि परिसरात प्रस्तावित आयटी पार्क, वाढता औद्योगिक विस्तार, मेडिकल कॉलेज तसेच विविध शासकीय प्रकल्पांमुळे बांधकाम आणि रिअल इस्टेट क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आगामी काळात सातारा गुंतवणुकीचे महत्त्वाचे केंद्र बनू शकते. स्वतःचे घर घेऊ इच्छिणारे तसेच मालमत्तेमध्ये गुंतवणूक करू पाहणाऱ्यांसाठी ‘रचना २०२६’ महत्त्वाची संधी ठरेल.

या प्रदर्शनात बिल्डर्सचे विविध गृहप्रकल्प, किचन इक्विपमेंट्स, इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज, आधुनिक बांधकाम साहित्य, इंटेरिअर डिझाइन, स्विमिंग पूल, गार्डन संकल्पना आणि फिटनेस उपकरणांचे स्टॉल्स असतील. विविध बांधकाम व्यावसायिक आकर्षक योजनांसह सहभागी होणार असल्याने ग्राहकांना प्रकल्पांची तुलना करून निर्णय घेता येणार आहे. बँकिंग क्षेत्रातील गृहकर्ज पर्यायांची माहितीही ग्राहकांना मिळणार आहे.

New Hyundai Elantra 2027 Revealed: नवीन ह्युंदाई एलांट्रा मध्ये 157 PS Hybrid इंजिन, मोठी केबिन

‘ना नफा, ना तोटा’ या भूमिकेतून असोसिएशन हे प्रदर्शन आयोजित करत असून, बांधकाम व्यवसायाला चालना देणे आणि ग्राहकांना योग्य पर्याय उपलब्ध करून देणे हा त्यामागील उद्देश आहे. मुख्य प्रायोजक म्हणून स्कॉन इन्फ्रा प्रोजेक्ट्स एलएलपी, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि कंग्राळकर असोसिएट्स, तर सहप्रायोजक म्हणून उथान एलिव्हेटर्स, नवनिर्मिती बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आणि परफेक्ट हाऊस प्रा. लि. सहभागी झाले आहेत.

पत्रकार परिषदेला माजी स्टेट चेअरमन सचिन देशमुख, उपाध्यक्ष हर्षद वालावलकर, खजिनदार शरद जाधव, कौन्सिल मेंबर रामदास जगताप, संतोषकुमार जगताप यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. प्रदर्शनातील स्टॉल बुकिंगसाठी ९७६७०००६७० या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा baisatara.com या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: साताऱ्यातील ‘रचना २०२६’ हे वास्तू व बांधकाम प्रदर्शन कधी आणि कोठे होणार आहे?

    Ans: बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, सातारा सेंटरच्या वतीने २६ ते २९ नोव्हेंबर दरम्यान सातारा येथील पोलिस परेड ग्राऊंडवर ‘रचना २०२६’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

  • Que: या प्रदर्शनाची वेळ काय आहे आणि प्रवेशासाठी शुल्क आहे का?

    Ans: हे प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत खुले राहणार आहे. प्रदर्शनासाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आहे; मात्र त्यासाठी पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे.

  • Que: ‘रचना २०२६’ प्रदर्शनासाठी पूर्वनोंदणी कोठे करावी?

    Ans: इच्छुक नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी [https://vms.ruha.co.in/registration/rachana-visitor](https://vms.ruha.co.in/registration/rachana-visitor) या लिंकवर जाऊन आपली पूर्वनोंदणी करायची आहे.

Web Title: Rachana 2026 satara property construction exhibition builders association of india as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • Construction Builders
  • maharashtra news
  • property deal
  • Satara News

संबंधित बातम्या

Mumbai Railway Demolition: मुंबईत पुन्हा बुलडोजर ॲक्शन! प्रभादेवीत १०० कुटुंबांच्या निवाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर,पाहा photos
1

Mumbai Railway Demolition: मुंबईत पुन्हा बुलडोजर ॲक्शन! प्रभादेवीत १०० कुटुंबांच्या निवाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर,पाहा photos

सैदापूर सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रथमच महिलेला मान; सिंधुताई जाधव अध्यक्षपदी तर बशीर सय्यद उपाध्यक्षपदी
2

सैदापूर सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रथमच महिलेला मान; सिंधुताई जाधव अध्यक्षपदी तर बशीर सय्यद उपाध्यक्षपदी

Weather Update : अर्धा नोव्हेंबर महिना संपला तरीही गुलाबी थंडीची अद्याप प्रतिक्षाच; तापमानात चढ-उतार सुरूच
3

Weather Update : अर्धा नोव्हेंबर महिना संपला तरीही गुलाबी थंडीची अद्याप प्रतिक्षाच; तापमानात चढ-उतार सुरूच

Satara News : साताऱ्याच्या सांस्कृतिक वैभवाला नवी झळाळी! शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; शाहू कला मंदिरासाठी ७२ कोटींचा निधी मंजूर
4

Satara News : साताऱ्याच्या सांस्कृतिक वैभवाला नवी झळाळी! शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; शाहू कला मंदिरासाठी ७२ कोटींचा निधी मंजूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.