
आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा जगभरात डंका, दुसऱ्यांदा बनले जगातील सर्वोच्च केंद्रीय बँकर!
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तीकांत दास यांची कौशल्ये जगाने पुन्हा एकदा मान्य केली आहेत. सलग दुसऱ्या वर्षी शक्तीकांत दास जगातील सर्वोच्च केंद्रीय बँकर (केंद्रीय बँकेचे गव्हर्नर) म्हणून निवड झाली आहे. शक्तीकांत दास यांना ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्ड 2024 मध्ये A+ रेटिंग मिळाले आहे. महागाईवर नियंत्रण, जीडीपीमध्ये वाढ, चलनाची स्थिरता आणि व्याजदरावरील नियंत्रण याबाबतच्या कामगिरीसाठी त्यांचा हा सन्मान करण्यात आला आहे.
जगभरातील 101 सेंट्रल बंकर्सचा घेतला जातो आढावा
ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्ड हे वर्ष 1994 पासून प्रकाशित केले जात आहे. यामध्ये जगभरातील 101 सेंट्रल बंकर्सच्या कार्यकाळातील कामगिरीचे मूल्यांकन करण्यात आले आहे. गव्हर्नर शक्तीकांत दास यांना गेल्या वर्षीही A+ रेटिंग मिळाले होते. या अहवालात, A ते F रेटिंग श्रेणीची गणना केली आहे. ग्लोबल फायनान्स मासिक सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्डमध्ये एका वर्षभरात कोणकोणत्या मध्यवर्ती बँकेची कामगिरी ही वर्षभरात कशी राहिली आहे. याबाबत अवलोकन करते.
हेही वाचा – महागाईबाबत आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे मोठे विधान, वाचा… म्हणालेत
Happy to announce that for the 2nd consecutive year, RBI Governor @DasShaktikanta
has been rated “A+”, in the Global Finance Central Banker Report Cards 2024. Link to the report card: https://t.co/S69gz2HR0U@DasShaktikanta @RBI #RBIGovernor #RBIToday #ShaktikantaDas — ReserveBankOfIndia (@RBI) August 20, 2024
‘या’ बाबींवर होते कामगिरीचे मुल्यांकन
ग्लोबल फायनान्सच्या सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्डमध्ये, 101 केंद्रीय बँकांच्या गव्हर्नरच्या कामगिरीचे अनेक पॅरामीटर्सवरच्या आधारावर मूल्यांकन केले जाते. हे मुल्यांकन प्रामुख्याने नवीन कल्पना, आर्थिक समस्यांना सामोरे जाण्याचा दृष्टीकोन आणि एखाद्याच्या धोरणांप्रती दृढनिश्चय देखील करते. युरोपियन युनियन, इस्टर्न कॅरिबियन सेंट्रल बँक, बँक ऑफ सेंट्रल आफ्रिकन स्टेट्स आणि सेंट्रल बँक ऑफ वेस्ट आफ्रिकन स्टेट्स यांचाही या अहवालात समावेश आहे. दरम्यान, जूनमध्ये लंडन येथे झालेल्या सेंट्रल बँकिंग अवॉर्ड्स, 2023 मध्ये शक्तीकांत दास यांना गव्हर्नर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
आरबीआयचे 25 वे गव्हर्नर
शक्तीकांत दास हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) 25 वे गव्हर्नर आहेत. जी-20 परिषदेत त्यांना भारताचे शेर्पा म्हणूनही नियुक्त करण्यात आले होते. ते 1980 च्या बॅचचे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. त्यांचा जन्म 26 फेब्रुवारी 1957 मध्ये झाला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आरबीआयने जवळपास दीड वर्षे व्याजदर स्थिर ठेवले आहेत. याशिवाय महागाईवरही नियंत्रण ठेवण्यात आरबीआयला यश मिळाले आहे. विशेष म्हणजे, या काळात देशाने ८ टक्क्यांहून अधिक आर्थिक विकास दरही गाठला आहे. त्यामुळे त्यांची कामगिरी उल्लेखनीय ठरते.