Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RBI Customer Benefit: आरबीआय गव्हर्नरांचा बँकांना इशारा! व्याजदर कपातीचा फायदा ग्राहकांना त्वरित द्या

भारतीय रिझव्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात केली आहे. त्यामुळे त्याचे फायदे ग्राहकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवा, असे आवाहन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी देशातील बँकर्सना केले आहे. याबद्दल वाचा सविस्तर बातमी..

  • By Priti Hingane
Updated On: Dec 11, 2025 | 09:31 AM
आरबीआय गव्हर्नरांचा बँकांना इशारा! व्याजदर कपातीचा फायदा ग्राहकांना त्वरित द्या

आरबीआय गव्हर्नरांचा बँकांना इशारा! व्याजदर कपातीचा फायदा ग्राहकांना त्वरित द्या

Follow Us
Close
Follow Us:
  • आरबीआय गव्हर्नरांची कडक सूचना
  • डिजिटल फ्रॉड वाढतंय! जागृती वाढवा
  • ग्राहकांना स्वस्त कर्ज द्या, आरबीआयचा सल्ला

RBI Customer Benefit: भारतीय रिझव्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात केली आहे. त्यामुळे त्याचे फायदे ग्राहकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवा, असे आवाहन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी देशातील बँकर्सना केले आहे. ते बँकर्स सोबतच्या महत्त्वाच्या बैठकीत बोलत होते. बँकांनी हे लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवणे हे शाश्वत आर्थिक विकासाला पाठिंबा देण्यासाठी हे पाऊल आवश्यक आहे यावर त्यांनी भर दिला.

मुंबईत झालेल्या या उच्चस्तरीय बैठकीत सार्वजनिक आणि निवडक खासगी क्षेत्रातील बँकांचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान, गव्हर्नर मल्होत्रा यांनी सांगितले की, फेब्रुवारी २०२५ पासून, मध्यवर्ती बँकेने रेपो दरात एकूण १२५ बेसिस पॉइंट्स (१.२५%) कपात केली आहे, ज्यामुळे प्रमुख धोरणात्मक दर ५.२५ टक्के झाला आहे. गव्हर्नरांनी बँकर्सना सल्ला दिला की या कपातीचा थेट फायदा वापर आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी कर्जदारांना दिला पाहिजे.

हेही वाचा : India financing market: महाराष्ट्रातील व्यावसायिक वाहनांना आर्थिक पाठबळ देण्यात श्रीराम फायनान्स पुढे; LCV आणि HCV खरेदीला नवी गती

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत भारताने ८ टक्के इतका मजबूत जीडीपी विकासदर नोंदवला आहे आणि ही वाढ कायम ठेवण्यासाठी, आरबीआय परवडणाऱ्या कर्ज पुरवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. री-केवायसी आणि अनक्लेमड डिपॉझिट्स बैठकीत, आरबीआयने रि-केवायसी आणि अनक्लेमड डिपॉझिट्स सोडवण्याच्या दिशेने बँकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. गव्हर्नरांनी बँकांना या मुद्द्यावर  जागरूकता मोहिमा सुरू ठेवण्याचे आणि ग्राहकांशी सक्रियपणे संवाद साधण्याचे आवाहन केले.

नियमांचे सोपीकरण आणि अलिकडच्या उपक्रमांचा उल्लेख करून आरबीआयने आपली सल्लागार भूमिका पुन्हा सांगितली. या महत्त्वाच्या बैठकीत उपगव्हर्नर टी. रबी शंकर, स्वामीनाथन जे., पूनम गुप्ता आणि एस.सी. मुर्मू देखील उपस्थित होते, तसेच पर्यवेक्षण, नियमन, अंमलबजावणी आणि ग्राहक शिक्षण आणि आर्थिक समावेशन विभागांचे कार्यकारी संचालक देखील उपस्थित होते. ही बैठक नियमन केलेल्या संस्थांच्या वरिष्ठ व्यवस्थापनासोबत सुरू असलेल्या संवाद प्रक्रियेचा एक भाग होती.

हेही वाचा : RBI Swap Auction: डॉलर-रुपया खरेदी विक्रीचा लिलाव आरबीआय करणार! १६ डिसेंबरला होणार ३६ महिन्यांचा लिलाव

बँकिंग क्षेत्राच्या आरोग्याबद्दल समाधान व्यक्त करताना, आरबीआय गव्हर्नर यांनी सांगितले की, २०२५ मध्ये बँकांचे कामकाज आणि आर्थिक आरोग्य सातत्याने सुधारले आहे. तथापि, बदलत्या आर्थिक वातावरणात बँकानी आत्मसंतुष्टता टाळावी आणि सतर्क राहावे असा इशारा त्यांनी दिला, व्याजदरामध्ये १२५ बेसिस पॉइंटची कपात आणि तंत्रज्ञानाचा सुधारित वापर यामुळे बैंकांचा मध्यस्थी खर्च कमी होईल, ज्यामुळे कार्यक्षमता वाढेल आणि आर्थिक समावेशन बळकट होईल, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Rbi governor warns banks pass on the benefit of interest rate cuts to customers immediately

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 09:31 AM

Topics:  

  • RBI
  • Repo Rate
  • Reserve Bank Of India

संबंधित बातम्या

RBI Currency Printing: भारतीय चलनातील सर्वात अनोखी गोष्ट तुम्हाला माहितीये का? आरबीआय नव्हे तर, ‘हे ‘ जारी करतात ही नोट
1

RBI Currency Printing: भारतीय चलनातील सर्वात अनोखी गोष्ट तुम्हाला माहितीये का? आरबीआय नव्हे तर, ‘हे ‘ जारी करतात ही नोट

RBI’s Repo Rate 2025: आरबीआयने केली या वर्षात ‘इतक्या’ वेळा दर कपात? कर्जदारांना मिळाला मोठा दिलासा
2

RBI’s Repo Rate 2025: आरबीआयने केली या वर्षात ‘इतक्या’ वेळा दर कपात? कर्जदारांना मिळाला मोठा दिलासा

RBI Swap Auction: डॉलर-रुपया खरेदी विक्रीचा लिलाव आरबीआय करणार! १६ डिसेंबरला होणार ३६ महिन्यांचा लिलाव
3

RBI Swap Auction: डॉलर-रुपया खरेदी विक्रीचा लिलाव आरबीआय करणार! १६ डिसेंबरला होणार ३६ महिन्यांचा लिलाव

Bank Holidays Next Week: पुढील आठवड्यात 4 दिवस बँका बंद! शाखेत जाण्यापूर्वी सुट्टीची यादी तपासा नाहीतर परत जावे लागेल
4

Bank Holidays Next Week: पुढील आठवड्यात 4 दिवस बँका बंद! शाखेत जाण्यापूर्वी सुट्टीची यादी तपासा नाहीतर परत जावे लागेल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.