Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RBI Repo Rate Hike: कर्जदारांना मोठा झटका! घर-गाडीचं कर्ज महागणार, RBIने रेपो रेट 5.50 टक्क्यांवर नेला; EMIवर किती परिणाम?

RBI Repo Rate Hike: तुम्ही जर घर किंवा गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहेत. कारण भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे, परिणामी EMI वाढण्याची शक्यता आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 07, 2026 | 11:09 AM
कर्जदारांना मोठा झटका! घर-गाडीचं कर्ज महागणार, RBIने रेपो रेट 5.50 टक्क्यांवर नेला; EMIवर किती परिणाम?

कर्जदारांना मोठा झटका! घर-गाडीचं कर्ज महागणार, RBIने रेपो रेट 5.50 टक्क्यांवर नेला; EMIवर किती परिणाम?

Follow Us
Follow Us:
  • RBIचा कर्जदारांना मोठा झटका!
  • चार वर्षांत पहिल्यांदाच रेपो रेटमध्ये वाढ
  • होम-कार लोनचा EMI वाढणार
RBI Repo Rate Hike: रिझर्व्ह बँकेने कर्जदारांना मोठा धक्का देत रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉइंट्सची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. RBIच्या तीन दिवसीय पतधोरण समितीच्या बैठकीनंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी या निर्णयाची घोषणा केली. रेपो रेट 5.25 टक्क्यांवरून वाढवून 5.50 टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात होम लोन, कार लोन आणि इतर कर्जांचे व्याजदर वाढण्याची शक्यता आहे. (RBI Repo Rate Hike)

महागाईचे आव्हान निर्माण

RBIच्या या निर्णयाचा थेट परिणाम कर्जदारांच्या EMI वर होऊ शकतो. विशेषतः फ्लोटिंग व्याजदराशी संबंधित कर्जांचे दर बँकांकडून वाढवले गेल्यास मासिक हप्ता वाढू शकतो किंवा कर्जाचा परतफेडीचा कालावधी लांबू शकतो. RBI गव्हर्नरांनी या निर्णयामागे जागतिक आर्थिक परिस्थितीचा उल्लेख केला. पश्चिम आशियातील संघर्ष, कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ आणि जागतिक महागाईचा धोका यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोरही महागाईचे आव्हान निर्माण होऊ शकते. RBIने रेपो रेटसोबत SDF दर 5.25 टक्के, तर MSF दर 5.75 टक्के केला आहे. पतधोरणाचा दृष्टिकोनही ‘न्यूट्रल’वरून ‘कॅलिब्रेटेड टाइटनिंग’ करण्यात आला आहे.

Share Market Today: शेअर बाजारात आज अस्थिरतेचे संकेत; या शेअर्समध्ये होऊ शकते हालचाल, काय म्हणाले तज्ज्ञ?

5 टक्क्यांवरून 5.2 टक्के

रेपो रेट म्हणजे RBI ज्या व्याजदराने बँकांना अल्पकालीन कर्ज देते तो दर. रेपो रेट वाढल्यास बँकांसाठी निधी उभारणे महाग होते. परिणामी बँका त्याचा काही भार ग्राहकांवर टाकून कर्जाचे व्याजदर वाढवू शकतात. महागाईबाबतही RBIने आपले अंदाज सुधारले आहेत. FY27 साठी कोअर महागाईचा अंदाज 4.3 टक्क्यांवरून 4.4 टक्के, तर CPI महागाईचा अंदाज 5 टक्क्यांवरून 5.2 टक्के करण्यात आला आहे.

दुसरीकडे, अर्थव्यवस्थेच्या वाढीबाबत RBIने सकारात्मक अंदाज व्यक्त केला आहे. FY27 साठी वास्तविक GDP वाढीचा अंदाज 6.7 टक्क्यांवरून 7.1 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे महागाई नियंत्रणात ठेवतानाच आर्थिक विकासाचा वेग कायम राखण्याचे मोठे आव्हान RBIसमोर असणार आहे.

रेपो रेट म्हणजे काय?

रेपो रेट (Repo Rate) हा तो व्याजदर आहे, ज्यावर देशाची मध्यवर्ती बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) व्यापारी बँकांना अल्पमुदतीसाठी (short-term) कर्ज देते. जेव्हा बँकांकडे पैशांची कमतरता असते, तेव्हा त्या आरबीआयकडून सरकारी रोख्यांच्या (government securities) बदल्यात कर्ज घेतात. सध्या भारतातील रेपो रेट ५.२५% इतका आहे.

Todays Gold-Silver Price: सोन्याचे दर पुन्हा वधारले, चांदीचा भाव आजही स्थिर! वाचा सविस्तर

Web Title: Rbi repo rate hike home car loan emi increase inflation gdp growth 2026 sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 11:09 AM

Topics:  

  • Business News
  • RBI
  • Repo Rate

संबंधित बातम्या

Business Success Story : 15 रुपयांच्या चहाने बदललं 3 मित्रांचं नशीब… नोकरीचा नाद सोडून उभी केली 100 कोटींचा बिझनेस
1

Business Success Story : 15 रुपयांच्या चहाने बदललं 3 मित्रांचं नशीब… नोकरीचा नाद सोडून उभी केली 100 कोटींचा बिझनेस

Swiggy Financial Services : अन्न उद्योजकांसाठी सुवर्णसंधी! Swiggy Instamart कडून ₹5 कोटींपर्यंत कर्ज; NOICE ब्रँडचा मेगाप्लॅन
2

Swiggy Financial Services : अन्न उद्योजकांसाठी सुवर्णसंधी! Swiggy Instamart कडून ₹5 कोटींपर्यंत कर्ज; NOICE ब्रँडचा मेगाप्लॅन

Lilavati Hospital चा मोठा उपक्रम! श्रवणदोष असलेल्या मुलांसाठी ‘ऑडिटरी व्हर्बल थेरपी’ क्लिनिक सुरू
3

Lilavati Hospital चा मोठा उपक्रम! श्रवणदोष असलेल्या मुलांसाठी ‘ऑडिटरी व्हर्बल थेरपी’ क्लिनिक सुरू

Fintech Industry : केवळ कर्ज देणे पुरेसे नाही, जबाबदार सवयी महत्त्वाच्या! फिनटेक क्षेत्राच्या भविष्याबाबत तज्ज्ञांचा मोठा दावा
4

Fintech Industry : केवळ कर्ज देणे पुरेसे नाही, जबाबदार सवयी महत्त्वाच्या! फिनटेक क्षेत्राच्या भविष्याबाबत तज्ज्ञांचा मोठा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.