Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आरबीआयने केली मोठी कारवाई, ‘या’ ३ बँकांना ठोठावला मोठा दंड, कारण काय?

RBI: नियामक अनुपालनातील काही त्रुटींसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने कोटक महिंद्रा बँक, IDFC फर्स्ट बँक आणि पंजाब नॅशनल बँक (PNB) यांना दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, कर्ज आणि अॅडव्हान्स, वैधानिक आणि

  • By हर्षदा डोंगरे
Updated On: Apr 18, 2025 | 09:40 AM
Income Tax Collections: कंपन्यांनी भरली सरकारची तिजोरी, निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात झाली ८ टक्क्यांची वाढ (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Income Tax Collections: कंपन्यांनी भरली सरकारची तिजोरी, निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात झाली ८ टक्क्यांची वाढ (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

RBI Marathi News: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) बँकिंग क्षेत्रातील नियमभंग प्रकरणांवर सातत्याने लक्ष ठेवून आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आरबीआयने तीन मोठ्या बँकांवर कारवाई करत आर्थिक दंड ठोठावण्याला आहे. नियमांचे उल्लंघन आणि प्रक्रियात्मक त्रुटींमुळे या बँकांवर आरबीआयने कारवाई केली आहे.

नियामक अनुपालनातील काही त्रुटींसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने कोटक महिंद्रा बँक, IDFC फर्स्ट बँक आणि पंजाब नॅशनल बँक (PNB) यांना दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, कर्ज आणि अॅडव्हान्स, वैधानिक आणि इतर निर्बंधांवरील काही निर्देशांचे पालन न केल्याबद्दल कोटक महिंद्रा बँकेला ६१.४ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Share Market: भारतीय शेअर बाजारात पुन्हा अच्छे दिन, ‘ही’ आहेत तेजीची तीन कारणे

याशिवाय बँक कर्ज वितरणासाठी क्रेडिट सिस्टमवरील मार्गदर्शक तत्त्वे देखील आहेत. काही केवायसी निर्देशांचे पालन न केल्याबद्दल आयडीएफसी फर्स्ट बँकेला ३८.६ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

पंजाब नॅशनल बँकेवरही कारवाई

याशिवाय, बँकांमधील ग्राहक सेवेबाबत रिझर्व्ह बँकेने दिलेल्या काही सूचनांचे पालन न केल्याबद्दल पंजाब नॅशनल बँकेला २९.६ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तिन्ही प्रकरणांमध्ये, आरबीआयने म्हटले आहे की हा दंड नियामक अनुपालनातील त्रुटींवर आधारित आहे आणि बँकांनी त्यांच्या ग्राहकांशी केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर निर्णय घेण्याचा हेतू नाही.

सहकारी बँकेचा परवाना रद्द

यापूर्वी, रिझर्व्ह बँकेने अहमदाबादस्थित ‘कलर मर्चेंट्स को-ऑपरेटिव्ह बँके’चा परवाना रद्द केला होता. रिझर्व्ह बँकेच्या मते, त्यांच्याकडे पुरेसे भांडवल आणि कमाईच्या संधी नाहीत. रिझर्व्ह बँकेने सांगितले की, गुजरात सहकारी संस्थांच्या रजिस्ट्रारना बँक बंद करण्याचा आणि बँकेसाठी लिक्विडेटर नियुक्त करण्याचा आदेश जारी करण्याची विनंती करण्यात आली आहे.

लिक्विडेशननंतर प्रत्येक ठेवीदाराला त्याच्या ठेवींवर ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून फक्त 5 लाख रुपयांच्या आर्थिक मर्यादेपर्यंत विमा दाव्याची रक्कम मिळण्याचा अधिकार असेल. रिझर्व्ह बँकेने पुढे म्हटले आहे की सहकारी बँकेने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, सुमारे ९८.५१ टक्के ठेवीदारांना त्यांच्या ठेवींची संपूर्ण रक्कम डीआयसीजीसीकडून मिळण्यास पात्र आहे.

कोटक महिंद्रा बँक

कोटक महिंद्रा बँकेने कर्ज आणि अ‍ॅडव्हान्सेस संदर्भातील मार्गदर्शक सूचना, वैधानिक बंधने आणि काही आवश्यक धोरणांचं पालन केलं नाही. त्यामुळे आरबीआयने या बँकेवर ₹61.4 लाखांचा दंड ठोठावला आहे.

Web Title: Rbi took big action imposed a huge fine on these 3 banks what is the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2025 | 09:40 AM

Topics:  

  • Business News
  • RBI news

संबंधित बातम्या

Sona Selection India Limited चा IPO 17 सप्टेंबरला होणार खुला; ₹94 ते ₹99 किंमत रुपये किंमत पट्टा जाहीर
1

Sona Selection India Limited चा IPO 17 सप्टेंबरला होणार खुला; ₹94 ते ₹99 किंमत रुपये किंमत पट्टा जाहीर

Success Story : शाळेत नापास, 30 इंटर्व्ह्यूमध्ये रिजेक्शन… तरीही बनला अब्जाधीश! Jack Ma कसे बनले अलिबाबाचे बॉस?
2

Success Story : शाळेत नापास, 30 इंटर्व्ह्यूमध्ये रिजेक्शन… तरीही बनला अब्जाधीश! Jack Ma कसे बनले अलिबाबाचे बॉस?

Global Fintech Fest 2026 : जमीन-मालमत्तेचे होणार ब्लॉकचेन टोकनायझेशन; महाराष्ट्र सरकार उचलणार मोठे पाऊल
3

Global Fintech Fest 2026 : जमीन-मालमत्तेचे होणार ब्लॉकचेन टोकनायझेशन; महाराष्ट्र सरकार उचलणार मोठे पाऊल

केमिकल उद्योगासाठी महाराष्ट्र सरकारचा मास्टरप्लॅन, ऑक्टोबरअखेर रासायनिक क्षेत्रासाठी स्वतंत्र धोरण;  १,००० कोटींचा नवोपक्रम निधी
4

केमिकल उद्योगासाठी महाराष्ट्र सरकारचा मास्टरप्लॅन, ऑक्टोबरअखेर रासायनिक क्षेत्रासाठी स्वतंत्र धोरण; १,००० कोटींचा नवोपक्रम निधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.