Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rustomjee New Tower : ठाण्यात घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी! रुस्तमजीने लाँच केला 58 मजली टॉवर; रूफटॉप पूल, बाल्कनीसह बरंच काही

Rustomjee New Tower : मुंबईतील आघाडीच्या रुस्तमजी डेव्हलपरने केपेल कंपनीच्या सहयोगाने ठाण्यातील आपल्या लँडमार्क 'ला व्हिए' प्रकल्पात नवीन एक्सक्लुझिव्ह टॉवर लाँच करण्याची घोषणा केली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 26, 2026 | 06:14 PM
ठाण्यात घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ( सौजन्य - सोशल मीडिया )

ठाण्यात घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • ठाण्यात घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी!
  • रुस्तमजीने लाँच केला 58 मजली टॉवर
  • रूफटॉप पूल, बाल्कनीसह बरंच काही
Rustomjee New Tower : रुस्तमजी या मुंबईतील अग्रगण्य रिअल इस्टेट डेव्हलपरने केपेलसोबत सहयोगाने ठाण्यातील आपल्या लँडमार्क निवासी प्रकल्प ‘ला व्हिए’मध्ये नवीन टॉवरच्या लाँचची घोषणा केली आहे. आठ टॉवर्सच्या एकात्मिक कम्युनिटीमध्ये सर्वात प्रीमियम ऑफरिंग म्हणून स्थान मिळालेले हे नवीन लाँच ५८ मजल्यांचा स्वतंत्र टॉवर आहे, ज्यामध्ये ९३० ते ९८० चौरस फूट आकाराचे ३ बीएचके फ्लॅट्स बाल्कनीसहित उपलब्ध आहेत. ( Rustomjee New Tower ) 

Akasa Air Flight : अवघ्या 4 वर्षांत अकासा एअरची तुफान भरारी! रोज 200 हून अधिक उड्डाण; दिल्ली, मुंबई, बेंगळुरूसह ‘या’ शहरांना फायदा

विहंगम दृश्ये, समर्पित रूफटॉप पूल आणि ला व्हिएच्या रिसॉर्ट-स्टाईल राहणीमानाचे प्रतिबिंब दर्शवणाऱ्या विचारपूर्वक डिझाइन केलेल्या सदनिकांसह उंचावलेला जीवनशैलीचा अनुभव शोधणाऱ्या ग्राहकांसाठी हा टॉवर डिझाइन करण्यात आला आहे.

सर्वात प्रस्थापित गृहनिर्माण बाजारपेठ म्हणून उदयास

या लाँचबाबत मत व्यक्त करत रुस्तमजी ग्रुपच्या रुस्तमजी अर्बानियाचे प्रोजेक्ट सीईओ श्री. अनुपम वर्मा म्हणाले, “सातत्यपूर्ण पायाभूत सुविधांचा विकास, सुधारित कनेक्टिव्हिटी आणि प्रबळ सामाजिक रचनेच्या विकासामुळे ठाणे एमएमआरमधील सर्वात प्रस्थापित गृहनिर्माण बाजारपेठ म्हणून उदयास आले आहे. शहराचा विकास झाला, तसतसे घर खरेदीदारांच्या महत्त्वाकांक्षाही वाढल्या आहेत”.

“आज घर खरेदी करण्याचा निर्णय केवळ अपार्टमेंटपुरता मर्यादित राहिलेला नाही, खरेदीदार दर्जेदार मोकळ्या जागा आणि दीर्घकालीन मूल्यांसह उत्कृष्ट राहणीमानाचा अनुभव देणाऱ्या प्रकल्पांच्या शोधात आहेत. हा बदल बाजारपेठेची वाढती परिपक्वता आणि आजच्या खरेदीदारांच्या बदलत्या अपेक्षा दर्शवतो.

विस्तीर्ण परिसंस्थेचा लाभही सातत्याने

रुस्तमजीमध्ये आमचा नेहमी विश्वास राहिला आहे की, जीवनशैली प्रदान करणाऱ्या सुनियोजित परिसराची आणि विचारपूर्वक केलेल्या डिझाइनची सांगड घालून उत्तम सदनिका निर्माण केल्या जातात. रिसॉर्ट-स्टाईल राहणीमान एकात्मिक कम्युनिटीमध्ये आणण्याच्या या मूळ तत्त्वज्ञानावर ला व्हिएची संकल्पना साकारण्यात आली होती. हा नवीन टॉवर त्या दूरदृष्टीची स्वाभाविक प्रगती आहे. हा टॉवर ला व्हिए परिसंस्थेमध्ये दुर्मिळ ऑफरिंग सादर करतो, जो अधिक मोकळ्या जागा, गोपनीयता आणि अप्रतिम दृश्यांसाठी विचारपूर्वक डिझाइन करण्यात आला आहे आणि या प्रकल्पाची ओळख असणाऱ्या विस्तीर्ण परिसंस्थेचा लाभही सातत्याने मिळवून देतो.”

ठाण्यात वैशिष्ट्यपूर्ण राहणीमानाचा अनुभव

केपेलचे मिडल ईस्ट आणि दक्षिण आशियाचे मुख्य प्रतिनिधी श्री. हो कियाम खियोंग म्हणाले, “नवीन टॉवरचे लाँच हे केपेल आणि रुस्तमजी यांच्यातील पक्क्या भागीदारीवर, तसेच ला व्हिएच्या आधीच्या टप्प्यांना मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादावर आधारित आहे. विचारपूर्वक डिझाइन केलेली सदनिका आणि एकात्मिक कम्युनिटीच्या फायद्यांची सांगड घालत हा टॉवर ठाण्यात वैशिष्ट्यपूर्ण राहणीमानाचा अनुभव देतो. रुस्तमजीसोबत मिळून कार्यक्षमता आणि राहण्यायोग्यतेला केंद्रस्थानी ठेवून घर खरेदीदारांच्या बदलत्या आकांक्षा पूर्ण करणारी दर्जेदार सदनिका उपलब्ध करून देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”

सोयीसुविधांसह विस्तीर्ण ला व्हिए कम्युनिटीचा निरंतर आनंद

ला व्हिएमधील हा नव्याने लाँच झालेला टॉवर अधिक प्रशस्त अपार्टमेंट्स आणि क्युरेटेड जीवनशैली सुविधांसह अधिक एक्सक्लुझिव्ह निवासी अनुभव देतो. प्रत्येक सदनिका अधिक गोपनीयता आणि विस्तीर्ण राहणीमान प्रदान करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे, तसेच निवडक सदनिकांमध्ये रुस्तमजीची सिग्नेचर पॉड संकल्पना देखील असेल. याशिवाय रहिवाशांना लँडस्केप केलेल्या मोकळ्या जागा, रूफटॉपवरील मनोरंजनाच्या सुविधा आणि दैनंदिन सोयीसुविधांसह विस्तीर्ण ला व्हिए कम्युनिटीचा निरंतर आनंद घेता येईल.

पायाभूत सुविधांनी युक्त

ठाण्यातील सुप्रस्थापित माजिवडा मायक्रो-मार्केटमध्ये वसलेला ला व्हिए उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी आणि प्रबळ सामाजिक पायाभूत सुविधांनी युक्त आहे, ज्यामध्ये माजिवडा येथे स्वतंत्र स्टेशन असलेली मुंबई मेट्रो लाईन ४ आणि ठाण्याला भिवंडी व कल्याणशी जोडणारी मेट्रो लाईन ५ यांसारख्या प्रमुख पायाभूत प्रकल्पांचा समावेश आहे. या भागाला आनंद नगर–साकेत उन्नत मार्ग आणि छेडा नगर ते आनंद नगरला जोडणाऱ्या प्रस्तावित ईस्टर्न फ्रीवे विस्तारासह सध्या सुरू असलेल्या व आगामी पायाभूत सुविधांचा मोठा लाभ झाला आहे, ज्यामुळे प्रमुख रोजगार, व्यावसायिक आणि सामाजिक केंद्रांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ झाले आहे.

या सुधारणा माजिवड्याला उत्तम कनेक्टेड गंतव्य म्हणून विकास करण्यास अधिक मदत करत आहेत आणि मायक्रो-मार्केटमधील प्रत्यक्ष वापरकर्त्यांची सातत्यपूर्ण मागणी टिकवून ठेवण्यास हातभार लावत आहेत. ला व्हिएचे यशस्वी लाँच आणि मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर हा नवीन टॉवर ठाण्यातील प्रीमियम निवासी सुविधांच्या पुढील टप्प्याची सुरुवात आहे.

Bitcoin ची किंमत गडगडली; Crypto मार्केटमध्ये खळबळ! गुंतवणूकदारांचे पैसे बुडणार की ही खरेदीची सुवर्णसंधी?

💡

Frequently Asked Questions

  • Que: रुस्तमजीने लाँच केलेल्या या नव्या टॉवरचे वैशिष्ट्य काय?

    Ans: हा ५८ मजल्यांचा स्वतंत्र टॉवर असून यामध्ये ९३० ते ९८० चौरस फूट आकाराचे ३ बीएचके फ्लॅट्स, समर्पित रूफटॉप पूल, सिग्नेचर पॉड संकल्पना आणि रिसॉर्ट-स्टाईल राहणीमानाचा अनुभव मिळणार आहे.

  • Que: हा गृहप्रकल्प ठाण्यातील कोणत्या भागात स्थित आहे?

    Ans: हा प्रकल्प ठाण्यातील सुप्रस्थापित 'माजिवडा' मायक्रो-मार्केटमध्ये वसलेला आहे, जो मुंबई आणि एमएमआरशी उत्कृष्ट कनेक्टिव्हिटीने जोडलेला आहे.

  • Que: माजिवडा परिसराला कोणत्या आगामी पायाभूत सुविधांचा फायदा मिळत आहे?

    Ans: मुंबई मेट्रो लाईन ४ माजिवडा स्टेशन, मेट्रो लाईन ५ ठाणे-भिवंडी-कल्याण, आनंद नगर-साकेत उन्नत मार्ग आणि ईस्टर्न फ्रीवेच्या प्रस्तावित विस्ताराचा थेट फायदा होत आहे.

Web Title: Rustomjee launches new 58 storey exclusive tower at la vie thane ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 06:14 PM

Topics:  

  • Business News
  • Thane news

संबंधित बातम्या

Transrail Lighting ला 408 कोटींचा जॅकपॉट! केवळ एका पंधरवड्यात 1394 कोटींच्या ऑर्डर्स; आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ
1

Transrail Lighting ला 408 कोटींचा जॅकपॉट! केवळ एका पंधरवड्यात 1394 कोटींच्या ऑर्डर्स; आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ

Kalyan News : ७० वर्षांपासून राहत असलेल्या कुटुंबांवर घर सोडण्याची वेळ? कल्याणच्या आतिश खान कंपाऊंडचा प्रश्न ऐरणीवर
2

Kalyan News : ७० वर्षांपासून राहत असलेल्या कुटुंबांवर घर सोडण्याची वेळ? कल्याणच्या आतिश खान कंपाऊंडचा प्रश्न ऐरणीवर

India vs China : सणासुदीच्या काळात चीनचा कट उधळला! भारतीय बाजारात स्वस्त माल खपवणाऱ्या चिनी कंपन्यांना चाबूक; केंद्राचा मोठा
3

India vs China : सणासुदीच्या काळात चीनचा कट उधळला! भारतीय बाजारात स्वस्त माल खपवणाऱ्या चिनी कंपन्यांना चाबूक; केंद्राचा मोठा

ITR Filing : टेन्शन दूर! आयटीआर फाईलिंगची तारीख पुढे ढकलली; पण ‘ही’ चूक करु नकात, नाहीतर खिशाला बसेल मोठा फटका
4

ITR Filing : टेन्शन दूर! आयटीआर फाईलिंगची तारीख पुढे ढकलली; पण ‘ही’ चूक करु नकात, नाहीतर खिशाला बसेल मोठा फटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.