
ट्रान्सरेल लाइटिंगची आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ ( सौजन्य - सोशल मीडिया )
मिळालेल्या या नव्या ऑर्डर्समध्ये काही देशांतर्गत ऑर्डर्ससह प्रामुख्याने एमईएनए प्रदेशातील जीआयएस सबस्टेशन (गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन) ईपीसी प्रकल्पाचा समावेश आहे. या यशामधून कंपनीकडील विस्तृत टेक्निकल व कार्यात्मक कौशल्ये आणि उच्च तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्पांसाठी आंतरराष्ट्रीय ग्राहकांनी दाखवलेला विश्वास दिसून येतो.
कंपनीचे एमडी आणि सीईओ रणदीप नारंग म्हणाले, “आम्ही जगभरात टीअँडडी क्षेत्रावरील वाढत्या खर्चासह सातत्याने नव्या ऑर्डर्स मिळवत आहोत. यासह, आम्ही केवळ गेल्या पंधरवड्यात १,३९४ कोटी रुपयांच्या ऑर्डर्स मिळवल्या आहेत, तसेच, चालू आर्थिक वर्षातील आजवरचा एकूण ऑर्डर ओघ २,४२९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मिळालेल्या ४०८ कोटी रुपयांच्या नव्या ऑर्डर्समध्ये प्रामुख्याने एमईएनए प्रदेशातील ग्रीनफिल्ड ईपीसी सबस्टेशन प्रकल्पाचा समावेश आहे”.
“हा प्रकल्प प्रगत गॅस इन्सुलेटेड तंत्रज्ञानावर आधारित आहे, ज्यामधून आमचे प्रगत कौशल्य दिसून येते. आम्ही आमच्या सर्व उत्पादनांच्या आणि सेवांच्या माध्यमातून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये संतुलित पद्धतीने प्रगती करत आहोत.” असे कंपनीचे एमडी आणि सीईओ रणदीप नारंग यांनी स्पष्ट केलं. या नव्या ऑर्डर्ससह कंपनीची चालू आर्थिक वर्षातील एकूण ऑर्डर प्राप्त करण्याची रक्कम तब्बल २,४२९ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे ऑर्डरसह मोठ्या प्रमाणावर विस्तारही वाढला आहे.
Ans: ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेडला नुकत्याच ४०८ कोटी रुपयांच्या नव्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत.
Ans: ऑर्डर्समध्ये प्रामुख्याने MENA प्रदेशातील ग्रीनफिल्ड EPC सबस्टेशन प्रकल्पाचा समावेश असून, हा प्रकल्प प्रगत गॅस इन्सुलेटेड तंत्रज्ञानावर आधारित आहे.
Ans: या नव्या ४०८ कोटी रुपयांच्या ऑर्डर्ससह, चालू आर्थिक वर्षात ट्रान्सरेल लाइटिंगने मिळवलेल्या एकूण ऑर्डर्सचे मूल्य २,४२९ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.