
Reserve Bank Of India silver Loan
सोने आणि चांदीच्या दागिन्यांवर बँकासह बाकीच्या व्यापारी बँकांसुद्धा कर्ज देऊ शकतात. यात स्मॉल फायनान्स, अर्बन आणि ग्रामीण को ऑपरेटिव्ह बँक, प्रादेशिक ग्रामीण बँका, एबीएफसीसह हाऊसिंग फायनान्स कंपन्या सोने-चांदीवर तुम्हाला कर्ज देऊ शकतात. चांदी किंवा सोन्याचे केवळ दागिने, किंवा नाण्यांवर सुद्धा कर्ज दिले जाईल असे आबीआयनं स्पष्ट केले आहे. तसेच, 1 किलोपर्यंत सोन्याच्या दागिन्यांवर कर्ज घेऊ शकता. आणि, 10 किलोपर्यंत चांदीच्या दागिन्यांवर कर्ज देता येईल. अगदी 50 ग्रॅम पर्यंत सोन्याची नाणी तर 500 ग्रॅमपर्यंत चांदीची नाणी तुम्ही तारण ठेवू शकता. मात्र, या मर्यादेपेक्षा अधिक वजनांचे दागिने तुम्ही तारण ठेवू शकणार नाही.
जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
सोने-चांदीच्या दागिन्यांवर कर्ज घेताना त्या ग्राहकासमोर चांदीची तपासणी करण्यात येईल. त्यानंतर बँककडून मूल्यांकनाची याची प्रमाणित प्रत देण्यात येईल. या करारनाम्यात लिलाव प्रक्रिया, फी आणि परतफेडीची सर्व माहिती नमूद करण्यात येईल. ग्राहक ज्या भाषेला प्राधान्य देतील त्या भाषेत सर्व कागदपत्र तयार करण्यात येतील. चांदी किंवा सोने एका सुरक्षित वॉल्टमध्ये ठेवण्यात येतील. कर्जाची परतफेड केल्यानंतर आरबीआयच्या नियमानुसार ग्राहकाला सोने आणि चांदीचे दागिने सात दिवसात बँक परत करेल. जर बँकेकडून उशीर झाला तर ग्राहकांना प्रतिदिन 5000 रुपये दंड स्वरूपात परतावा मिळेल.
हेही वाचा : Junior UPI Wallet Launch : मुलांसाठी आरबीआयकडून डिजिटल पेमेंटचं गिफ्ट! मुलांसाठी पहिलं UPI Wallet ‘Junio’
लोन टू वॅल्यू आरबीआयकडून निश्चित करण्यात आली आहे. सोने आणि चांदीच्या किंमती ठरवण्यासाठी बँक अथवा एनबीएफसी सरासरी गेल्या 30 दिवसांतील क्लोजिंग किंमतीचा आधार घेतील. या किंमती आयबीजेए किंवा मान्यताप्राप्त कमोडिटी एक्सचेंज जारी करण्यात आलेल्या दरांवर आधारित असतील. मात्र, या सगळ्या प्रक्रियेत दागिन्यांवर असलेल्या इतर खडयांचे मूल्यांकन ग्राह्य धरले जाणार नाही. तसेच, 1 लाख रुपयांची चांदी तुमच्याकडे असेल तर तुम्हाला 85000 रुपयांपर्यंत मिळू शकेल. अडीच लाख ते 5 लाखांपर्यत असल्यावर 80 टक्के कर्ज आणि 5 लाखांवरील कर्ज 75 टक्क्यांपर्यंत कर्ज देण्यात येईल.
परंतु, जर कर्ज फेडले गेले नाही तर त्याच्या सोने किंवा चांदीच्या दागिन्यांचा लिलाव करून ते विकण्यात येऊ शकते. ग्राहकाला बँक आधी नोटिस पाठवेल, ग्राहकाचा जर काही संपर्क झाला नाही तर मात्र एक महिन्यासाठी सार्वजनिक नोटीस पाठवली जाईल. एखाद्या ग्राहकाने कर्ज फेडून सुद्धा दागिने परत नेले नाही तर, दोन वर्षाच्या कालावधीनंतर अनक्लेम्ड कोलॅटरल म्हणून घोषित करण्यात येईल.