RBI approves 'Junio' app (photo- social media)
हेही वाचा : Junior UPI Wallet : बँक अकाउंटशिवाय UPI पेमेंट? जाणून घ्या Junio Wallet कसे काम करेल
पालक आपल्या मुलांवर या ॲपद्वारे लक्ष ठेवू शकतात. त्यांना पैसे पाठवू शकतात, तसेच खर्चाची मर्यादा सेट करून त्यांच्या खर्चावर नियंत्रण आणू शकतात. अगदी, रिअल टाइम प्रत्येक व्यवहाराचे निरीक्षण करू शकतात. अशाने पालकांना त्यांच्या मुलांना व्हायफळ खर्चावर आळा घालता येईल. हा ॲप मुलांना टास्क रिवॉर्ड्स सोबतच बचतीचे महत्व सांगते. जेणे करून मुलांना आर्थिक साक्षरता शिकण्यास मदत होईल.
भौतिक आणि आभासी सारख्या दोन्ही पर्यायांवर जुनिओचे रुपे-ब्रँडेड कार्ड अनेक फायदे देते. ऑनलाइन, ऑफलाइन आणि टॅप-अँड-पे सारखे व्यवहार सुलभ आणि सहज करते. दोन दशलक्षाहून अधिक तरुण वापरकर्ते आधीपासून याचा वापर करत आहेत. म्हणजे आधीच लाखों कुटुंबामध्ये सक्रिय असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
हेही वाचा : Credit Card Guide : डिजिटल युगातील क्रेडिट कार्ड…; आर्थिक स्वातंत्र्य की कर्जाचे जाळे?
ज्युनियो पेमेंट्सचे सह-संस्थापक अंकित गेरा म्हणाले की, “आरबीआयच्या या मंजुरीमुळे पुढील पिढी केवळ पैसे खर्च करण्याऐवजी ते हुशारीने व्यवस्थापित करायला शिकतील यामुळे दृष्टिकोनाला बळकटी मिळत असून मार्गदर्शन आणि स्वातंत्र्य संतुलित करणारी आर्थिक परिसंस्था तयार करणे हा आमचा मुख्य उद्देश आहे.”
येत्या काही महिन्यांत भविष्यातील योजनांबाबत अनेक नवीन वैशिष्ट्ये ॲपमध्ये जोडण्यात येणार आहे. बचतीवर रिवॉर्ड पॉइंट्स, एनसीएमसी-समर्थित ट्रान्झिट पेमेंट, यूपीआय एकत्रीकरण, ब्रँड व्हाउचर प्रोत्साहन यासारख्या गोष्टी जोडण्यात येणार आहे. यामुळे बस प्रवास देखील कॅशलेस पेमेंट सोपे होईल. कंपनीचे मुख्य हेतु तरुणांना सुरक्षित, कॅशलेस आणि शैक्षणिक पेमेंट अनुभव देणे असा आहे. यामुळे, भारतातील पहिले युवा केंद्रित फिनटेक प्लॅटफॉर्म म्हणून ज्युनियोची ओळख होऊ शकते.






